समुद्री अर्चिन : हा एकायनोडर्माटा संघातील एकिनॉयडिया वर्गातील प्राणी होय. हे जवळजवळ सर्व समुद्रांत खडकाळ जागी किंवा चिखलात तसेच खोल पाण्यात आढळतात. काही खडक पोखरून तेथे राहतात, तर काही भरतीच्या वेळी बाहेर येतात व ओहोटीच्या वेळी लपून बसतात. त्यांचे मुख्य अन्न समुद्रातील वनस्पती व सूक्ष्म प्राणी होय. चिखल, वाळू यांत असलेला अन्नांश मिळविण्यासाठी ते चिखल व वाळूही खातात.

समुद्री अर्चिनात ⇨ सहभोजिता आढळते. यांच्या पाचन क्षेत्रात सहभोजी सिलिएट प्राणी आढळतात. इतरही काही सहभोजी प्राणी त्यांच्या शरीरात व शरीरावर आढळतात. मासे, खेकडे, काही पक्षी व काही सस्तन प्राणी हे यांचे मुःख्य शत्रू होत.

समुद्री अर्चिनाला बाहू नसतात. हे गोलाकार, अंडाकार किंवा चपटे असतात. गोलाकार समुद्री अर्चिनात अरीय (त्रिज्यीय) सममिती आढळून म्हणून त्यांना नियमबाह्य (अस्पष्ट) अर्चिन म्हणतात. अंडाकार व चपट्या अर्चीनात मूळ अरीय सममितीला द्वीपीर्श्व सममिती वेयापून टाकतेआ. 1. जांभळा समुद्री अर्चिन : ताठ काटयांमध्ये इकडेतिकडे पसरलेल्या बारीक संस्पर्शकासारख्या नालपादांमुळे समुद्री अर्चिन हालचाल करू शकतात. म्हणून त्यांना निमबाह्य (अस्पष्ट) अर्चिन म्हणतात. या नोंदीमध्ये नियमित अर्चिनाचे वर्णन केलेले आहे. याचे आंतरांग कवचामध्ये असते. कवच कॅल्शियममय पट्टांचे असते. कवचावर अनेक गुलिका असून त्यावर काटे असतात. शिवाय कवचावर तीन जबडयांच्या संदंशिका असतात. कवचावर एकाआड एक अशी पाच चरणार (वीथी) क्षेत्रे व पाच अंतराचरणार (अंतरावीथी) क्षेत्रे असतात. प्रत्येक क्षेत्रात पट्टांचे दोन स्तंभ असतात. वीथी क्षेत्रावर छिद्रे असून त्यामधून नालपाद बाहेर येतात. नालपादांमध्ये हा चालू शकतो. प्रत्येक वीथी क्षेत्र व अंतरावीथी क्षेत्र यांच्या वरच्या टोकाला एकेक पट्ट असतो. अंतराचरणार क्षेत्राच्या अशा प्रत्येक पट्टावर जननरंध असते. एका पट्टावर जास्त रंधे असतात. ही सर्व मिळून मॅड्नेपोराइट तयार होते.

आ. 2. प्रातिनिधिक समुद्री अर्चिनाचे कवच : काटे काढून टाकल्यानंतरचे पृष्ठीय दृश्य ( डावीकडील ) उघडलेले मुख आणि त्यामधील पाच दात दिसणारे अधर दृश्य (उजवीकडील).केंद्रीय मुख खालच्या बाजूला असते. गुदद्वारही केंद्रीय असून ते विरूद्ध दिशेला असते. नालपाद व मॅड्नेपोराइट हे बाहेरून दिसणारे जलसंवहनी तंत्राचे भाग होत. मुखाभोवती ॲरिस्टॉटलचा कंदील असतो. त्याचा उपयोग अन्नाचे चर्वण करण्यासाठी होतो. मुखाभोवती तंत्रिका (मज्जा) वलय असून त्यापासून पाच अरीय तंत्रिका निघतात. जननगंथी अपमुखाच्या आतल्या पृष्ठावर आंत्रयोजनीने जोडलेल्या असतात. निषेचन पाण्यात होते व निषेचित अंडयपासून प्लूटियस डिंभ तयार होतो [→ डिंभ भ्रूणविज्ञान]. श्वसन गिलांमुळे (क्लोमांव्दारे) होते, दहा गिल याच्या मुखामधून बाहेर डोकावत असतात. याच्या तुटलेल्या व अपाय झालेल्या भागांचे पुनरूज्जीवन होते.

पहा : एकायनोडर्माटा एकिनॉयडिया.

जोशी, मीनाक्षी