करीरा : पश्चिम ऑस्ट्रेलियातील एक जमात. ही जमात स्वतंत्र टोळ्यांत विभागलेली आहे. एका टोळीत ५० ते १५० पर्यंत व्यक्ती असतात. या टोळ्या पितृवंशी आहेत. प्रत्येक टोळीचे १५० ते ३५० चौ. किमी. एवढे स्वतंत्र क्षेत्र असते. पुरुष शिकार व मासेमारी करतात, तर स्त्रिया कंदमुळे गोळा करतात. त्यांच्यापैकी फारच थोडे शेती करतात. कुळी गणचिन्हावर आधारलेल्या आहेत. प्रत्येक टोळीच्या क्षेत्रात गणचिन्हांची निश्चित जागा केलेली असते. तेथे गणचिन्ह असणाऱ्या प्राण्याची किंवावनस्पतीची वाढ व्हावी, म्हणून धार्मिक विधी करण्यात येतात. टोळी सामाजिक, राजकीय व आर्थिकबाबतींत स्वयंपूर्ण असते. जमातीची एकी, नातेदारी पद्धती व समान चालीरीती यांवर आधारलेलीआहे. आते-मामे भावंडांचे विवाह होतात. जमातीत वृद्ध व्यक्तीस मान देण्यात येतो. टोळीचे इतरकामकाज वृद्ध व्यक्ती चालविते.

संदर्भ : Elkin, A. P. The Australian Aborigines, London, 1938.

मुटाटकर, रामचंद्र