कागद कलाकाम : विविध प्रकारच्या कागदापासून शोभेच्या व उपयुक्त वस्तू तयार करण्याची हस्तकला कागदाच्या साहाय्याने कलाकुसरीची कामे सहज करता येतात. अगदी साधी, सोपीच नव्हे, तरी अत्यंत गुंतागुंतीची कलाकुसर करण्यासाठी कागद हे एक उत्कृष्ट माध्यम आहे. कागदी कलाकामाचे असेख्य प्रकार असले, तरी त्यांची रचना पुढे दिलेल्या दोनतीन मुख्य प्रकारांवरच आधारलेली आढळते. (१) कागदांच्या घडया घालून आणि त्या विशिष्ट पध्दतींनी उलगडून, (२) कागद वेगवेगळ्या आकारांत कापून, (३) मूळ योजनेनुसार त्याच रंगांचे किंवा विविध रंगांचे आणि विविध आकारांचे कागद चिकटवून कागदकाम करतात. कागदी वस्तू अधिक आकर्षक करण्यासाठी त्यास रंगही देतात.

कागदी सुरळ्यांचा कोंबडा

कागदाचे चौकोनी, त्रिकोणी, वर्तुळांचे किंवा वर्तुळखंडांचे आणि इतर अनेक प्रकारचे विभाग पाडून किंवा आडवे, सरळ, उभे, वेडे-वाकडे किंबहुना भौमितिक आकाराचे आणि त्यांचे मिश्रण करुन अनेक प्रकारचे भाग पाडून त्यांपासून भिन्न प्रकारच्या कलावस्तू निर्माण करता येतात. हे विभाग समान व कमी-अधिक मापांचे तसेच लयबध्द साम्य साधून करता येत असल्यामुळे त्यांतून अनेक प्रकारचे आकार, मुखवटे, झाडे, फुले, प्राणी इत्यादींशी साम्य असलेल्या कलाकृती निर्माण होऊ शकतात तसेच कागदाच्या अनेक होडया व बोटी करण्यात येतात. कागदाची पिशवी करुन ती फटाक्यासारखी फोडतात. कागदाची विमाने, बाण, कोंबडा, बदक, बकरा, हंस, साप यांसारखे अनेक प्राणी बनविता येतात. कागदाच्या विविध प्रकारच्या टोप्याही तयार करता येतात. त्याप्रमाणे हलव्याच्या डब्या, पाकीटे, दौती, पिशव्या इ. उपयुक्त वस्तूही तयार होऊ शकतात. विविध प्रकारचे आकर्षक कागदी पतंग व वाऱ्यावर फिरणाऱ्या रंगीबेरंगी चक्ऱ्या सर्वपरिचित आहेतच. कागदाचा उपयोग अनेक प्रकारांची व आकारांची घरे, बंगले, किल्ले, मंदिरे, मोटारी, ट्रकसारखी वाहने, आकाशातील तारे, गमतीदार बाहुल्या, फुले, विविध खेळणी, चक्रे, मुखवटे, दिवे, नखचित्रे, चित्रचौकटी इ. तयार करण्याकडे कागदाचे काप कापून, त्यांच्या घड्या घालून, काउपलेले तुकडे पुन्हा चिकटवून किंवा वळवून भौमितिक आकाराच्या अनेक प्रकारच्या वेधक कलाकृती निर्माण करता येतात. तसेच कागदाचे पोकळ नळकांडे तयार करुन व त्यास काप देऊन त्याच्या घडया घालतात. त्या घडया नळकांडयाच्या वरच्या भागावरच चिकटवून अथवा पोकळ भागात दाबून किंवा काप दिलेल्या कागदाच्या गुंडाळ्या करुन त्यांतून असंख्य प्रकारचे नमुने तयार करता येतात. या कामासाठी कागदाचे पुठ्ठेही वापरण्यात येतात.

कागदी फुलदाणी

कागदी आकृतिबंध

 

 

 

 

 

 

 

 

 

 

क्रेप किंवा टिशू कागद गडद रंगाच्या पार्श्र्वभूमीवर चिकटवून व त्या कागदाच्या घड्या घालून अनेक आकर्षक रचना साधता येतात. या कामातही भूमितीचे ज्ञान उपयुक्त ठरते. तसेच कागदाचे कपटे अनेक प्रकारांत बसवूनही एखादी विशिष्ट रचना करता येते. हे कागद कापून व विशिष्ट ठिकाणी ताणून आणि ते ठराविका पध्दतींनी एकत्र करुन अत्यंत आकर्षक अशी चिनी पद्धतीची फुले-पाने यांची निर्मिती करता येते. त्याचप्रमाणे क्रेप व इतर कागदांचे चित्रविचित्र पोशाखही तयार करता येतात. मात्र हे कपडे अंगावर घातल्यानंतर त्या व्यक्तीला मोकळेपणाने हालचाल करणे अशक्य असते.

कागद-घडीचे कलाकाम (ओरिगामी) : कागद न कापता केवळ त्याला विविध घडया मारुन त्यांतून अनेक आकारांच्याआकृत्या तयार करता येतात. या पध्दतीचे मूळ प्राचीन काळी कपडयाला मारण्यात येणाऱ्या घडयांमध्ये दिसून येते. ही कला मूळची जपानीअसून तिला जपानी भाषेत `ओरिगामी’ नाव आहे. `ओरिगामी’ चा मूळ अर्थ कागदाच्या घडया असा आहे परंतु कालांतराने जपानमध्येकागदाच्या या विविध प्रकारच्या घडया घालण्याचे एक शास्त्रच निर्माण झाल्यामुळे `ओरिगामी’ ला आता कागदाच्या घडया घालण्याचे शास्त्रअसा विशिष्ट अर्थ प्राप्त झाला आहे. परंपरेने चालत आलेल्या हजारो घडयांच्या प्रकारांचा आणि तत्संबंधीच्या शास्त्रीय मांडणीचा ऊहापोहकान-नो-माडो या प्राचीन जपानी ग्रंथात केलेला आढळतो. `ओरिगामी’ चे स्लमानाने दोन विभाग पडतात. त्यापैकी पहिल्यात समारंभ प्रसंगी भेट म्हणून देण्यात येणाऱ्यावस्तूंचा व दुसऱ्यात पशू, पक्षी, मासे, फुले, मनुष्याकृती अथवाफर्निचर इत्यादींच्या प्रतिकृतींचा अंतर्भाव होतो. यापशुपक्ष्यांपैकी पाठीवर टिचकी मारताच टुणकन उडी मारणाराबेडूक किंवा शेपटी ओढताच आपले पंख पसरविणारा पक्षी, याजपानी कलाकृती अत्यंत नावाजलेल्या आहेत. दिवसेंदिवस याकलेत प्रगती होऊन भूमितीच्या साहाय्याने हे शास्त्र अतिशयसोपे बनविण्यात आले आहे. आधुनिक नवनवीन तंत्रांचा वापरकरुन चौकोनी कागदाऐवजी आता गोल, त्रिकोणी, पंचकोनी,षट्कोनी व अष्टकोनी असा विविध आकारांचा कागद वापरण्यातयेऊ लागला आहे. केवळ एका कागदाच्या तुकडयाला हातानेउलटसुलट घडया मारुन प्राण्यांचे सारे विश्व या कलेतून साकारकरता येते. चिमणी, कावळा, बगळा, कोंबडा, मोर, राजहंसआणि अस्वल, घोडा, हत्ती, सिंह, मांजर, ससा इ. पक्ष्यांप्रमाणेच टेबल, खुर्ची, कप, बशी, दिवे आणि डबे यांसारख्या विविध वस्तूही थोडयावेळात झटपट तयार करता येतात. या आधुनिक सोप्या व संकीर्ण पध्दतीने घडया मारुन तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तूंची शास्त्रीयमांडणी करणारी अनेक पुस्तके अलीकडील कलाकार अकिरा योशिझावा याने लिहिली आहेत.


कागदी उत्थित शिल्पे

१९३० नंतर स्पेन आणि दक्षिण अमेरिकेमध्येही या कलेचा प्रसार झाला परंतु या पौर्वात्य पध्दतीच्या पांढऱ्या कागदकामाऐवजी रंगीत कागदकामाची सुरुवात फ्रीड्रिख फ्रबेल याने जर्मनीमधील किंडर गार्टनमध्ये एकोणिसाव्या शतकात केली. तसेच बौहाउस या कलाविद्यालयात विद्यार्थ्यांना शिकविण्यात येणाऱ्या कमर्शिअल डिझाईन्ससाठी कागद घडीकामावर भर देण्यात आला आणि १९३९ मध्ये आर्थर एच्. स्ओन याने या कागद घडयांची `प्लेक्झॅगोल’ नामक विशिष्ट मांडणी शोधून काढली.

कागदी आकाशदिवा

कागदी शिल्पकाम व पारदर्शिका : कागदाच्या घडयांप्रमाणेच त्याचे काप कापून व त्याला दुमडून, गुंडाळून किंवा गुंफून विविध आकर्षक वस्तू तयार करता येतात. या वस्तू कोरीव शिल्पांप्रमाणे दिसत असल्यामुळे या कलाकामाला कागदी शिल्पकाम म्हणतात. या प्रकाराने विविध आकाराचे प्राणी, झाडे, मासे, मनुष्य इत्यादींच्या आकृती मुखवटे, कंदील, तोरणे व झुंबरे इ. विविध आकर्षक वस्तू तयार करता येतात. विशेषतः कागदाच्या निमुळत्या सुरळ्यापासून तयार केलेले प्राणी, कागदाचे काठ कापून तयार केलेल्या झालरीच्या वस्तू, कागदाच्या मध्यभागाला उभे चिरे देऊन केलेला गोल आकाराचा आकाशदिवा, लांबट वर्तुळाकार चिनी पध्दतीच्या `स्टिकटॉसिंग’ खेळाला उपयुक्त अशा केसेस, रंगीबेरंगी कागदांच्या पट्टया आडव्या उभ्या विणून तयार केलेली चटई इ. वस्तू मनोवेधक वाटतात. पारदर्शक कागदाच्या साहाय्यानेही विविध आकर्षक वस्तू तयार करता येतात. यात कादाचा हवा तो भाग कापून मागील बाजूस दुमडतात, त्यामुळे तीन विविध प्रकारच्या पारदर्शिका तयार होतात व त्यांच्या मागील बाजूस प्रकाशझोत टाकला की, त्या मनोवेधक दिसू लागतात. या प्रकारात विविध पक्षी, मासे यांच्या आकृती किंवा मनोवेधक आकृतिबंध करण्यात येतात.

संदर्भ : 1. Hils, Karl, Creative Crafts, London, 1965.

2. Rottger, Ernst, Creative Paper Craft, London, 1959.

3. Sperling, Walter, How to Make Things Out of Paper, London, 1961.

4. Zechlin, Ruth, Girl’s Book of Crafts, London, 1967.

गोखले, श्री.पु. जोशी, चंद्रहास


एक सुंदर कागदी बीहुली उत्थित कागदकलेचा एक नमुना.
कागदीतुकडे दुमडून केलेला मासा खेलण्यातील एक कागदी रंगमंच
कागदी कपटच्चांचा कुत्रा ओरिगामी : फुलपाखरु,पक्षी व हत्ती.
ओरिगामी : बदक व करकोचे.