वैज्ञानिक संस्था व संघटना : ज्ञानविज्ञानांच्या वृद्धीकरिता एकत्र येणाऱ्या विद्वानांच्या संघटनेला अकादमी (ॲकॅडेमी) हे नाव इसवी सनापूर्वी वापरले जात असे. इ. स. पू. सहाव्या शतकातील पायथॅगोरस यांच्या अनुयायांनी स्थापन केलेली संघटना, इ. स. पू. तिसर्यास शतकाच्या सुरुवातीला ईजिप्तचे राजे पहिले टॉलेमी यांनी ॲलेक्झांड्रिया येथे स्थापन केलेले संग्रहालय आणि इ. स. पू. ३८७ मध्ये ग्रीक तत्त्वज्ञ प्लेटो यांनी स्थापन केलेले विद्यापीठ या आरंभीच्या संस्था होत. विद्वानांच्या संघटनांनी स्थापन केलेली यूरोपमधील ⇨ बोलोन्या विद्यापीठ, पॅड्युआ विद्यापीठ व ⇨ पॅरिस विद्यापीठ ही प्रारंभीची विद्यापीठे प्रसिद्ध होती. सोळाव्या व सतराव्या शतकांतील वैज्ञानिक क्रांतीनंतर मित्रांच्या अनौपचारिक मंडळांऐवजी निश्चित नियम व घटना असलेल्या रीतसर संघटना निर्माण होऊ लागल्या. या नव्या संघटना राष्ट्रीय पातळीवरच्या असून त्यांना बहुधा शासकीय मदत व मान्यता असे.
प्रबोधन काळानंतर यूरोपमधील काही देशांत स्थापन झालेल्या आरंभीच्या संस्था आणि त्यांची स्थापना-वर्षे पुढीलप्रमाणे आहेत : (१) Accademia Nazionale Dei Linci (रोम, १६०३) (२) Academie Francaise (फ्रेंच अकादमी पॅरिस, १६३५) (३) रॉयल सोसायटी (लंडन, १६६२) (४) The Preussische Academic Der Wissenschaften (बर्लिन, १७००) (५) The Academiya Nauk SSSR (१७२४) (६) Kungl Svenska Vetenskapsakademien (रॉयल स्वीडिश ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस स्टॉकहोम, १७३९).
वैज्ञानिक ज्ञानाची वाढ करणे हा सर्व वैज्ञानिक संस्थांचा हेतू असतो. तथापि उद्दिष्टे, घटना, विषय-क्षेत्रे व प्रत्यक्ष कार्याचे स्वरूप यांबाबतीत त्यांत खूपच विविधता व वैशिष्ट्ये दिसून येतात.
वैज्ञानिक संघटनांची सर्वसाधारण कार्ये पुढीलप्रमाणे असतात : वैज्ञानिक ज्ञानाचे जतन व संवर्धन करणे व्याख्याने, परिसंवाद, चर्चासत्रे, प्रात्यक्षिके, प्रदर्शने इत्यादींचे आयोजन करणे वार्षिक अधिवेशन, बैठका व परिषदा भरविणे वैज्ञानिक व तांत्रिक माहिती प्रसिद्ध करणे विविध प्रकारच्या व विशेषत: नवीन क्षेत्रातील संशोधनाला उत्तेजन देणे सहकारी संशोधन पुरस्कृत करणे परदेशी वैज्ञानिक संस्थांशी रीतसर विनिमय करार करणे सरकारला व इतर संस्थांना वैज्ञानिक सल्ला देणे जनतेत विज्ञानाबद्दल आवड निर्माण करणे शास्त्रज्ञांच्या हिताचे रक्षण करणे असामान्य गुणवत्तेच्या व्यक्तींना पदके, अधिव्याख्याता पदे, संशोधन नेमणुका यांचा मान देणे अधिछात्रवृत्ती व शिष्यवृत्ती प्रदान करणे इत्यादी.
संशोधन संस्थांची कार्ये पुढीलप्रमाणे असतात : नैसर्गिक साधनसंपत्तीचा देशाच्या आर्थिक विकासासाठी प्रभावी व परिणामकारक रीतीने वापर करून घेण्याच्या दृष्टीने संशोधन करणे दुर्मीळ अगर टंचाई असलेल्या साधनसामग्रीला पर्यायी ठरू शकणाऱ्या साधनसामग्रीचा शोध घेणे कच्च्या देशी मालाला साजेशी नवीन उत्पादने व प्रक्रिया-तंत्रे विकसित करण्यासाठी संशोधन करणे उद्योगधंद्यांत वापरण्यासाठी कमी दर्जाच्या द्रव्यांचा दर्जा सुधारण्याच्या दृष्टीने अभिशोधन तंत्राचा विकास करणे अणुऊर्जेचा शांतता कार्यासाठी उपयोग करण्यासाठी संशोधन करणे आंतरराष्ट्रीय सहकार्याने अवकाश-अन्वेषण करणे इत्यादी. अन्न, वनस्पती, औषधे यांपासून भौतिकी, रसायनशास्त्रासह अणू व अंतराळ यांपर्यंतचे विषय संशोधनात समाविष्ट आहेत. मूलभूत व अनुप्रयुक्त असे दोन्ही प्रकारचे संशोधन या संस्थांतून होते. पदव्युत्तर अध्ययन व संशोधन यांसाठी अनेक संशोधन संस्थांना विद्यापीठांची मान्यता मिळाली आहे.
भारतामध्ये संशोधन कार्य पुढील प्रकारच्या संस्थांमध्ये केले जाते : केंद्रीय शासनाच्या निरनिराळ्या विभागांच्या अखत्यारीखाली असलेल्या संशोधन संस्था अथवा राष्ट्रीय प्रयोगशाळा, विविध राज्य शासकीय संशोधन प्रयोगशाळा, विद्यापीठीय प्रयोगशाळा, ना-नफा तत्त्वावरील संस्था/संघटना आणि खाजगी क्षेत्रातील संशोधन व विकास कार्ये करणाऱ्या प्रयोगशाळा.
भारतातील व जगातील प्रमुख वैज्ञानिक संस्था व संघटना यांवर मराठी विश्वकोशात यथास्थळी स्वतंत्र नोंदी आहेत. इतरही संबंधित नोंदींतून त्यांची कमीअधिक माहिती आलेली आहेत. प्रस्तुत नोंदींत भारतातील वैज्ञानिक संस्था व संघटना यांची विषयवार विभागणी केली आहे. तसेच परदेशातील काही अकादमी व संघटनांची आणि संशोधन संस्थांची माहिती दिली आहे. नोंदींमध्ये कार्यालयाचे ठिकाण, स्थापना वर्ष (स्था.), सभासद संख्या (सभा), काहींचे कार्य/उद्दिष्ट, ग्रंथालय (ग्रंथा.) व त्यातील पुस्तके, ग्रंथ इत्यादींची संख्या, प्रकाशने यांसंबंधीची माहिती दिलेली आहे. प्रकाशनांसाठी मासिक (मा.), द्वैमासिक (द्वै.), त्रैमासिक (त्रै.) व वार्षिक (वा.) यांचे कंसातील संक्षेप वापरले आहेत.
भारतातील अकादमी
(१) नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस : अलाहाबाद स्था. १९३० विज्ञानाच्या सर्व शाखांचा विकास करणे व त्यांना चालना देणे २,५८० सभा., याव्यतिरिक्त ७३२ अधिछात्र (फेलो), ४८ मानसेवी अधिछात्र व २३ परदेशी अधिछात्र प्रकाशने-प्रोसिडिंग्ज इन फिजिकल सायन्सेस, प्रोसिडिंग्ज इन बायॉलॉजिकल सायन्सेस (त्रै.), नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस लेटर्स (मा.), ॲन्युअल नंबर (वा.), (२) इंडियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस : बंगलोर स्था. १९३४ ७१४ अधिछात्र, ४९ मानसेवी अधिछात्र, ३६ सहयोगी प्रकाशन – प्रोसिडिंग्ज केमिकल सायन्सेस (द्वै.), प्रोसिडिंग्ज अर्थ अँड प्लॅनेटरी सायन्सेस (त्रै.), प्रोसिडिंग्ज मॅथेमॅटिकल सायन्सेस, प्रमाण (भौतिकीचे मासिक), जर्नल ऑफ बायोसायन्सेस (त्रै.), बुलेटिन मटेरियल्स सायन्स (त्रै.), साधना (अभियांत्रिकीय विज्ञाने, त्रै.), जर्नल ऑफ जेनेटिक्स (त्रै.), करंट सायन्स (पाक्षिक), पत्रिका (बातमीपत्र), इअरबुक. (३) इंडियन नॅशनल सायन्स ॲकॅडेमी : नवी दिल्ली स्था. १९३५ वैज्ञानिक ज्ञानात वाढ करणे, वैज्ञानिक समित्यांमध्ये सहकार्य घडवून आणणे आणि भारतातील शास्त्रज्ञांच्या हिताचे रक्षण करणे ⇨ इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्सची (ICSU) अभिलग्न संघटना ६५६ अधिछात्र, ११८ परदेशी अधिछात्र २१,००० ग्रंथ प्रकाशने – प्रोसिडिंग्ज, मोनोग्राफ्स, बुलेटिन, प्रोग्रेस ऑफ सायन्स इन इंडिया, इंडियन जर्नल ऑफ हिस्टरी ऑफ सायन्स, इअरबुक, इंडियन जर्नल ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स, बायोग्राफिकल मेम्वार्स. (४) राजस्थान ॲकॅडेमी ऑफ सायन्स : बिर्ला महाविद्यालय, पिलानी स्था. १९५१ प्रकाशन – प्रोसिडिंग्ज. (५) ॲकॅडेमी ऑफ झोऑलॉजी : आग्रा स्था. १९५४ १,५०० सभा. ९१,००० ग्रंथ इतर प्राणिवैज्ञानिक संस्थांशी देवाणघेवाण प्राणिवैज्ञानिक विकासाकरिता आंतरराष्ट्रीय संघटना व चर्चापीठ प्रकाशन – द ॲनल्स ऑफ झोऑलॉजी. (६) इंडियन नॅशनल ॲकॅडेमी ऑफ एंजिनिअरिंग : नवी दिल्ली स्था. १९८७ अभियांत्रिकी व तंत्रविद्या आणि संबंधित विज्ञाने किंवा प्रणाली यांच्या प्रगतीला चालना देणे अधिछात्रवृत्ती व शिष्यवृत्ती प्रदान करते १२८ अधिछात्र. (७) नॅशनल ॲकॅडेमी ऑफ मेडिकल सायन्सेस : नोंदणीकृत संस्था वैद्यकीय विज्ञानांची वाढ होण्यास चालना देणे हे उद्दिष्ट ॲकॅडेमीचे अधिछात्र व सदस्य म्हणून निवड करून विशेष बुद्धिमत्ता आणि गुणवत्ता यांना मान्यता देणे वैद्यकीय व्यावसायिकांना नवीन समस्यांसंबंधी जाणीव करून देणे व त्यांचे ज्ञान अद्ययावत करणे १९८२पासून कन्टिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन हा कार्यक्रम कार्यान्वित करते.
भारतातील शास्त्रज्ञांच्या व व्यावसायिकांच्या संघटन
कृषी व पशुवैद्यक : (१) ॲग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ इंडिया : कोलकाता स्था. १८२० १,३०० सभा. ४०० ग्रंथ प्रकाशन – हॉर्टिकल्चरल जर्नल (त्रै.). (२) ऍग्री-हॉर्टिकल्चरल सोसायटी ऑफ मद्रास : चेन्नई स्था १८३५ ३,४१० सभा. आश्रयदाता – तमिळनाडू राज्याचे राज्यपाल. (३) इंडियन सोसायटी ऑफ सॉइल सायन्स : नवी दिल्ली स्था. १९३४ मृदाविज्ञान आणि मृदेशी संलग्न शास्त्रे यांचा विकास करणे व त्यांना चालना देणे, तसेच मृदाविज्ञान आणि अनुप्रयुक्ती यांच्या ज्ञानाचा प्रसार करणे, इंटरनॅशनल सोसायटी ऑफ सॉइल सायन्स आणि त्यांसारख्या संघटना यांच्याशी सहकार्य करणे १,९६६ सभा. प्रकाशने – जर्नल (त्रै.), बुलेटिन (प्रासंगिक). (४) इंडियन सोसायटी ऑफ ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स : मुंबई स्था. १९७४ व्याख्याने, परिसंवाद, प्रकाशने यांच्या माध्यमातून पीक सुधारासंबंधीच्या ज्ञानाचा प्रसार करणे, तसेच सहली व समन्वेषण यांची आखणी करणे आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघटनांशी सहकार्य करणे २०० सभा. प्रकाशन-क्रॉप इंप्रुव्हमेंट (वर्षातून दोनदा). (६) इंडियन डेअरी ॲसोसिएशन : नवी दिल्ली ३,००० सभा. ३,२०० ग्रंथ प्रकाशने – इंडियन जर्नल ऑफ डेअरी सायन्स (मा.), इंडियन डेअरीमन (मा.), डेअरीइंग इन इंडिया (दर वर्षी). [→ कृषि संस्था].
जीवविज्ञाने : (१) असोसिएशन ऑफ मायक्रोबायोलॉजिस्ट्स ऑफ इंडिया : नवी दिल्ली स्था.१९३८ १,२०० सभा. ३०० ग्रंथ प्रकाशन – इंडियन जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजी. (२) बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटी : मुंबई स्था. १८८३ प्रकृतिविज्ञान, परिस्थितीविज्ञान आणि भारतीय उपखंडातील वन्य पशूंचे संरक्षण व संवर्धन या विषयांचा अभ्यास, प्राणिविज्ञान क्षेत्रात संशोधन कार्यक्रम ४,००० सभा. १३,००० ग्रंथ प्रकाशने – जर्नल, हॉर्नबिल. [→ बाँबे नॅचरल हिस्टरी सोसायटी]. (३) सोसायटी ऑफ बायोलॉजिकल केमिस्ट्स इंडिया : बंगलोर स्था. १९३० १,६०० सभा. प्रकाशने – बायोकेमिकल रिव्ह्यूज (दर वर्षी), प्रोसिडिंग्ज अँड ॲबस्ट्रॅक्ट्स (दर वर्षी), न्यूजलेटर (त्रै.). (४) झोऑलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया : कोलकाता स्था. १९१६ ३७,१०० ग्रंथ व ८७५ नियतकालिके. (५) इंडियन सोसायटी ऑफ जेनेटिक्स अँड प्लँट ब्रीडिंग : नवी दिल्ली स्था. १९४१ वनस्पति-प्रजनन आणि आनुवंशिकी यांमध्ये संशोधन १,४०० सभा. प्रकाशन-जर्नल. (६) इंडियन फायटोपॅथॉलॉजिकल सोसायटी : नवी दिल्ली स्था. १९४७ १,७२० सभा. विषाणुशास्त्र, सूक्ष्मजंतुशास्त्र, कवकविज्ञान, सूत्रकृमिविज्ञान आणि वनस्पतिरोगविज्ञान यांचे अध्ययन चर्चासत्रे, परिसंवाद इ. भरविते. प्रकाशन – इंडियन फायटोपॅथॉलॉजी (त्रै.). (७) मरीन बायोलॉजिकल असोसिएशन ऑफ इंडिया : कोचिन स्था. १९५८ प्रकाशने – जर्नल (वर्षातून २ वेळा), मेम्वार्स (अनियमित), प्रोसिडिंग्ज ऑफ सिम्पोसिया (अनियमित). (८) पॅलिनॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया : तिरुवनंतपुरम्, केरळ स्था. १९६५ परागविज्ञानविषयक परिसंवाद, चर्चासत्रे, वार्षिक व्याख्याने भरविते तसेच इंडियन पॅलिनॉलॉजिकल कॉन्फरन्स प्रत्येक तीन वर्षांनी भरविते, ६० सभा. प्रकाशन – जर्नल ऑफ पॅलिनॉलॉजी. (९) इंडियन बायोफिजिकल सोसायटी : कोलकाता स्था. १९६५ २०० सभा. प्रकाशन – प्रोसिडिंग (दर वर्षी). (१०) इंडियन असोसिएशन ऑफ बायोलॉजिकल सायन्सेस : कोलकाता स्था. १९६८ ४०० सभा. प्रकाशन – इंडियन बायोलॉजिस्ट (वर्षातून २ वेळा). (११) उत्तर प्रदेश झोऑलॉजिकल सोसायटी : मुझफरनगर स्था. १९८१ १२५ सभा. प्रकाशन – उत्तर प्रदेश जर्नल ऑफ झोऑलॉजी (वर्षातून २ वेळा). (१२) इंडियन बोटॅनिकल सोसायटी : चेपौक, चेन्नई प्रकाशन – जर्नल. [→ प्राणिवैज्ञानिक संस्था व संघटना वनस्पतिवैज्ञानिक संस्था आणि संघटना].
वैद्यक : (१) द इंडियन मेडिकल असोसिएशन : (IMA). नवी दिल्ली स्था. १९२८ ८५,००० सभा. प्रकाशने-जर्नल (मा.), युवर हेल्थ (मा.), आयएमए न्यूज (मा.) द ब्रिटिश मेडिकल असोसिएशन, द नेपाल मेडिकल असोसिएशन आणि द कॉमेनवेल्थ मेडिकल असोसिएशन यांच्याशी संलग्न साऊथ एशियन मेडिकल असोसिएशनची सभासद संस्था. (२) मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया : (MCI). नवी दिल्ली स्था. १९३४ इंडियन मेडिकल कौन्सिल ॲक्ट १९५६च्या अधिनियमान्वये पुनर्घटन वैद्यकीय शिक्षणामधील एकसमान मानकांचे संधारण इतर देशांबरोबर वैद्यकीय गुणवत्तेची अन्योन्यता ठरविणे इंडियन मेडिकल रजिस्टरमध्ये नोंदी व्यवस्थित ठेवणे प्रकाशने – इंडियन मेडिकल रजिस्टर, एमसीआय बुलेटिन ऑफ इन्फर्मेशन, रिपोर्ट ऑफ द प्रोग्रॅम ऑन कन्टिन्यूइंग मेडिकल एज्युकेशन. (३) ऑल इंडिया ऑप्थॅल्मॉलॉजिकल सोसायटी : नवी दिल्ली स्था. १९३७ समाजाला सेवा देण्याकरिता नेत्रवैद्यकीय विज्ञानांचा अभ्यास व प्रशिक्षण यांचा विकास करणे व त्याला चालना देणे, तसेच नेत्रवैद्यकांमध्ये सामाजिक सहभाग वाढविण्यास प्रोत्साहन देणे सभा. ६९० प्रकाशने – इंडियन जर्नल ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी (त्रै.). (४) असोसिएशन ऑफ सर्जन्स ऑफ इंडिया : चेन्नई स्था. १९३८ ६,५०० सभा. १२,००० ग्रंथ. प्रकाशन – इंडियन जर्नल ऑफ सर्जरी (मा.) (५) इंडियन सोसायटी ऑफ ॲनस्थेशिस्ट्स : मुंबई स्था. १९४७ ४,००० सभा. प्रकाशन – इंडियन जर्नल ऑफ ॲनस्थेशिया (द्वै.). (६) फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया : नवी दिल्ली स्था. १९४९ औषधनिर्माणशास्त्रामधील गुणवत्ता व नोंदणी याकरिता शैक्षणिक मानके ठरविणे, व्यवसायाला सहकार्य करणे. (७) इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन : मुंबई ६,००० सभा. प्रकाशने-इंडियन जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस (द्वै.), फार्माटाइम्स (मा.). (८) फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनीकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया : मुंबई स्था. १९५० प्रसूतिविद्या व स्त्रीरोगविज्ञान या विषयांच्या विविध बाजूंमधील विचारप्रणालींची देवाणघेवाण करण्याकरिता वार्षिक महासभेचे आयोजन, तसेच कुटुंबनियोजनावरील कार्यशाळा इत्यादींचे आयोजन वैद्यकीय शैक्षणिक कार्यक्रम, आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे नियमित भरविते १०,००० सभा. प्रकाशन – जर्नल ऑफ ऑब्स्टेट्रिक्स अँड गायनीकॉलॉजी ऑफ इंडिया (द्वै.). (९) इंडियन कॅन्सर सोसायटी : मुंबई स्था. १९५१ देणग्यांवर आधारीत धर्मादाय न्यास उद्दिष्ट्ये : कर्करोगावरील संशोधनाला मदत करणे, कर्करोगाने पछाडलेल्यांना मदत करणे, रोगनिदान, उपचार व पुनर्वसन यांकरिता सुविधांमध्ये सुधारणा करणे, जनतेला आणि व्यवसाय करणार्यांछना शिक्षण देणे, राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणे दक्षिण मुंबईमध्ये ‘निदान, उपचार आणि संशोधन केंद्र’ (लेडी रतन टाटा मेडिकल अँड रिसर्च सेंटर). प्रकाशन – इंडियन जर्नल ऑफ कॅन्सर (त्रै.). (१०) इंडियन पब्लिक हेल्थ असोसिएशन : कोलकाता स्था. १९५७ सार्वजनिक आरोग्य आणि संबंधित विज्ञाने यांना चालना देणे, वार्षिक अधिवेशन, बैठका, परिषदा भरविणे १९५० सभा. प्रकाशन – इंडियन जर्नल ऑफ पब्लिक हेल्थ (त्रै.) (११) असोसिएशन ऑफ मेडिकल फिजिसिस्ट्स ऑफ इंडिया : (AMPI). मुंबई स्था. १९७६ ६८० सभा. वैद्यकीय भौतिकीविज्ञ, प्रारण अर्बुदशास्त्रज्ञ आणि या क्षेत्रात आवड असलेले इतर जण या संस्थेचे प्रतिनिधित्व करतात ही संस्था वार्षिक परिषदा, कार्यशाळा, व्याख्याने, पारितोषिके, संशोधनाकरिता अनुदाने, भारतामधील प्रवासी अधिछात्रवृत्ती यांचे आयोजन करते प्रकाशने – एएमपीआय मेडिकल फिजिक्स बुलेटिन (त्रै.), जर्नल ऑफ मेडिकल फिजिक्स (त्रै.). (१२) इंडियन सोसायटी फॉर मेडिकल स्टॅटिस्टिक्स : (ISMS). नवी दिल्ली स्था. १९८३ वैद्यकीय सांख्यिकीचा (संख्याशास्त्राचा) विकास करणे आणि वैद्यक, आरोग्य व संबंधित शास्त्र यांमध्ये सांख्यिकीचा वापर करण्यावर जोर देणे वार्षिक परिषदा, उजळणी पाठ्यक्रम आणि परिसंवाद यांचे आयोजन करते प्रकाशने -आयएसएमएस न्यूज लेटर, वर्षिक बैठकांचे कार्यवृत्तान्त व प्रबंधिका यांचे प्रकाशन. (१३) बॉम्बे मेडिकल युनियन : मुंबई स्था. १८८३२५० सभा. (१४) हेल्मिन्थॉलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया : (कृमिविज्ञानासंबंधी संस्था). मथुरा प्रकाशन -इंडियन जर्नल ऑफ हेल्मिन्थॉलॉजी (वर्षातून २ वेळा). (१५) इंडियन असोसिएशन ऑफ पॅरासायटॉलॉजिस्ट्स : (परजीवीवैज्ञानिकांची संस्था). कोलकाता. (१६) डेंटल कौन्सिल ऑफ इंडिया : द डेंटिस्ट्स ॲक्ट १९४८ या अधिनियमानुसार स्थापना देशामधील दंतवैद्यक शिक्षण, व्यवसाय आणि नीतितत्त्वे यांचे विनियमन करणे हे मुख्य उद्दिष्ट. (१७) इंडियन नर्सिंग काउन्सिल : इंडियन नर्सिंग काउन्सिल ॲक्ट १९४७ या अधिनियमानुसार स्थापन झालेली सांविधिक संस्था. परिचर्या शिक्षणाची किमान मानके ठरविते आणि विविध परिचऱ्या अभ्यासक्रमांचे पाठ्यक्रम आणि आचारनियम विहित करते. [→ वैद्यकीय संस्था व संघटना].
गणित : (१) आलाहाबाद मॅथेमॅटिकल सोसायटी : अलाहाबाद स्था. १९५८ गणितातील विविध शाखांमधील (सैद्धान्तिक भौतिकी आणि गणितीय सांख्यिकी यांच्यासह) प्रगत अध्ययन आणि संशोधन यांकरिता प्रोत्साहन देणे २७० सभा. ५,००० ग्रंथ प्रकाशने – इंडियन जर्नल ऑफ मॅथेमॅटिक्स (वर्षातून ३ वेळा), बुलेटिन ऑफ व अलाहाबाद मॅथेमॅटिकल सोसायटी (दर वर्षी), लेक्चर नोट्स सेरीज, कम्युनिकेशन इन थिऑरेटिकल फिजिक्स. (२) कोलकाता मॅथेमॅटिकल सोसायटी : कोलकाता स्था. १९०८ गणितीय विज्ञानांतील विशेष व्याख्याने, चर्चासत्रे व परिसंवाद यांचे आयोजन, संशोधन प्रकल्प राबविणे ४३६ सभा. ८,५९५ ग्रंथ प्रकाशने – बुलेटिन (द्वै.). न्यूज बुलेटिन (मा.). (३) भारत गणित परिषद : (पूर्वीचे नाव बनारस मॅथेमॅटिकल सोसायटी). लखनौ स्था. १९५० ४५० सभा. १५,५०० ग्रंथ प्रकाशन – गणित. (४) इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटी : नवी दिल्ली स्था. १९०७ ९०० सभा. ४,००० ग्रंथ प्रकाशने – जर्नल, मॅथेमॅटिक्स स्ट्यूडंट. [→ गणितीय संस्था व नियतकालिके].
भौतिकीय विज्ञाने : (१) इंडियन केमिकल सोसायटी : कोलकाता स्था. १९२४ २,००० सभा. १०,५०० ग्रंथ प्रकाशन -जर्नल (मा.). (२) इंडियन फिजिकल सोसायटी : कोलकाता स्था. १९३४ भारतामध्ये भौतिकीय विज्ञान-विषयांना चालना देणे ३७५ आजीव सभा. १५० सामान्य सभा. १० सहसभासद, ८ मानसेवी सभा. प्रकाशने – फिजिक्स टीचर (त्रै.), प्रोसिडिंग्ज, रिपोटर्स, मोनोग्राफ्स. (३) द इलेक्ट्रोकेमिकल सोसायटी ऑफ इंडिया : बंगलोर स्था. १९६४ विद्युत्-रसायनशास्त्र, विद्युत्-निक्षेपण व विलेपन, उच्च तापमान ऑक्सिडीकरणासहित क्षरण, विद्युत्-धातुविज्ञान व धातू अंत्यरूपण, अर्धसंवाहक व इलेक्ट्रॉनिकी, विद्युत्-घट, घन-विद्युत् विच्छेद्य, घन अवस्था विद्युत्-रसायनशास्त्र आणि वातावरणीय हल्ल्यापासून धातूंचे व द्रव्यांचे संरक्षण या विषयांना चालना देणे ६४० सभा. ४,००० ग्रंथ प्रकाशने – जर्नल (त्रै.) (४) द ऑप्टिकल सोसायटी ऑफ इंडिया : कोलकाता स्था. १९६५ प्रकाशकीच्या सर्व शाखांमध्ये (शुद्ध व अनुप्रयुक्त) प्रकाशकीसंबंधीच्या ज्ञानाचा प्रसार करणे व त्यांना चालना देणे ४१० सभा. ७०० ग्रंथ प्रकाशन – जर्नल ऑफ ऑप्टिक्स (त्रै.). (५) ॲस्ट्रॉनॉमिकल सोसायटी ऑफ इंडिया : हैदराबाद स्था. १९७३ ७५० सभा. प्रकाशने – बुलेटिन (त्रै.), मेम्वार्स (प्रासंगिक). [→ भौतिकी रसायनशास्त्र ज्योतिषशास्त्र].
तंत्रविद्या : (१) इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया): कोलकाता स्था. १९२० १९३५ साली कायदेशिर मान्यता (राजसनद प्राप्त) अभियांत्रिकीच्या विविध शाखांत व उद्योगांत शैक्षणिक व मार्गदर्शक कार्य ३,००,००० सभा. ६० ग्रंथालये प्रकाशने – बुलेटिन, जर्नल. [→ इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया)]. (२) जिऑलॉजिकल, मायनिंग अँड मेटॅलर्जिकल सोसायटी ऑफ इंडिया : कोलकाता स्था. १९२४ ३१५ सभा. प्रकाशने – जर्नल (त्रै.), बुलेटिन. (३) इंडिया सोसायटी ऑफ इंजिनियर्स : कोलकाता स्था. १९३४ २०,००० ग्रंथ ८,००० सभा. प्रकाशन – सायन्स अँड इंजिनिअरिंग (मा.). (४) द इंडियन इन्स्टिट्युट ऑफ मेटल्स : कोलकाता स्था. १९४६ १०,००० सभा. प्रकाशने – ट्रँझॅक्शन्स (द्वै.), मेटल न्यूज (द्वै.). (५) द एरॉनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया : नवी दिल्ली स्था. १९४८ वैमानिकीय विज्ञाने व विमान अभियंत्रिकी या विषयांच्या ज्ञानाचा प्रसार करणे व त्याला चालना देणे वैमानिकीय व्यवसायाचा विकास करणे २,५०० सभा. ४,००० ग्रंथ. प्रकाशन -जर्नल (त्रै.). (६) इन्स्टिट्युशन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन एंजिनियर्स : (IETE). नवी दिल्ली स्था. १९५३ इलेक्ट्रॉनिकी, दूरसंदेशवहन व त्यांच्याशी संबंधित क्षेत्रे यांच्या विकासाला चालना देणे ४०,००० सभा. प्रकाशने – आयइटीइ जर्नल (द्वै.), आयइटीइ टेक्निकल रिव्ह्यू (द्वै.), आयइटीइ स्ट्युडंट्स जर्नल (त्रै.). (७) मिनरॅलॉजिकल सोसायटी ऑफ इंडिया : म्हैसूर स्था. १९५९ परिषदा, बैठका आणि चर्चासत्रे भरवून, तसेच संशोधनाच्या साहाय्याने स्फटिकविज्ञान, खनिजविज्ञान, शिलाविज्ञान इ. विषयांच्या ज्ञानाचा विकास करणे ४०० सभा. १,५०० ग्रंथ: प्रकाशन – द इंडियन मिनरॅलॉजिस्अ. (८) इंडियन असोसिएशन ऑफ जिओहायड्रॉलॉजिस्ट्स : कोलकाता स्था. १९६४ ४४० सभा. प्रकाशन – इंडियन जिओहायड्रॉलॉजी. (९) इंडियन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनियर्स : (ISME). नवी दिल्ली स्था. १९७५ ४८० सभा. प्रकाशने – जर्नल ऑफ इंजिनिअरिंग प्रॉडक्शन (त्रै.), जर्नल ऑफ थर्मल इंजिनिअरिंग (त्रै.), जर्नल ऑफ इंजिनिअरिंग डिझाइन (त्रै.).
इतर संघटना : (१) मराठी विज्ञान परिषद : मुंबई स्था. १९६६ विज्ञानप्रेमी नागरिकांची संघटना पुणे व महाराष्ट्रातील अनेक शहरांत आणि महाराष्ट्राबाहेर हैदराबाद व बडोदे येथे स्वायत्त विभाग स्वायत्त विभागांत सुसूत्रता व समन्वय साधण्याकरिता ‘मराठी विज्ञान महासंघ’ या संघटनेची १९७७ मध्ये स्थापना मराठी भाषिक जनतेत विज्ञानाचा प्रसार करणे, वैज्ञानिक प्रबोधन करणे हे हिचे उद्देश विविध वैज्ञानिक विषयांवर सुबोध व्याख्याने, परिसंवाद, चर्चा, प्रात्यक्षिके, प्रदर्शने, शिबिरे, सहली इत्यादींचे आयोजन मराठी विज्ञान महासंघ व स्थानिक स्वायत्त विभाग एकत्र किंवा स्वतंत्रपणे वार्षिक संमेलन भरवितात. प्रकाशने – ‘मराठी विज्ञान परिषद, मुंबई’ या संघटनेचे मराठी विज्ञान परिषद पत्रिका, ‘मराठी विज्ञान महासंघाचे’ मराठी महासंघ विज्ञान. [→ मराठी विज्ञान परिषद]. (२) महाराष्ट्र ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस : पुणे स्था. १९७५ सभासदत्वाचे प्रकार – संस्था सभासद, सहसभासद, संघसभासद, दातेरू आश्रयदाते व प्रतिवार्षिक सभासद महाराष्ट्रात विज्ञान व तंत्रविद्या यांचे संवर्धन त्यांच्या अनुप्रयुक्त्यांसह करणे विविध प्रकारचे वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक प्रकल्प हाती घेणे संशोधनात्मक लेख, अहवाल व ग्रंथ यांचे प्रकाशन करणे वगैरे. (३) इंडियन सायन्स काँग्रेस असोसिएशन : कोलकाता स्था. १९१४ भारतामध्ये विज्ञानाला प्रोत्साहन देणे, त्यामध्ये प्रगती करणे, वार्षिक महासभा भरविणे १०,००० सभा. ५,७०० ग्रंथ, ४० नियतकालिके प्रकाशने – प्रोसिडिंग्ज (दर वर्षी ४ भागांमध्ये), प्रोग्रेस ऑफ सायन्स इन इंडिया, रिव्ह्यूज (प्रासंगिक), एव्हरीमॅन्स सायन्स (द्वै.). [→ भारतीय विज्ञान परिषद संस्था].
परदेशातील अकादमी व संघटना
स्वीडन : (१) नोबेल फाउंडेशन : (Nobelstiftelsen). स्टॉकहोम स्था. १९०० आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल यांच्या मृत्युपत्रातील तरतुदींनुसार निर्माण करून स्थापन झालेले प्रतिष्ठान. या प्रतिष्ठानने ठरविल्यानुसार पाच विशिष्ट कार्यांसाठी व्यक्तींना वा संस्थांना रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. या पारितोषिकांचे वितरण दर वर्षी १० डिसेंबरला (आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी) केले जाते. प्रकाशने – द नोबेल प्राइझेस (वा.), नोबेल फाउंडेशन डिरेक्टरी (द्वैवार्षिक), कोड ऑफ स्टॅट्युट्स, नोबेल लेक्चर्स, ॲन्युअल रिपोर्ट, Publications de l’Institut Nobel Norvegien [→ नोबेल, आल्फ्रेड बेअरनार्ड नोबेल पारितोषिके]. (२) रॉयल स्वीडि ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस : (Kungl Svenska Vetenskapsakademien). स्टॉकहोम स्था. १७३९ गणित व भौतिकीय विज्ञानांच्या विकासाकरिता भौतिकी, रसायनशास्त्र व अर्थशास्त्र या विषयांतील नोबेल पारितोषिके, तसेच गणित, ज्योतिषशास्त्र, भूविज्ञाने, जीवविज्ञाने किंवा संधिशोध या विषयांकरिता क्रॅफर्ड पारितोषिके प्रदान करते ३४० सभा. १६१ परदेशी सभा. प्रकाशने – ॲक्टा मॅथेमॅटिका, ॲक्टा झोऑलॉजिका, Arkiv for Matematik Physica Scripta, Zoologica Scripta, Ambio, Documenta.
युनायटेड किंग्डम : (१) रॉयल सोसायटी : लंडन पूर्ण नाव ‘द रॉयल सोसायटी ऑफ लंडन फॉर इंप्रुव्हिंग नॅचरल नॉलेज’ निसर्गविषयक ज्ञानाच्या वाढीकरिता १६६० साली स्थापना १६६२ साली पहिल्या सनदेस कायद्याने मान्यता १,०८७ अधिछात्र, १०० परदेशी सभासद प्रकाशने – फिलॉसॉफिकल ट्रँझॅक्शन्स, प्रोसिडिंग्ज, ऍन्युअल रिपोर्ट, इअरबुक, बायोग्राफिकल मेम्वार्स ऑफ फेलोज, नोट्स अँड रेकॉडर्स, बुलेटिन्स इत्यादी. [→ रॉयल सोसायटी]. (२) रॉयल सोसायटी ऑफ एडिंबरो : एडिंबरो विज्ञान व साहित्य यांच्या वाढीकरिता १७८३ साली स्थापना सु. १,००० अधिछात्र, ७० मानसेवी अधिछात्र, प्रकाशने -प्रोसिडिंग्ज : सेक्शन ए (मॅथेमॅटिक्स), सेक्शन बी (बायोलॉजिकल सायन्सेस), ट्रँझॅक्शन्स (अर्थ सायन्सेस), इअरबुक. (३) रॉयल ॲकॅडेमी ऑफ इंजिनिअरिंग : लंडन अभियांत्रिकीमधील संघटना म्हणून १९७६ साली स्थापना १९८३ साली कायद्याने मान्यता १९९२ साली चालू नामाभिधान मानवाच्या कल्याणासाठी वैज्ञानिक प्रगतीत वाढ करण्याकरिता अभियांत्रिकीच्या संपूर्ण क्षेत्रातील उत्कृष्ट गोष्टींना प्रोत्साहन देणे ९७५ अधिछात्र, ५७ परदेशी सभासद आणि १२ मानसेवी अधिछात्र प्रकाशने -ऍन्युअल रिपोर्ट, न्यूजलेटर (त्रै.), न्यूजलेटर फॉर हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूशन्स, लेक्चर्स इत्यादी. (४) रॉयल इन्स्टिट्यूशन ऑफ ग्रेट ब्रिटन : लंडन वैज्ञानिक ज्ञानाच्या वाढीकरिता आणि व्यवहारोपयोगी ज्ञानाच्या विस्ताराकरिता स्थापना सभासद, पाहुणे व शाळा यांकरिता व्याख्याने डेव्ही-फॅराडे संशोधन प्रयोगशाळा घन-अवस्था रसायनशास्त्र, पृष्ठविज्ञान, उत्प्रेरण, अतिसंवाहकता व संगणनीय रेणवीय संरचना या विषयांवर संशोधन २,३०० सभा. प्रकाशने – प्रोसिडिंग्ज, रेकॉडर्स (वा.), रॉयल इन्स्टिट्यूशन लायब्ररी ऑफ सायन्स, विविध पुस्तिका.
अमेरिकेची संयुक्त संस्थाने : (१) अमेरिकन फिलॉसॉफिकल सोसायटी : फिलाडेल्फिया बेंजामिन फ्रँक्लिन यांनी १७४३ साली स्थापन केली अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील सर्वांत जुनी संघटना सभासद – ५९० अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील नागरिक आणि १३० परदेशी १,६५,००० ग्रंथ ज्ञानाच्या कोणत्याही क्षेत्रात प्रावीण्य संपादन केलेल्यांची निवड केली जाते विषयांप्रमाणे सभासदत्वाचे पाच वर्ग आहेत : (i) गणितीय आणि भौतिकीय विज्ञाने, (ii) जीवविज्ञाने, (iii) सामाजिक विज्ञाने, (iv) मानव्यविद्या आणि (v) व्यवसाय, कला वर्षातून दोन वेळा (एप्रिल व नोव्हेंबरमध्ये) परिसंवाद, व्याख्याने आणि पारितोषिक-वितरण कार्यक्रम संशोधनाकरिता अनुदान देते प्रकाशने – ट्रँझॅक्शन्स, प्रोसिडिंग्ज, मेम्वार्स, इअरबुक, न्यूज (वर्षातून ३ वेळा). (२) अमेरिकन असोसिएशन फॉर द ॲडव्हान्समेंट ऑफ सायन्स : (AAAS). वॉशिंग्टन, डीसी स्था. १८४८ पूर्वीचे नाव असोसिएशन ऑफ अमेरिकन जिऑलॉजिस्ट्स अँड नॅचरॅलिस्ट्स सभासद १,३२,००० प्रकाशने – सायन्स (साप्ताहिक), एएएएस सायन्स बुक्स अँड फिल्म्स (वर्षातून ९ वेळा) इत्यादी. (३) द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस : वॉशिंग्टन स्था. १८६३ विज्ञानाची प्रगती व तिचा सर्वसामान्य लोकांच्या कल्याणाकरिता उपयोग यांकरिता वाहिलेली नफा न मिळवणारी खाजगी संघटना फक्त निवडणुकीने सभासद होता येते (सु. २१,००० सभा.) व संशोधन कार्याला मान्यता मिळते. अकादमीची २५ विषयांमध्ये विभागणी होते व त्यांमध्ये सभासद नेमून दिलेले असतात. विज्ञान व तंत्रविज्ञा यांसंबंधी संघीय सरकारला सल्ला देते. (४) नॅशनल ॲकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग : वॉशिंग्टन, डीसी स्था. १९६४ द ॲकॅडमी ऑफ सायन्सेसला सहकार्य देते. (५) इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन : वॉशिंग्टन, डीसी स्था. १९७० द नॅशनल ॲकॅडमी ऑफ सायन्सेस हिने सनद दिलेली संस्था. (६) द नॅशनल रिसर्च कौन्सिल : वॉशिंग्टन, डीसी स्था. १९१६ द ॲकॅडमी ऑफ सायन्सेसने स्थापन केलेली संस्था ॲकॅडमीचे कार्य करण्यासाठी शास्त्रज्ञ व अभियंता यांची फिलाडेल्फिया : फिलाडेल्फिया स्था. १८१२ निसर्गेतिहास संग्रहालय क्रमबद्ध व विकासात्मक जीवविज्ञान, परिस्थितिविज्ञान, भूविज्ञान यांचे संशोधन वनस्पती, प्राणी व जीवाश्म यांच्या एक कोटी नमुन्यांचा संग्रह ८,३०० सभा. १,६०,००० ग्रंथ १,८०,००० हस्तलिखिते/पुराभिलेख प्रकाशने-प्रोसिडिंग्ज, Notulae Naturae, मोनोग्राफ्स, विशेष प्रकाशने. (८) अमेरिकन ॲकॅडमी ऑफ आटर्स अँड सायन्सेस : केंब्रिज स्था. १७८० ३,९०० सभा. प्रकाशने – डेडलस (त्रै.), बुलेटिन (मा.), रेकॉर्ड्स (वा.). (९) न्यूयॉर्क ॲकॅडमी ऑफ सायन्सेस : न्यूयॉर्क स्था. १८१७ ४०,००० सभा. प्रकाशने – ॲनल्स, द सायन्सेस : ॲकॅडमी फोकस.
रशिया : रशियन ॲकॅडेमी ऑफ सायन्सेस : मॉस्को स्था. १७२५ ॲकॅडमी ऑफ सायन्सेस ऑफ द यूएसएसआर (मूळ अकादमीची परंपरेने उत्तराधिकारी झालेली संस्था) आणि रशियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस (बोरिस येलत्सीन यांच्या सरकारने स्थापन केलेली संस्था) यांच्या एकत्रीकरणानंतर डिसेंबर १९९१मध्ये प्राप्त झालेले नामाभिधान व दर्जा विज्ञान परिषदा व आयोग यांच्यामार्फत रशियामध्ये केल्या जाणार्यास संशोधनाकरिता अकादमी ही प्रमुख समन्वय समिती असते. ती ३०० संशोधन आस्थापनांच्या जाळ्याचे नियंत्रण करते.
फ्रान्स : (१) फ्रेंच ॲकॅडमी : (Academie Francaise). ‘इन्स्टिट्यूट द फ्रान्स’च्या पाच अकादमींपैकी एक स्था. १६३५ ४० निर्वाचित सभासद. (२) ॲकॅडमी देस सायन्सेस : (Academie des Sciences). ‘इन्स्टिट्यूट द फ्रान्स’च्या पाच अकादमींपैकी एक पॅरिस १६६६ साली चौदावा लुई यांनी स्थापना केली १३० सामान्य सभासद, १२० परदेशी सहयोगी, १६० संपर्क सहयोगी प्रतिनिधी गणित, भौतिकी, यामिकी, विश्वविषयक विज्ञान, रसायनशास्त्र, कोशिकीय व रेणवीय जीवविज्ञान, प्राणी व वनस्पती जीवविज्ञान, मानव जीवविज्ञान आणि वैद्यकीय विज्ञान या शाखा प्रकाशने – Comptes rendus, Rapports, Lettre de l’Academie et du CADAS, Annuaire.
जर्मनी : (१) ॲकॅडमी ऑफ सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी इन बर्लिन : बर्लिन स्था. १९८७. (२) बव्हेरियन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस : म्यूनिक स्था. १७५९. (३) गटिंगेन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस : गटिंगेन स्था. १७५१ २८५ सभासद. (४) हायडल्बर्ग ॲकॅडमी फॉर द ह्युमॅनिटिज अँड सायन्सेस: हायडल्बर्ग स्था. १९०९. (५) ॲकॅडमी ऑफ सायन्सेस अँड लिटरेचर इन माइनत्स : माइनत्स स्था. १९४९. (६) र्हाहईनलंड-वेस्टफालिया ॲकॅडमी ऑफ सायन्सेस : ड्युसेलडॉर्फ स्था. १९५० (पुनर्नामाभिधान १९७०). (७) सॅक्सन ॲकॅडमी ऑफ सायन्सेस इन लाइपसिक : लाइसपिक स्था. १८४६. (८) लिओपोल्डिना जर्मन ॲकॅडमी ऑफ रिसर्चर्स इन नॅचरल सायन्सेस : हाली/साली स्था. १६५२ (श्वाइनफूर्ट येथे) ९५० सभासद.
ग्रीस : (१) ॲकॅडमी ऑफ अथेन्स : (Akadima Athinon). अथेन्स स्था. १९२६ १,००,००० ग्रंथ सभा. ६५ प्रकाशने -Praktika (प्रोसिडिंग्ज-वार्षिक), Pragmatie (पेपर्स), Mnimeia Ellinkis Historias (डॉक्यूमेंट्स ऑफ ग्रीक हिस्टरी).
इटली : Accademia Nazionale Dei Linci : रोम स्था. १६०३ दोन विभाग : (१) भौतिकी, गणित व भौतिक विज्ञाने (सभासद – ९० राष्ट्रीय सहयोगी, ९० संपर्क सहयोगी, ९० परदेशी सहयोगी) (२) तत्त्वज्ञान, इतिहास, भाषाभ्यास (सभासद – ९० राष्ट्रीय सहयोगी, ९० संपर्क सहयोगी, ९० परदेशी सहयोगी).
आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघटना
(१) युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन : (UNESCO युनेस्को). पॅरिस, फ्रान्स स्था. १९४६ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक माध्यमाद्वारे आंतरराष्ट्रीय शांतता व मानवजातीचे कल्याण ही उद्दिष्ट्ये सभासद १८५ देश प्रमुख कार्य – विज्ञान व तंत्रविद्या यांचा उपयोग विकासाकरिता आणि विकसनशील देशांच्या गरजा भागविण्याकरिता करणे, तसेच अतिऔद्योगिकीकरण झालेल्या देशांतील आंतरराष्ट्रीय प्रकल्पांमधील सहयोग वाढविणे व जोपासणे. हे कार्य आंतरराष्ट्रीय, प्रादेशिक व उपप्रादेशिक आणि राष्ट्रीय अशा तीन पातळ्यांवर चालते. उदा. आंतरराष्ट्रीय -पर्यावरणीय विज्ञाने व नैसर्गिक साधनसंपत्ती यांवरील संशोधन, यांच्यासंबंधी विविध प्रकारे आंतरशासकीय सहकार्य प्रादेशिक व उपप्रादेशिक सहकारी तत्त्वावर वैज्ञानिक व तंत्रविद्याविषयक संशोधन कार्यक्रमांचा विकास राष्ट्रीय सभासद देशांच्या विनंतीवरून त्यांना विज्ञान व तंत्रविद्या क्षेत्रासंबंधी धोरण व नियोजन ठरविण्यास मदत करणे. [→ संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना].
(२) इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स : (ICSU). पॅरिस, फ्रान्स स्था. १९३१ १९१९मध्ये रोम येथे स्थापन झालेल्या इंटरनॅशनल रिसर्च कौन्सिल या संस्थेची उत्तराधिकारी विज्ञान व त्यांची उपयोजने यांच्या विविध शाखांमधील आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना सहकार्य करणे, विज्ञानाच्या प्रगतीकरिता उपयुक्त अशी आंतरराष्ट्रीय संघटना व संघ स्थापण्यात पुढाकार घेणे अभिलग्न संघटना ९२ देश आणि २३ आंतरराष्ट्रीय संघ याचे प्रतिनिधित्व करतात आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक संघाची समन्वय आणि प्रतिनिधिक समिती म्हणून ICSUला मान्यता देण्याकरिता डिसेंबर १९४६मध्ये यूनेस्को व यांच्यामध्ये करारनामा झाला. प्रकाशने – आयसीएसयू न्यूजलेटर, आयसीएसयू इअरबुक, सायन्स इंटरनॅशनल (त्रै.) [→ इंटरनॅशनल कॉन्सिल ऑफ सायंटिफिक युनियन्स].
(३) युनियन ऑफ इंटरनॅशनल टेक्निकल असोसिएशन्स : (UITA). पॅरिस स्था. १९५१ विविध तांत्रिक विषयांशी संबंधित असलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा संघ सभासद-२६ आंतरराष्ट्रीय संघटना यूनेस्को व आयसीएसयू वगैरे संस्थांना सहकार्य करणे, तांत्रिक संदर्भ-साहित्य व तांत्रिक शब्दकोश विविध भाषांमध्ये प्रसिद्ध करणे. [→ युनियन ऑफ इंटरनॅशनल टेक्निकल असोसिएशन्स].
(४) फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन्स : (FAO, फाओ). रोम, इटली १९४५मध्ये क्विबेक (कॅनडा) येथे स्थापना पोषण आणि जीवनमान यांची पातळी उंचावणे, अन्न आणि कृषि-उत्पादने यांच्या निर्मितीत व वितरणात सुधारणा करणे आणि ग्रामीण भागातील परिस्थिती चांगली करणे सभासद १६९ देश ग्रंथालयात दहा लाख ग्रंथ व ७,००० नियतकालिके प्रकाशने – वर्ल्ड फूड रिपोर्ट, द स्टेट ऑफ फूड अँड ऍग्रिकल्चर (दर वर्षी), यूनासिल्व्हा वर्ल्ड ॲनिमल रिव्ह्यू (त्रै.), फाओ रिव्ह्यू (दर वर्षी), फाओ क्वार्टर्ली बुलेटिन ऑफ स्टॅटिस्टिक्स, फूड अँड ऍग्रिकल्चरल लेजिस्लेशन (सहामाही), रुरल डिव्हेलपमेंट (दर वर्षी), फाओ डॉक्युमेंटेशन करंट बिब्लिओग्राफी (मा.), प्लँट प्रोटेक्शन बुलेटिन सेरेस (द्वै.), इअरबुक्स ऑफ ट्रेड अँड प्रॉडक्शन इन ॲग्रिकल्चर, फॉरेस्ट्री अँड फिशरीज, ॲनिमल हेल्थ अँड फर्टिलायझर्स, कमॉडिटी रिव्ह्यू अँड आउटलुक. [→ अन्न व शेती संघटना].
(५) इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी : (IAEA). व्हिएन्ना, ऑस्ट्रिया २६ ऑक्टोबर १९५६ रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या सभेमध्ये मान्यता मिळाली सभासद १२१ देश अणुऊर्जेचा उपयोग जगामध्ये शांतता, सार्वजनिक आरोग्य व भरभराट निर्माण करण्यासाठी करणे, अणुऊर्जेसंबंधी संशोधन करून त्याचा वापर करण्यास उत्तेजन देणे व सर्व प्रकारची मदत करणे प्रकाशने – न्यूक्लिअर फ्यूजन (मा.), ॲटॉमिक एनर्जी रिव्ह्यू, आयएईए बुलेटिन, मीटिंग्ज ऑन ॲटॉमिक एनर्जी (त्रै.), आयएनआयएस ॲटोमिन्डेक्स (पाक्षिक). [→ इंटरनॅशनल ॲटॉमिक एनर्जी एजन्सी].
(६) वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन : (WHO हू). जिनीव्हा, स्वित्सर्लंड स्था. १९४८ सभासद १८९ देश ८०,००० ग्रंथ, २,५०० नियतकालिके आणि १,८०,००० दस्तऐवज २००० सालापर्यंत सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय सहसंयोजन व तांत्रिक सहकार्य यांवर भर देणे आंतरराष्ट्रीय महत्त्वाचे रोगप्रतिबंधक व रोगनियंत्रक कार्य करणे प्रकाशने – बुलेटिन (डब्ल्यूएचओ वैज्ञानिक शोधनिबंध द्वैमासिक), इंटरनॅशनल डायजेस्ट ऑफ हेल्थ लेजिस्लेशन (त्रै.), वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्स क्वार्टर्ली, वर्ल्ड हेल्थ फोरम (त्रै.), वर्ल्ड हेल्थ स्टॅटिस्टिक्स ॲन्युअल, वीकली एपिडेमिऑलॉजिकल रेकॉर्ड, मोनोग्राफ सेरिज, टेक्निकल रिपोर्ट सेरिज, वर्ल्ड हेल्थ (वर्षातून ८ वेळा). [→ जागतिक आरोग्य संघटना].
(७) इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन : (ISO). जिनीव्हा स्था. १९४७ सभा. १०० आंतरराष्ट्रीय स्तरावर मानके तयार करण्याचे कार्य उद्दिष्ट : आंतरराष्ट्रीय स्तरावर माल व सेवांची देवाणघेवाण सुलभ व्हावी ह्यासाठीच्या सर्व संबंधित क्रियांचा प्रचार, प्रसार करणे व त्यांचे मानकीकरण करणे. तसेच विविध प्रकारच्या बौद्धिक, वैज्ञानिक, तांत्रिक आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित बाबींमध्ये परस्पर-सहकार्य वाढविणे प्रकाशने – आयएसओ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, आयएसओ मोमेंटो (वा.) आयएसओ कॅटलॉग (वा.), आयएसओ बुलेटिन (मा.), आयएसओ नाइन थाउजंड न्यूज (वर्षातून ६ वेळा), आयएसओ जनरल इन्फर्मेशन ब्रोच्युअर, आयएसओ स्टँडर्ड्स हँडबुक्स.
भारतीय वैज्ञानिक संशोधन संस्था
भारतामध्ये केंद्र शासनाचे विज्ञान आणि तंत्रज्ञान हे खाते खालील तेरा स्वायत्त वैज्ञानिक संस्थांना अनुदान स्वरूपात मदत पुरविते. या संस्था मूलभूत आणि अनुप्रयुक्त विज्ञानांमध्ये संशोधन करतात.
(१) बोस इन्स्टिट्यूट (कोलकाता), (२) आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट (पुणे), (३) श्री चित्रा तिरूनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (तिरुवनंतपुरम्) (४) इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स (कोलकाता), (५) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मिटिऑरॉलॉजी (पुणे), (६) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स (बेंगळुरू), (७) जवाहरलाल नेहरू सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड सायंटिफिक रिसर्च (बेंगळुरू), (८) रामन रिसर्च इन्स्टिट्यूट (बेंगळुरू), (९) एस. एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस (कोलकाता), (१०) बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी (लखनौ), (११) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम (मुंबई), (१२) वाडिया इन्स्टिट्यूट ऑफ हिमालयन जिऑलॉजी (डेहराडून) आणि (१३) इंटरनॅशनल ऍडव्हान्स्ड रिसर्च सेंटर फॉर पावडर मेटॅलर्जी अँड न्यू मटेरियल्स (हैदराबाद).
केंद्र शासनाच्या अणुऊर्जा खात्याच्या अखत्यारीखाली पुढील पाच संशोधन केंद्रे आहेत : (१) भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर (मुंबई), (२) इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च (कल्पकम्, तमिळनाडू), (३) सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी (इंदूर), (४) व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन सेंटर (कोलकाता), (५) ॲटॉमिक मिनरल्स डिव्हिजन (हैदराबाद).तसेच अणुऊर्जा खाते पुढील सात स्वायत्त संशोधन संस्थांना आर्थिक मदत करते : (१) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (मुंबई), (२) टाटा मेमोरियल सेंटर (मुंबई), (३) साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स (कोलकाता), (४) इन्स्टिट्यूट ऑफ फिजिक्स (भुवनेश्वर), (५) मेहता रिसर्च इन्स्टिट्यूट (अलाहाबाद), (६) मॅथ्स सायन्स इन्स्टिट्यूट (चेन्नई) आणि (७) द इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च (अहमदाबाद).
वरील संशोधन संस्थांपैकी बहुशः संस्थांची व इतर संस्थांची अधिक माहिती विषयवार पुढे दिली आहे.
औद्योगिक संशोधन संस्था : कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च : (CSIR) नवी दिल्ली स्था. १९४२ विज्ञान व उद्योगधंदे यांतील संशोधनाबाबतची सर्व प्रकारची जबाबदारी असणारे स्वायत्त मंडळ. भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाला हे मंडळ जबाबदार असते. भारताचे पंतप्रधान हे या मंडळाचे अध्यक्ष असतात. प्रकाशन – टेक्निकल मॅनपॉवर बुलेटिन (मा.). कौन्सिलच्या देखरेखीखाली अनेक राष्ट्रीय संशोधन प्रयोगशाळा स्थापन झाल्या आहेत. [→ राष्ट्रीय प्रयोगशाळा]
(१) सीएसआयआर कॉम्प्लेक्स, पालमपूर : (जिल्हा कांग्रा, हिमाचल प्रदेश) स्थापना १९८३. (२) सेंट्रल बिल्डिंग रिसर्च इन्स्टिट्यूट : (CBRI). रूडकी, उत्तर प्रदेश स्था. १९४७ २४,५०० ग्रंथ प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, सीबीआरआय ॲबस्ट्रॅक्ट्स, इन्फर्मेशन बुलेटिन. (३) सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट : लखनौ स्था. १९५१ २१,३०० ग्रंथ प्रकाशन – ऍन्युअल रिपोर्ट. (४) सेंट्रल इलेक्ट्रोकेमिकल रिसर्च इन्स्टिट्यूट : कराईकुडी स्था. १९५३ ३१,७५५ ग्रंथ प्रकाशने – बुलेटिन ऑफ इलेक्ट्रोकेमिस्ट्री, बॅटरी न्यूजलेटर, ॲन्युअल रिपोर्ट. (५) सेंट्रल इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट : पिलानी, राजस्थान स्था. १९५३ प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (६) सेंट्रल फूड टेक्नॉलॉजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट : (CFTRI). म्हैसूर स्था. १९५०. २७,५०० ग्रंथ प्रकाशने – फूड टेक्नॉलॉजी ॲबस्ट्रॅक्ट्स, फूड डायजेस्ट, फूड पेटंट्स टेक्नोइकॉनॉमिक न्यूज, सीएफटीआरआय न्यूजलेटर. (७) सेंट्रल फ्यूएल रिसर्च इन्स्टिट्यूट : (CFRI). धनबाद, बिहार स्था. १९४५ ७,८५५ ग्रंथ, १५,००० नियतकालिके प्रकाशने – सीएफआरआय न्यूजलेटर (मा.), फ्यूएल सायन्स अँड टेक्नॉलॉजी (त्रै.), ॲन्युअल रिपोर्ट. (८) सेंट्रल ग्लास अँड सिरॅमिक रिसर्च इन्स्टिट्यूट : कोलकाता स्था. १९५० २५,००० ग्रंथ प्रकाशने – डॉक्युमेन्टेशन लिस्ट ऑन ग्लास अँड सिरॅमिक्स, ग्लास, सिरॅमिक अपडेट, ॲन्युअल रिपोर्ट. (९) सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लँटस (CIMAP). लखनौ स्था. १९५९ २,६८८ ग्रंथ प्रकाशने – फार्म बुलेटिन, करंट रिसर्च ऑन मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लँटस (त्रै.), सीआयएमएपी न्यूजलेटर (त्रै.), ॲन्युअल रिपोर्ट. (१०) सेंट्रल लेदर रिसर्च इन्स्टिट्यूट : अड्यार, चेन्नई स्था. १९५३ १६,०५० ग्रंथ प्रकाशन – लेदर सायन्सेस ॲबस्ट्रॅक्टस. (११) सेंट्रल मेकॅनिकल एंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट : दुर्गापूर स्था. १९५८ १५,१३९ ग्रंथ प्रकाशने – मेकॅनिकल एंजिनिअरिंग बुलेटिन (त्रै.) ॲन्युअल रिपोर्ट. (१२) सेंट्रल मायनिंग रिसर्च इन्स्टिट्यूट : (CMRI). धनबाद, बिहार स्था. १९५६ २१,०६१ ग्रंथ प्रकाशने – जर्नल ऑफ मायनिंग रिसर्च, सीएमआरआय न्यूजलेटर (त्रै.). (१३) सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट : नवी दिल्ली स्था. १९५२ ५०,००० ग्रंथ प्रकाशने – रोड ॲबस्ट्रॅक्ट्स (वर्षातून दोनदा), हायवे डॉक्युमेंटेशन (मा.), ॲन्युअल रिपोर्ट. (१४) सेंट्रल सॉल्ट अँड मरीन केमिकल्स रिसर्च इन्स्टिट्यूट : (CSMCRI). भावनगर, स्था. १९५४ २७,९६७ ग्रंथ प्रकाशन – सीएसएमसीआरआय न्यूजलेटर. (१५) सेंट्रल सायंटिफिक इन्स्ट्रुमेंट्स ऑर्गनायझेशन : (CSIO). चंडीगढ स्था. १९५९ १३,२९० ग्रंथ, २४० नियतकालिके प्रकाशन-सीएसआयओ कम्युनिकेशन्स (त्रै.). (१६) सेंटर फॉर बायोकेमिकल्स टेक्नॉलॉजी : दिल्ली स्था. १९६६ प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (१७) सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलिक्युलर बायोलॉजी : (CCMB). हैदराबाद स्था. १९७७ प्रकाशने – सीसीएमबी हायलाइट्स, ॲन्युअल रिपोर्ट. (१८) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी : जाधवपूर, कोलकाता स्था. १९५६ ३०,००० ग्रंथ या संस्थेच्या अखत्यारीत सीएमआयआर सेंटर फॉर बायोकेमिकल्स (दिल्ली स्था. १९६६) ही स्वायत्त प्रयोगशाळा येते प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (१९) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी : (IICT). हैदराबाद स्था. १९४४ ४०,००० ग्रंथ, ५०० नियतकालिके प्रकाशन – आयआयसीटी बुलेटिन (त्रै.). (२०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोलियम : डेहराडून स्था. १९६० १२,००० ग्रंथ, ९,००० नियतकालिके प्रकाशने – आर अँड डी न्यूजलेटर, पेट्रोलियम कॉन्झर्व्हेशन ॲबस्ट्रॅक्ट्स (त्रै.), ॲन्युअल रिपोर्ट. (२१) इंडस्ट्रिअल टॉक्सिकॉलॉजी रिसर्च सेंटर : लखनौ स्था. १९६५ २०,२०५ ग्रंथ. (२२) इन्स्टिट्यूट ऑफ मायक्रोबीयल टेक्नॉलॉजी : चंडीगढ स्था. १९८३ ३,५४२ ग्रंथ. (२३) नॅशनल एअरोस्पेस लॅबोरेटरीज : कोडीहळ्ळी (बेंगळुरू) स्था. १९५९ ५८,००० ग्रंथ प्रकाशन – न्यूजलेटर (त्रै.). (२४) नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट : (NBRI). लखनौ स्था. १९५३ ३०० सभा. २८,६०० ग्रंथ प्रकाशने – एनबीआरआय न्यूजलेटर (त्रै.), ॲप्लाइड बॉटनी ॲबस्ट्रॅक्ट्स (त्रै.). (२५) नॅशनल केमिकल लॅबोरेटरी : (NCL). पुणे स्था. १९५० ७५,००० ग्रंथ प्रकाशन – एनसीएल बुलेटिन (त्रै.). (२६) नॅशनल एन्व्हायरन्मेंट इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट : नागपूर स्था. १९५८ २०,००० ग्रंथ प्रकाशने – पर्यावरण पत्रिका, ॲन्युअल रिपोर्ट. (२७) नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट : हैदराबाद स्था. १९६१ २१,३०० ग्रंथ प्रकाशने – बुलेटिन, ऑब्झर्व्हेटरीज डेटा (त्रैं.), प्रोग्रेस इन जिओफिजिक्स (वा.). (२८) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशेनेग्राफी : पणजी स्था. १९६६ ७,००० ग्रंथ प्रकाशन – क्वार्टर्ली बुलेटिन. (२९) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, टेक्नॉलॉजी अँड डिव्हेलपमेंट स्टडीज : नवी दिल्ली स्था. १९७३ १५,००० ग्रंथ, २५० नियतकालिके प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (३०) नॅशनल मेटॅलर्जिकल लॅबोरेटरी : जमशेटपूर स्था. १९५० ३५,००० ग्रंथ प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (३१) नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी : नवी दिल्ली स्था. १९५० प्रकाशने – समीक्षा (त्रै.), आयनोस्फेरिक डेटा (त्रै.). ॲन्युअल रिपोर्ट.
(३२) पब्लिकेशन्स अँड इन्फर्मेशन डिरेक्टोरेट : नवी दिल्ली स्था. १९५१ २०,१०० ग्रंथ सर्व प्रकारच्या संशोधनाची माहिती नोंदवून जतन करून ठेवते प्रकाशने – द वेल्थ ऑफ इंडिया, जर्नल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च, इंडियन जर्नल ऑफ केमिस्ट्री. इंडियन जर्नल ऑफ प्युअर अँड ॲप्लाइड फिजिक्स, इंडियन जर्नल ऑफ टेक्नॉलॉजी (मा.), रिसर्च अँड इंडस्ट्री, इंडियन जर्नल ऑफ एक्सपेरिमेंटल बायोलॉजी, इंडियन जर्नल ऑफ बायोकेमिस्ट्री (त्रै.), सीएसआयआर न्यूज (पाक्षिक), व्याप्तिलेख (प्रबंधक), परिसंवाद कार्यवृत्तांत, वार्षिक अहवाल इत्यादी. (३३) रिजनल रिसर्च लॅबोरेटरी (RRL), भुवनेश्वर : स्था. १९६४ प्रकाशने – आरआरएल बुलेटिन (त्रै.), ॲन्युअल रिपोर्ट. (३४) रिजनल रिसर्च लॅबोरेटरी, जम्मू-तावी : स्था. १९५७ १८,३१७ ग्रंथ प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (३५) रिजनल रिसर्च लॅबोरेटरी, जोरहाट : स्था. १९५९ ६,१०० ग्रंथ प्रकाशने – आरआरएल न्यूज (मा.). ॲन्युअल रिपोर्ट. (३६) रिजनल रिसर्च लॅबोरेटरी, भोपाळ : स्था. १९८१ प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (३७) रिजनल रिसर्च लॅबोरेटरी, त्रिवेंद्रम : स्था. १९७६. (३८) स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर : चेन्नई स्था. १९६५ ७,३०० ग्रंथ, १४६ नियतकालिके प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (३९) स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग रिसर्च सेंटर : गाझियाबाद, उत्तर प्रदेश : स्था. १९६५ ७,५०० ग्रंथ प्रकाशन – जर्नल (त्रै.). (४०) रिजनल रिसर्च लॅबोरेटरी, हैदराबाद : स्था. १९५६. (४१) टी रिसर्च ॲसोसिएशन : कोलकाता स्था. १९६४ जोरहाट येथे टोक्लाई संशोधन केंद्र चहाची लागवड, उत्पादन व त्यावरील संस्करण याच्याशी संबंधित संशोधन व वैज्ञानिक कार्य करणे व त्याला प्रोत्साहन देणे प्रकाशने – टी अँड ए बड (षण्मासिक), टी एन्सायक्लोपीडिया. [→ चहा]. (४२) इलेक्ट्रिकल रिसर्च अँड डिव्हेलपमेंट ऍसोसिएशन : (ERDA). मुंबई स्था. १९७८ बडोदा येथे प्रयोगशाळा प्रकाशने – ॲबस्ट्रेक्ट्स ऑफ करंट लिटरेचर इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. ईआरडीए न्यूज. (४३) इंडियन नॅशनल सायंटिफिक डॉक्युमेंटेशन सेंटर : नवी दिल्ली स्था. १९५२ राष्ट्रीय विज्ञान ग्रंथालय १,३६,००० ग्रंथ, ४,००० चालू नियतकालिके विभागीय केंद्रे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (बेंगळुरू). इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी (कोलकाता) आणि सीएसआयआर कॉंप्लेक्स (चेन्नई) माहितीचा वापर करणार्याञ सर्वांना संदर्भ, संकलन व माहिती-सेवा पुरविणे माहिती-विज्ञानाचा दोन वर्षांचा अभ्यासक्रम प्रकाशने – ॲनल्स ऑफ लायब्ररी अँड डॉक्युमेंटेशन (त्रै.), इंडियन सायन्स ॲबस्ट्रॅक्ट्स (पाक्षिक).
कृषी व पशुवैद्यक : (१) ॲग्रो-इकॉनॉमिक रिसर्च सेंटर : शांतिनिकेतन, पश्चिम बंगाल स्था. १९५४ ६,००० ग्रंथ. (२) सेंट्रल एरिड झोन रिसर्च इन्स्टिट्यूट : जोधापूर स्था. १९५९ १७,००० ग्रंथ, २३० नियतकालिके प्रकाशन – ॲनल्स ऑफ एरिड झोन (त्रै.), ॲन्युअल प्रोग्रेस रिपोर्ट. (३) सेंट्रल इनलँड कॅप्चर फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट : बरॅकपूर, पश्चिम बंगाल स्था. १९४७ ७०० ग्रंथ, ६०० नियतकालिके प्रकाशने – न्यूजलेटर (त्रै.), इंडियन फिशरीज ॲबस्ट्रॅक्टस (त्रै.). [→ मत्स्योद्योग]. (४) सेंट्रल राइस रिसर्च इन्स्टिट्यूट : कटक, ओरिसा स्था. १९४६ ५३० सभा. १२,००० ग्रंथ, २०० नियतकालिके प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, ओरिसा (त्रै.), राइस रिसर्च न्यूज (त्रै.), [→ भात] . (५) सेंट्रल टोबॅको रिसर्च इन्स्टिट्यूट : राजमहेंद्री, आंध्र प्रदेश स्था. १९४७ १८,००० ग्रंथ, २२६ नियतकालिके प्रकाशने – रिसर्च रिपोर्टस् (वा.), न्यूजलेटर (त्रै.), पत्रके (अनियमित), सूक्ष्मसंदर्भ याद्या (अनियमित), [→ तंबाखू]. (६) फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट : (FRI) . डेहराडून स्था. १९०६ १,५०,००० ग्रंथ, ५०० नियतकालिके प्रकाशने – इंडियन फॉरेस्ट रेकॉर्डस्, बुलेटिन, ॲन्युअल रिपोर्ट, एफआरआय क्वार्टर्ली न्यूजलेटर. [→ वनविद्या]. (७) इंडियन ॲग्रिकल्चरल स्टॅटिस्टिक्स रिसर्च इन्स्टिट्यूट : (IASRI) नवी दिल्ली स्था. १९५९ १९,८०० ग्रंथ, ४,५०० नियतकालिके प्रकाशने – आयएएसआरआय स्टॅटिस्टिकल न्यूजलेटर (त्रै.), टेक्निकल रिपोर्टस्, ॲन्युअल रिपोर्ट. (८) इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च : (ICAR) नवी दिल्ली स्था. १९२९ ४२ संशोधन संस्था व २१ राष्ट्रीय संशोधन केंद्रे चालविते प्रकाशने – इंडियन जर्नल ऑफ ॲग्रिकल्चरल सायन्सेस, इंडियन जर्नल ऑफ ॲनिमल सायन्सेस, इंडियन फार्मिंग खेती (सर्व मासिके), इंडियन हॉर्टिकल्चर, फल-फूल, कृषि चाणक्य (सर्व त्रैमासिके). [→ कृषि संशोधन]. (९) इंडियन प्लायवूड इंडस्ट्रिज रिसर्च इन्स्टिट्यूट : बेंगळुरू स्था. १९६२ ८,५०० ग्रंथ. (१०) इंडियन व्हेटर्नरी रिसर्च इन्स्टिट्यूट : इझतनगर, उत्तर प्रदेश स्था. १८८९ ५०,००० ग्रंथ, ८६७ नियतकालिके प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, वार्षिक वैज्ञानिक अहवाल, संदर्भ – ग्रंथसूची, व्याप्तिलेख (प्रबंधिका). (११) नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट : कर्नाल, हरयाणा स्था. १९२३ ७५,००० ग्रंथ, २२,००० नियतकालिके प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, डेअरी समाचार (त्रै.). (१२) नॅशनल शुगर इन्स्टिट्यूट : (NSI) कानपूर स्था. १९३६ ६,६९६ ग्रंथ प्रकाशने – शर्करा, एनएसआय न्यूज. (१३) द रबर रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया : कोट्ट्यम्, केरळ स्था. १९५५ ४१,००० ग्रंथ प्रकाशने – इंडियन जर्नल ऑफ नॅचरल रबर रिसर्च, रबर, इंडियन रबर स्टॅटिस्टिक्स, रबर ग्रोवर्स कंपॅनिअन, रबर स्टॅटिस्टिकल न्यूज, ॲन्युअल रिपोर्ट. [→ रबर]. (१४) इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट : नवी दिल्ली, स्था. १९०५ कृषी विषयातील सर्व प्रमुख शाखांमधील पदव्युत्तर अभ्यासक्रम व संशोधन ६,००,००० ग्रंथ प्रकाशने – बिब्लिओग्राफी ऑफ इंडियन ॲग्रिकल्चर, डिव्हेलपमेंट न्यूज इन ॲग्रिकल्चर, फ्युचिरिस्टिक ॲग्रिकल्चर, मंथली लिस्ट ऑफ ॲक्विझिशन. [→ भारतीय कृषि संशोधन संस्था]. (१५) महाराष्ट्र असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स : (विज्ञान वर्धिनी, महाराष्ट्र आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट). पुणे स्था. १९४६ ११,००० ग्रंथ, सु. २०० संशोधनात्मक नियतकालिके वैज्ञानिक ज्ञानात वाढ होईल असे मूलभूत संशोधन, तसेच ग्रामीण भागात व शेतीसाठी उपयुक्त असे संशोधन केले जाते अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत प्रकाशन – बायोविज्ञानम् (षण्मासिक). [→ महाराष्ट्र ऍसोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स]. (१६) इंडियन कौन्सिल ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड एज्युकेशन (डेहराडून) : या मंडळाच्या अखत्यारीखाली पुढील वनविद्याविषयक संशोधन संस्था व केंद्रे त्यांच्या क्षेत्रविभागातील संशोधन कार्य करतात : (१) फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट (डेहराडून), (२) इन्स्टिट्यूट ऑफ एरिड झोन फॉरेस्ट्री रिसर्च (जोधपूर), (३) इन्स्टिट्यूट ऑफ रेन अँड मॉइस्ट डिसिड्युअस फॉरेस्ट्स (जोरहाट), (४) इन्स्टिट्यूट ऑफ वूड सायन्सेस अँड टेक्नॉलॉजी (बेंगळुरू), (५) ट्रॉपिकल फॉरेस्ट्री रिसर्च इन्स्टिट्यूट (जबलपूर), (६) इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट जेनेटिक्स अँड ट्री ब्रीडिंग (कोईमतूर), (७) टेंपरेट फॉरेस्ट रिसर्च सेंटर (सिमला). (८) सेंटर फॉर फॉरेस्ट प्रॉडक्टिव्हिटी (रांची), (९) इन्स्टिट्यूट ऑफ सोशल फॉरेस्ट्री अँड इकॉं-रिहॅबिलिटेशन (अलाहाबाद). (१०) इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट्री रिसर्च अँड ह्यूमन रिसोर्सेस डिव्हेलपमेंट (छिंदवाडा), (११) ॲडव्हान्स्ड सेंटर फॉर बायो-टेक्नॉलॉजी अँड मॅनग्रोव्ह फॉरेस्ट्स (हैदराबाद), (१२) द इंडियन प्लायवूड इंडस्ट्री रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट (बेंगळुरू), (१३) द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेस्ट मॅनेजमेंट (भोपाळ). [→ वनविद्या].
वैद्यक : (१) बी. एम. इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ : नवरंगपुरा, अहमदाबाद स्था. १९५१ १२० सभा. ६,४१३ ग्रंथ प्रकाशन – मेंटल हेल्थ रिव्ह्यू (सहामाही). (२) कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूट : टाटा मेमोरियल सेंटर, परेल, मुंबई ११,००० ग्रंथ. (३) सेंट्रल जल्मा इन्स्टिट्यूट फॉर लेप्रसी : आग्रा, उत्तर प्रदेश स्था. १९६६ इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचा भाग. (४) सेंट्रल लेप्रसी टीचिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट : चिंगलपुट, तमिळनाडू स्था. १९५५ जागतिक आरोग्य संघटनेचे प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र ८,००० ग्रंथ प्रकाशने – न्यूज बुलेटिन (त्रै.), ॲन्युअल रिपोर्ट. (५) सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूट : कर्सोली, हिमाचल प्रदेश स्था. १९०५ ३०,००० ग्रंथ प्रकाशन – ॲन्युअल सायंटिफिक रिपोर्ट. (६) हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग, रिसर्च अँड टेस्टिंग : मुंबई स्था. १८९७ ३०,००० ग्रंथ प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. [→ हाफकिन इन्स्टिट्यूट]. (७) इंडियन ब्रेन रिसर्च असोसिएशन : कोलकाता स्था. १९६४ ३०० सभा. २,००० ग्रंथ प्रकाशन – ब्रेन न्यूज (वर्षातून दोनदा). (८) इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च : (ICMR). नवी दिल्ली स्था. १९११ ५,००० ग्रंथ या कौन्सिलतर्फे २२ राष्ट्रीय व अनेक प्रादेशिक संस्था कार्य करतात प्रकाशने – इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च (मा., पुरवणीसह), आयसीएमआर बुलेटिन (मा.), इंडियन जर्नल ऑफ मलेरिऑलॉजी (त्रै.), कौन्सिलचे वार्षिक अहवाल, विशेष अहवाल इत्यादी. (९) इन्स्टिट्यूट ऑफ चाइल्ड हेल्थ : कोलकाता स्था. १९५३. (१०) किंग इन्स्टिट्यूट ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन : चेन्नई स्था. १८९९ २०,१३७ ग्रंथ प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (११) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस : दिल्ली स्था. १९६३ २७,००० ग्रंथ १८४ नकाशे, ८९ छायाचित्रप्रती प्रकाशने-ॲन्युअल रिपोर्ट, कम्युनिकेबल डिसीजेस बुलेटिन (त्रै.), नियमपुस्तिका, संदर्भ-ग्रंथसूची इत्यादी. (१२) नॅशनल मलेरिया इरॅडिकेशन प्रोग्रॅम : दिल्ली स्था. १९५८ ४,००० ग्रंथ. (१३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन : जमिया-उस्मानिया, हैदराबाद स्था. १९१८ १३,००० ग्रंथ, १४,००० नियतकालिके प्रकाशने-ॲन्युअल रिपोर्ट, न्यूट्रिशन (त्रै.), न्यूट्रिशन न्यूज (द्वै.), LAIS सेंटर न्यूज (वर्षातून दोनदा), डाएट ॲटलास ऑफ इंडिया, न्यूट्रिशन ॲटलास ऑफ इंडिया, न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू ऑफ इंडियन फूड्स इत्यादी. (१४) नॅशनल ट्यूबरक्युलोसिस इन्स्टिट्यूट : बेंगळुरू स्था. १९५९ २४० सभा. प्रकाशन-न्यूजलेटर (त्रै.). (१५) पाश्चर इन्स्टिट्यूट अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट : शिलाँग, आसाम स्था. १९१५ ७,३११ ग्रंथ जागतिक आरोग्य संघटनेचे आंतरराष्ट्रीय संदर्भ केंद्र. (१६) वल्लभभाई पटेल चेस्ट इन्स्टिट्यूट : दिल्ली स्था. १९५५ २५,००० ग्रंथ प्रकाशन – इंडियन जर्नल ऑफ चेस्ट डिसीजेस अँड अलाइड सायन्सेस (त्रै.). (१७) व्हेक्टर कंट्रोल रिसर्च सेंटर : पाँडिचेरी स्था. १९७५ १०,००० ग्रंथ, १०४ नियतकालिके, २,७०० पुनर्मुद्रिते प्रकाशन-ॲन्युअल रिपोर्टस्. (१८) सेंट्रल कौन्सिल ऑफ रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी : या मंडळाच्या नियंत्रणाखाली पंधरापेक्षा जास्त संशोधन संस्था कार्य करतात. यांमध्ये आयुर्वेद, योग, युनानी, होमिओपॅथी इ. वैद्यकीय पद्धतींवर संशोधन केले जाते.
सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेद अँड सिद्धा (CCRAS), सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन्स (CCRUM), सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी (CCRH) आणि सेंट्रल कौन्सिल फॉर रिसर्च इन योगा अँड नॅचरोपॅथी (CCRYN) या चार शिखर संस्थांमध्ये चिकित्सालयीन संशोधन, औषध प्रयोगशालेय संशोधन, कुटुंबकल्याण संशोधन इ. संशोधन कार्ये चालू आहेत. देशामध्ये CCRAS या मंडळाची शहाऐंशीपेक्षा अधिक केंद्रे आहेत. या मंडळाकडे १८ आयुर्वेदिक आणि सिद्ध औषधांची एकस्वे (पेटंटे) आहेत. देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी CCRUM या मंडळाच्या ३२ संस्थांचे आणि CCRH या मंडळाच्या ५० संस्थांचे जाळे आहे. CCRYN हे मंडळ प्रशिक्षण कार्यक्रम राबविणार्याल योग आणि निसर्गोपचार संस्थांना अनुदान देते.
सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन योगा ही संस्था मोरारजी देसाई नॅशनल इन्स्टिट्यूट टू योगा (दिल्ली) या संस्थेत विलीन झाली आहे. या संस्थेमध्ये नागरिकांना योग-प्रशिक्षण आणि उपचार दिले जातात.
केंद्र शासनाच्या जैव तंत्रज्ञान खात्याने तीन स्वायत्त संस्था स्थापन केल्या आहेत : (१) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी (नवी दिल्ली), (२) नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, (३) सेंटर फॉर डीएनए, फिंगरप्रिंटिंग डायग्नोस्टिक्स (हैदराबाद). तसेच त्या खात्याने नवी दिल्ली येथे नॅशनल सेंटर फॉर प्लँट जिनोम रिसर्च आणि नॅशनल ब्रेन रिसर्च सेंटर ही दोन नवीन केंद्रे स्थापण्यास मान्यता दिली आहे.
सर्वसाधारण संशोधन संस्था : (१) बोस इन्स्टिट्यूट : कोलकाता स्था. १९१७ प्राणिविज्ञान, कोशिक आनुवंशिकी उत्परिवर्तन, क्रियावैज्ञानिक आनुवंशिकी, प्रतिजैव पदार्थ, जीवरसायनशास्त्र, रेणवीय जीवविज्ञान, जैवतंत्रविद्या, सूक्ष्मजीवशास्त्र, प्रतिरक्षाविज्ञान, पर्यावरण विज्ञाने, भौतिकीय रसायनशास्त्र, प्रारण व अणुकेंद्रीय भौतिकी, घन-अवस्था भौतिकी, जैवभौतिकी या विषयांमध्ये संशोधन फाल्टा, शामनगर, मध्यमग्राम आणि दार्जिलिंग या ठिकाणी प्रायोगिक केंद्रे २४,८८३ ग्रंथ प्रकाशने -ट्रँझॅक्शन्स, ॲन्युअल रिपोर्ट, न्यूजलेटर. (२) इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स : (IACS). जाधवपूर, कोलकाता स्था. १८७६ सैद्धान्तिक भौतिकी, वर्णपटविज्ञान, सामग्रीविज्ञान, घन-अवस्था भौतिकी, भौतिकीय रसायनशास्त्र, जैवरसायनशास्त्र, कार्बनी व अकार्बनी रसायनशास्त्र या विषयांमध्ये संशोधन १,६०० सभा ५७,००० ग्रंथ प्रकाशने – इंडियन जर्नल ऑफ फिजिक्स, बुलेटिन ऑफ द आयएसीएस. (३) रामन रिसर्च इन्स्टिट्यूट : बेंगळुरू स्था. १९४८ द्रव स्फटिक, विश्व-भौतिकी, सैद्धांतिक भौतिकी, इलेक्ट्रॉनिकी २५५ सभा. १७,१५० ग्रंथ, २०,८६५ नियतकालिके. (४) टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च : मुंबई स्था. १९४५ शुद्ध व अनुप्रयुक्त गणित, भौतिकी व खगोल भौतिकी, विश्वकिरण व सौर भौतिकी, अणुकेंद्रीय भौतिकी, रासायनिक भौतिकी, घन-अवस्था भौतिकी, नीच तापमान भौतिकी, रेडिओ ज्योतिषशास्त्र व अवकाश ज्योतिषशास्त्र, रेणवीय जीवविज्ञान, जलविज्ञान, घन-अवस्था इलेक्ट्रॉनिकी, संगणक विज्ञान इ. विषयांमध्ये मूलभूत संशोधन राष्ट्रीय शासन संशोधन केंद्र १,००,००० ग्रंथ [→टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च]. (५) यूनेस्को रिजनल ऑफिस फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर साउथ अँड सेंट्रल एशिया : नवी दिल्ली स्था. १९४८ राष्ट्रीय आणि प्रादेशिक संघटनांना सहकार्य करते विकासाकरिता विज्ञान व तंत्रविद्या, प्रगतीकरिता विज्ञान व पर्यावरण, पर्यावरण व नैसर्गिक साधनसंपत्ती यांचे व्यवस्थापन या तीन प्रमुख क्षेत्रांमध्ये सक्रिय २७,००० यूनेस्को दस्तऐवज, अहवाल इत्यादींचे सूक्ष्मसंदर्भ केंद्र विज्ञान व तंत्रविद्या, शिक्षण, सामाजिक विज्ञाने, संस्कृती व संचारण यांचा विशेष संग्रह प्रकाशने – यूनेस्को न्यू दिल्ली फॅक्ट शीट (त्रै.), लायब्ररी ॲक्सेशन लिस्ट, सिलेक्ट लिस्ट ऑफ पिरिऑडिकल्स (वर्षांतून दोनदा).
जीवविज्ञान : (१) बिरबल सहानी इन्स्टिट्यूट ऑफ पॅलिओबॉटनी : लखनौ स्था. १९४६ ५,००० ग्रंथ, १०,००० नियतकालिके, ३५,००० पुनर्मुद्रिते, ३०० सूक्ष्मछायाचित्रे. केवळ पुरावनस्पतिविज्ञानासाठी असलेली ही बहुधा एकमेव संस्था आहे. प्रकाशन – द पॅलिओबोटॅनिस्ट (वर्षातून तीन वेळा). (२) बोटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडिया : कोलकाता स्था. १८९० वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण व संशोधन सेंट्रल नॅशनल हर्बेरियम अँड इंडियन बोटॅनिक गार्डन (हावडा) आणि इंडस्ट्रियल सेक्शन, इंडियन म्युझियम (कोलकाता) या दोन ठिकाणी मुख्य कार्यालये २.५ लाखापेक्षा अधिक ग्रंथ प्रकाशने – बुलेटिन (त्रै.), रिपोर्टस् (वा.), इंडियन फ्लोराज. [→ भारतीय वनस्पतिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था]. (३) इंडियन असोसिएशन ऑफ सिस्टेमॅटिक झोऑलॉजिस्ट्स : कोलकता स्था. १९४७. (४) इन्स्टिट्यूट ऑफ प्लँट इंडस्ट्री : इंदूर, मध्य प्रदेश कापूस आनुवंशिकी, कपाशी व फेरपालटीने घेण्यात येणारी पिके यांच्या पीक-सुधारणा यावरील संशोधन. (५) ट्रॉपिकल बोटॅनिक गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट : पछा-पलोडे, केरळ स्था. १९७९ वनस्पतिवैज्ञानिक, उद्यानविद्याविषयक व वनस्पती जैवतांत्रिक संशोधनाकरिता शास्त्रीय उद्याने, वृक्षोद्यान आणि प्रयोगशाळा यांची स्थापना करणे आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या वनस्पतींच्या संशोधनात्मक व विकासात्मक अध्ययनाला चालना देणे दुर्मिळ व संकटात असलेल्या वनस्पती-जातींचे संरक्षण करणे ५,००० ग्रंथ ६५ नियतकालिके, वाहिनीवंत वनस्पतींचे १८,००० संस्करित नमुने व ३०,००० वनस्पतींचे अनेक नमुने असलेला वनस्पतिसंग्रह प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, इंडेक्स सेमिनम, इन्फर्मेशन ब्रोच्युअर्स, क्वार्टर्ली न्यूजलेटर. (६) झोऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया : न्यूअलीपूर, कोलकाता स्था. १९१६ राष्ट्रीय प्राणिवैज्ञानिक संग्रहाची देखभाल, प्राणिजातविषयक सर्वेक्षण करणे आणि प्राणिविज्ञान, वन्यजीव, पर्यावरणीय संरक्षण यांचे पद्धतशीर संशोधन बेहरामपूर, डेहराडून, कनिंग, दिघा, हैदराबाद, इटानगर, जबलपूर, जोधपूर, कोझिकोडे, चेन्नई, पाटणा, पोर्ट ब्लेअर, पुणे, शिलाँग, सोलन या ठिकाणी प्रादेशिक केंद्रे ६०,००० ग्रंथ, ८०० नियतकालिके प्रकाशने – रेकॉर्डस् (त्रै.), मेम्वार्स, ॲन्युअल रिपोर्टस्, फॉना ऑफ इंडिया, ऑकेजनल पेपर्स, हँडबुक्स, स्टेट फॉना सेरीज, बिब्लिओग्राफी ऑफ इंडियन झोऑलॉजी अँड ए सिरीज ऑफ मोनोग्राफ्स. [→भारतीय प्राणिवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था].
गणित : (१) इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट : बरॅकपूर, कोलकाता स्था. १९३१ सांख्यिकी आणि राष्ट्रीय विकास व समाजकल्याण यांच्याशी संबंधित विषय यांवरील संशोधनाला व ज्ञानाला चालना देते संशोधन प्रकल्प व प्रयोगशाळांची देखभाल करते पदवी, पदव्युत्तर व डॉक्टरेट पदव्या यांचे अभ्यासक्रम ठरविते १,८७,०००पेक्षा अधिक ग्रंथ, २,३५० नियतकालिके प्रकाशने – सांख्य, द इंडियन जर्नल ऑफ स्टॅटिस्टिक्स, टेक्निकल रिपोर्टस्, मेमोरँडा. (२) इन्स्टिट्यूट ऑफ मॅथेमॅटिकल सायन्सेस : तारामनी, चेन्नई स्था. १९६२ शुद्ध व अनुप्रयुक्त गणित, सैद्धांतिक भौतिकी व सैद्धांतिक संगणकविज्ञान या विषयांमध्ये संशोधन ३०,००० ग्रंथ व नियतकालिके प्रकाशन – इंडियन मॅथेमॅटिकल सायन्स रिपोटर्स.
भौतिकीय विज्ञाने : (१) अलीपूर ऑब्झर्व्हेटरी अँड मिटिऑरॉलॉजिकल ऑफिस : कोलकता स्था. १८७७ प्रकाशन – द इंडिया मिटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट. (२) ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी कोलकाता स्था. १९८९. (३) ॲस्ट्रॉनॉमिकल ऑब्झर्व्हेटरी कॉलेज ऑफ सेंट झेविएर्स कॉलेज : कोलकाता स्था. १८७५. (४) भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटर : (BARC). तुर्भे, मंबई स्था. १९५७ अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांकरिता तिचे संशोधन व विकास करणारे राष्ट्रीय केंद्र. तीन संशोधन विक्रियक श्रीनगर, गुलमर्ग व गौरीबिदनूर येथे प्रयोगशाळा समस्थानिक निर्मिती विभाग मध्यवर्ती कर्मशाळा जड पाणी, झिर्कोनियम, टिटॅनियम इत्यादींच्या निर्मितीकरिता मार्गदर्शी संयंत्रे खाद्यपदार्थ किरणीयन व संस्करण प्रयोगशाळा विक्रियक अभियंत्रिकी प्रयोगशाळा आणि तपासणीच्या सोयी. ग्रंथालयात १,५०,००० ग्रंथ, १,६०० तांत्रिक ज्ञानपत्रिका, ७,००,०००हून अधिक तांत्रिक अहवाल प्रकाशने – न्यूजलेटर (मा.), ॲन्युअल रिपोर्ट. [→ भाभा अणुसंशोधन केंद्र]. (५) सेंट्रल सीस्मॉलॉजिकल ऑब्झर्व्हेटरी : शिलाँग कार्यालय नवी दिल्ली. (६) जिओडेटिक अँड रिसर्च ब्रँच, सर्व्हे ऑफ इंडिया : डेहराडून स्था. १८०० भूपृष्ठीय व संबंधित भूभौतिकीय कार्ये, उपकरण योजनेचा विकास व संशोधन यांच्यासह ५५,००० ग्रंथ प्रकाशने – अहवाल व तांत्रिक प्रकाशने. (७) जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया : कोलकाता स्था. १८५१ भूविज्ञान, भूभौतिकी, अभियांत्रिकीय भूविज्ञान, खनिज साधनसंपत्ती, समन्वेषण व संशोधन यांच्या अध्ययनाकरिता वाहिलेली ५,००,००० ग्रंथ प्रकाशने – न्यूज, बुलेटिन. [→ भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्था]. (८) इंडिया मिटिऑरॉलॉजिकल डिपार्टमेंट : नवी दिल्ली स्था. १८७५ नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई व नागपूर येथे प्रादेशिक कार्यालये तिरुवनंतपुरम्, बेंगळुरू, हैदराबाद, भुवनेश्वर, गौहाती, लखनौ, जयपूर, श्रीनगर, अहमदाबाद, पाटणा, चंडीगढ आणि भोपाळ येथे राज्य वातावरणवैज्ञानिक केंद्रे दहा चक्रवात अभिज्ञापन रडार वातावरणविज्ञानाच्या सर्व शाखांमध्ये (उदा., कृषी व जल वातावरणविज्ञान, रेडिओ वातावरणविज्ञान, उपग्रहीय व पर्यावरणीय वातावरणविज्ञान, वातावरणीय विद्युत्, भूकंपविज्ञान यांमध्ये) संशोधन आयसीएओ यांच्याखाली प्रादेशिक क्षेत्र पूर्वानुमान केंद्र, डब्ल्यूएमओ वर्ल्ड वेदर वॉच यांच्या नियंत्रणाखालील प्रादेशिक वातावरणवैज्ञानिक केंद्र प्रकाशने – इंडियन ॲस्ट्रॉनॉमिकल एफेमेरीज (वा.), मौसम (त्रै.), इंडियन वेदर रिव्ह्यू, रिजनल/स्टेट डेली वेदर रिपोर्टस्, प्रासंगिक संस्मरणिका, प्रबंधिका आणि पुनर्विलोकने, [→ भारतीय वातावरणवैज्ञानिक खाते]. (९) इंडियन ब्युरो ऑफ माइन्स : नागपूर स्था. १९४८ खनिज साधनसंपत्तीच्या संवर्धन व विकासाकरिता आणि खाणकाम परिसराच्या संरक्षणाकरिता जबाबदार असलेला शासकीय विभाग (खाते) खाण आणि खनिजे यांच्या विकासाला मदत खाणकाम आणि खनिज संस्करण यांबाबतीत तांत्रिक सल्ला, खनिज आकडेवारी व माहिती गोळा करणे व त्यांचा प्रसार करणे कमी दर्जाच्या धातुकांचे समृद्धीकरण व विशेष खाणकामाच्या समस्या यांवर संशोधन ५७,००० ग्रंथ प्रकाशने – इंडियन मिनरल्स इअरबुक, मिनरल स्टॅटिस्टिक्स ऑफ इंडिया (वर्षातून २ वेळा), मंथली स्टॅटिस्टिक्स ऑफ मिनरल प्रॉडक्शन, बुलेटिन ऑफ मिनरल इन्फर्मेशन (त्रै.), फॉरिन ट्रेड इन मिनरल्स अँड मेटल्स (वा.), इंडियन मिनरल इंडस्ट्री ॲट अ ग्लान्स, स्टॅटिस्टिकल प्रोफाइल्स ऑफ सिलेक्टेड मिनरल्स (दोन्ही वार्षिक), इंडेक्स नंबर ऑफ मिनरल प्राइसेस, फिनान्शियल इअर ॲग्रिगेट ऑफ मिनरल प्रॉडक्शन (दोन्ही अनियमित), बुलेटिन ऑन कन्झम्पशन ऑफ नॉनफेरस मेटल्स इन इंडिया (त्रै.), प्रबंधिका, खाणकामाचा विशिष्ट बाजूंनी आढावा घेतलेल्या विवरणपत्रिका. (१०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स : बेंगळुरू स्था. १७८६ मध्ये मद्रास (चेन्नई) येथे खाजगी वेधशाळा म्हणून सौरभौतिकी, तारकीय(खगोलीय) भौतिकी, सैद्धांतिक खगोल भौतिकी (आयनांबरासह), विश्वोत्पत्तिशास्त्र सौर-भौमिक संबंध व उपकरण योजना या विषयांच्या अभ्यासात प्रावीण्य संपादन करणे १०,०००हून अधिक ग्रंथ कवलूर, कोडईकानल व गौरीबिदनूर येथे क्षेत्रीय केंद्रे प्रकाशने – बुलेटिन्स, न्यूजलेटर, ॲन्युअल रिपोर्टस्, रिप्रिंट्स. (११) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम : कुलाबा, मुंबई स्था. १९७१ अलिबाग, अन्नमलईनगर, तिरुवनंतपुरम्, जयपूर, नागपूर, उज्जैन, गुलमर्ग, शिलाँग, पाँडिचेरी, तिरुनेलवेली, विशाखापटनम् येथे वेधशाळज्ञ भूचुंबकत्वाकरिता असलेले वर्ल्ड डेटा सेंटर (डब्ल्यूडीसी-सी २) हे कंद्र १२,००० ग्रंथ प्रकाशने – न्यूजलेटर, इंडियन मॅग्नेटिक डेटा, ॲन्युअल रिपोर्ट. [→ भूचुंबकत्व].
(१२) इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन : (ISRO इस्रो). बंगलोर स्था. १९६९ उपग्रह-आधारित संदेशवहन, साधनसंपत्तीचे सर्वेक्षण व वातावरणवैज्ञानिक सेवा यांच्याकरिता उपग्रह, क्षेपणयान व जमिनीवरील स्थानके यांचा विकास. अवकाश-कार्यक्रमासंबंधी संशोधन व विकास-कार्ये पुढील केंद्रांमध्ये चालू आहेत : विक्रम साराभाई स्पेस सेंटर (तिरुवनंतपुरम्), स्पेस ॲप्लिकेशन्स सेंटर (अहमदाबाद), इस्त्रो सॅटेलाइट सेंटर (बंगलोर), शार (SHAR) सेंटर (श्रीहरिकोटा बेट), लिक्विड प्रॉपल्शन सिस्टिम युनिट (तिरुवनंतपुरम् व बेंगळुरू), डिव्हेलपमेंट अँड एज्युकेशनल कम्युनिकेशन्स युनिट (अहमदाबाद), इस्रो टेलिमेट्री ट्रॅकिंग अँड नेटवर्क (बेंगळुरू), इस्रो इनर्शियल सिस्टिम्स युनिट (तिरुवनंतपुरम्) आणि इन्सॅट (INSAT) मास्टर कंट्रोल फॅसिलिटी (हसन). द नॅशनल रिमोट सेन्सिंग एजन्सी (हैदराबाद), द फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी (अहमदाबाद) आणि द नॅशनल मेसोस्फिअर-स्ट्रॅटोस्फिअर-ट्रोपोस्फिअर रडार फॅसिलिटी (गंडकी) या साहाय्यक अनुदान संस्था आहेत. (१३) इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्च : कल्पकम् स्था. १९६९ भारत सरकारच्या अणुऊर्जा खात्याला जोडलेले द्रुतगती विक्रियक तंत्रविद्या व त्याच्याशी संबंधित प्रणाली (पद्धती) यांमध्ये संशोधन ६०,००० ग्रंथ प्रकाशन – अहवाल. (१४) इन्स्टिट्यूट फॉर प्लाझ्मा रिसर्च : गांधीनगर स्था. १९८६ आयनद्रायू भौतिकीमध्ये संशोधन ९,००० ग्रंथ, ७,००० तांत्रिक अहवाल, ८०० पुनर्मुद्रिते, ८५ नियतकालिके प्रकाशन – प्लाझ्मा फिजिक्स अपडेट. (१५) इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स : (IUCAA आयुका). पुणे स्था. १९८८ ज्योतिषशास्त्र आणि खगोल भौतिकी या विषयांमध्ये सर्व अंगांनी मूलभूत संशोधन व प्रशिक्षण एम. एस्सी. व पीएच. डी. या पदव्यांकरिता उजळणी पाठ्यक्रम, संशोधन कर्मशाळा, इ. प्रकाशने-खगोल (त्रै.), ॲन्युअल रिपोर्ट, लेक्चर नोट्स. (१६) मायनिंग, जिऑलॉजिकल अँड मिटिऑरॉलॉजिकल इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया : कोलकाता स्था. १९०६ ३,५०० ग्रंथ प्रकाशने – ट्रँझॅक्शन्स (वर्षातून २ वेळा), न्यूजलेटर (त्रै.) (१७) निझामिया अँड जापाल-रंगपूर ऑब्झर्व्हेटरीज अँड सेंटर ऑफ ॲडव्हान्स्ड स्टडी इन ॲस्ट्रॉनॉमी : हैदराबाद स्था. १९०८ १९१९ साली उस्मानिया विद्यापीठाकडे नियंत्रण सोपविले १५,००० ग्रंथ, ४,००० नियतकालिके प्रकाशन – ॲस्ट्रॉनॉमिकल. (१८) फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी : अहमदाबाद : स्था. १९४७ ५०० सभा. ३७,८०० ग्रंथ, २,००० अहवाल, ५०० नकाशे अवकाश-संशोधन व पदव्युत्तर अभ्यास वातावरणीय विज्ञाने व ग्रहमाली ज्योतिषशास्त्र, प्रकाशीय, अवरक्त व रेडिओ ज्योतिषशास्त्र (आंतरग्रहीय चमचम), खगोल भौतिकी, आणवीय व रेणवीय भौतिकी, अणुकेंद्रीय व मूलकण भौतिकी, आयनद्रायू सिद्धांत व प्रयोग, महासागरविज्ञान व जलवायुमान अध्ययन, सौर प्रणाली व भूकालगणना. (१९) साहा इन्स्टिट्यूट ऑफ न्यूक्लिअर फिजिक्स : कोलकाता स्था. १९५१ ५२,८७२ ग्रंथ व नियतकालिके, १९,७०० अहवाल अणुकेंद्रीय व संबंधित विज्ञाने यांमधील संशोधन व अध्यापन.
तंत्रविद्या : (१) अहमदाबाद टेक्स्टाइल इंडिस्ट्रिज रिसर्च असोसिएशन : अहमदाबाद स्था. १९४९ वस्त्रनिर्माण सल्ला, प्रशिक्षण व संशोधन ३५,००० ग्रंथ प्रकाशने – ACT (ATIRA कम्युनिकेशन्स ऑन टेक्स्टाइल्स) (त्रै.), UPDATIRA-ATIRA न्यूजलेटर (वर्षातून ६ वेळा), TEXINCON (त्रै.). (२) ऑटोमोटिव्ह रिसर्च असोसिएशन ऑफ इंडिया : (ARAI). पुणे स्था. १९६६ मोटारवाहन उद्योगाची संशोधन संस्था संशोधन व विकासाकरिता सोयीसवलती उपलब्ध करून देते मोटारवाहन व अभियंत्रिकी उद्योगाला तांत्रिक माहिती पुरविते परीक्षण प्रयोगशाळा ८,००० ग्रंथ प्रकाशने – ऑटोमोटिव्ह ॲबस्ट्रॅक्ट्स (मा.), एआरएआय न्यूजलेटर (त्रै.). (३) बिर्ला रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर ॲप्लाइड सायन्सेस : नागदा, मध्ये प्रदेश स्था. १९६५ राष्ट्रीय औद्योगिक वाढीला मदत करणारी नोंदणीकृत संघटना लगदा, कागद, सेल्यूलोज तंतू व प्रदूषणाचे निराकरण यांमध्ये संशोधन प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, बुलेटिन (त्रै.). (४) बॉम्बे टेक्स्टाइल रिसर्च असोसिएशन : (BTRA). मुंबई स्था. १९५७ सुती, रेशमी आणि इतर नैसर्गिक व कृत्रिम तंतूंच्या संस्करणांचे सर्व अंगांनी संशोधन प्रशिक्षण/संदेशवहन व ग्रंथालय सेवा, चर्चासत्रे इ. मुंबई विद्यापीठाची पदव्युत्तर अध्ययनाला मान्यता १५० संस्था-सदस्य प्रकाशन – BTRA स्कॅन (त्रै.). (५) ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्स : (BIS). नवी दिल्ली पूर्वीचे नाव ‘इंडियन स्टँडर्स इन्स्टिट्यूटशन स्था. १९४७ १९६२मध्ये कायदेशीर मान्यता ६,८९,००० मानके व तांत्रिक प्रकाशने, ४०० नियतकालिके प्रकाशने – करंट पब्लिश्ड इन्फर्मेशन ऑन स्टँडर्डायझेशन, स्टँडर्डस् वर्ल्डओव्हर-मंथली ॲडिशन्स टू लायब्ररी, स्टँडर्डस् इंडिया. [→ भारतीय मानक संस्था]. (६) सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च ऑन कॉटन टेक्नॉलॉजी : मुंबई स्था. १९२४ इंडियन कौन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च या संस्थेचा भाग ११,००० ग्रंथ प्रकाशन – वार्षिक अहवाल. (७) सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन : खडकवासला, पुणे स्था. १९१६ जलीय अभियांत्रिकी व संबंधित विषयांमधील मूलभूत व अनुप्रयुक्त संशोधन ४४,५१६ ग्रंथ, ५५७ नियतकालिके प्रकाशने -ॲन्युअल रिपोर्टस्, तांत्रिक टाचणे. [→ सेंट्रल वॉटर अँड पॉवर रिसर्च स्टेशन]. (८) डिरेक्टोरेट ऑफ पब्लिक इन्स्ट्रक्शन : पश्चिम बंगाल पुढील संशोधन संस्थांची देखभाल करते : बेंगॉल सिरॅमिक इन्स्टिट्यूट (कोलकता, स्था. १९४१), बेंगॉल टॅनिंग इन्स्टिट्यूट (कोलकाता, स्था. १९१९), बेंगॉल टेक्स्टाइल इन्स्टिट्यूट (सेरामपूर, स्था. १९०४), बेर्ह मपूर टेक्स्टाइल इन्स्टिट्यूट (बेर्हतमपूर, स्था. १९२५). (९) इंडियन लॅक रिसर्च इन्स्टिट्यूट : रांची, बिहार स्था. १९२४ रसायनशास्त्र, कीटकविज्ञान व विस्तार हे विभाग वनस्पती विज्ञाने व तंत्रविद्या शाखा २८,००० ग्रंथ प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, न्यूजलेटर. (१०) इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन : ठाणे, महाराष्ट्र स्था. १९५९ रबर आणि संबंधित उद्योग यांच्यासंबंधी संशोधन व विकास. (११) इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलिक्स अँड हायड्रॉलॉजी : पुंडी, तमिळनाडू स्था. १९४५ ८,००० ग्रंथ, ५,८७० नियतकालिके प्रकाशन – ॲन्युअल रिपोर्ट. (१२) नॅशनल कौन्सिल फॉर सिमेंट अँड बिल्डिंग मटेरियल्स: नवी दिल्ली स्था. १९६६ पूर्वीचे नाव ‘सिमेंट रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ सिमेंट आणि संबंधित उद्योग (नवीन सामग्रीच्या क्षेत्रातील) यांना योजनाबद्ध संशोधन व विकासात्मक मदत पुरविते ४१,००० ग्रंथ, अहवाल, १७० नियतकालिके प्रकाशने – सीआरआय करंट कंटेन्ट्स (द्वै.), रिसर्च रिपोटर्स, ऍन्युअल रिपोर्टस्, सिमेंट स्टँडडर्स ऑफ द वर्ल्ड, टेक्नॉलॉजी डायजेस्ट (मा.), एनसीबी क्वेस्ट (त्रै.). (१३) नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रॉलॉजी : (NIH). रूडकी, उत्तर प्रदेश स्था. १९७९ जलसाधनसंपत्ती मंत्रालयाच्या अखत्यारीत जलसाधनसंपत्तीचे सर्व अंगांनी संशोधन ७,००० ग्रंथ, ३,००० तांत्रिक अहवाल, ८७ नियतकालिके इ. प्रकाशने -जलविज्ञान समीक्षा, एनआयएच न्यूजलेटर, रिसर्च रिपोर्टस्. (१४) पल्प अँड पेपर रिसर्च इन्स्टिट्यूट : (PAPRI). जयक्यूपर, ओरिसा स्था. १९७४ लगदा व कागद तंत्रविद्या, सेल्युलोज व बहुवारिक रसायनशास्त्र या विषयांमध्ये संशोधन ७,००० ग्रंथ, नियतकालिके इ. प्रकाशने – ॲबस्ट्रॅक्ट इंडेक्स ऑफ पिरिऑडिकल्स (वर्षातून ६ वेळा), पीएपीआरआय इन्फर्मेशन बुलेटिन. (१५) रिसर्च डिझाइन्स अँड स्टँडर्डस् ऑर्गनायझेशन : लखनौ स्था. १९५७ नवीन रेल्वे भांडार व इतर मालमत्ता यांचे परीक्षण व चाचण्या घेते १,५०,००० ग्रंथ प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट, डॉक्युमेंटेशन नोट्स, इंडियन रेल्वे टेक्निकल बुलेटिन, संशोधन अहवाल इत्यादी. (१६) सिल्क अँड आर्ट सिल्क मिल्स रिसर्च असोसिएशन : वरळी, मुंबई स्था. १९५० कृत्रिम (मानवनिर्मित)
वस्त्रनिर्माण करण्यामध्ये संशोधन व विकास कृत्रिम तंतू, वस्त्रनिर्माण तंत्रविद्या, वस्त्रनिर्माण रसायनशास्त्र, विणकाम तंत्रविद्या आणि कृत्रिम वस्त्रनिर्माणाचे विपणन व व्यवस्थापन या विषयांचे तांत्रिक शिक्षण (पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रम) २६,००० ग्रंथ प्रकाशन – मॅन मेड टेक्स्टाइल्स इन इंडिया. (१७) टेलिकम्युनिकेशन्स रिसर्च सेंटर : नवी दिल्ली स्था. १९५६ ३३,३०० ग्रंथ. (१८) महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था : (महाराष्ट्र इंजिनिअरिंग रिसर्च इन्स्टिट्यूट मेरी MERI). नासिक स्था. १९५९ मुख्यत्वे पाटबंधारे प्रकल्प व इतर बांधकामे या क्षेत्रांत उद्भवणार्याल समस्यांसंबंधी संशोधन करणे १४ संशोधन विभाग व एक यांत्रिक विभाग प्रकाशने – स्थापत्य (त्रै.), पी. डब्ल्यू. डी. हँडबुक [→ महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था]. (१९) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स : बेंगळुरू, कर्नाटक स्था. १९०९ ३,५०,००० ग्रंथ १,५८९ पदव्युत्तर विद्यार्थी विज्ञान व तंत्रविद्या या दोन विद्याशाखा जीववैज्ञानिक विज्ञान, रासायनिक विज्ञाने, विद्युत्-विज्ञाने, यांत्रिक विज्ञाने आणि भौतिक व गणितीय विज्ञाने हे विभाग व ४१ विषय प्रकाशन – जर्नल. (२०) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मुंबई : पवई, मुंबई स्था. १९५८ ३,२४,००० ग्रंथ, १,५०० नियतकालिके ३७४ अध्यापक, ३,०४५ विद्यार्थी अवकाश-वैमानिकीय अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी, पृथ्वी वा तिचे भाग यांविषयीची विज्ञाने, विद्युत्-अभियांत्रिकी, मानव्यविद्या, औद्योगिक अभिकल्प केंद्र, धातुवैज्ञानिक अभियांत्रिकी, भौतिकी हे विषय. (२१) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली : नवी दिल्ली स्था. १९६१ स्थापत्य, यांत्रिक, विद्युत् व रासायनिक अभियांत्रिकी, वस्त्रनिर्माण तंत्रविद्या, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी या विषयांचे पदवी अभ्यासक्रम भौतिकी, रसायनशास्त्र, गणित, वस्त्रनिर्माण तंत्रविद्या, विद्युत्, यांत्रिक, रासायनिक व स्थापत्य अभियांत्रिकी, मानव्यविद्या व सामाजिक विज्ञाने, अनुप्रयुक्त यामिकी, जीवरासायनिक अभियांत्रिकी, जैव तंत्रविद्या, ऊर्जा अध्ययन, बहुवारिक विज्ञान व तंत्रविद्या इ. विविध अभियांत्रिकी व विज्ञान विषयांतील पीएच. डी. पदवीकरिता नोंदणी व संशोधन-सोयीसवलती दिल्या जातात. १,७४,००० ग्रंथ ३८० अध्यापक २,९०० विद्यार्थी. (२२) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नालॉजी, कानपूर : कानपूर, उत्तर प्रदेश स्था. १९६० राज्याचे नियंत्रण ३,८५,००० ग्रंथ, १,५०० नियतकालिके ३०६ अध्यापक, १,९५० विद्यार्थी प्रकाशने – कोर्सेस ऑफ स्टडी (वा.), रिसर्च डिझाइन अँड डिव्हलपमेंट कपॅबिलिटीज (वा.), रिसर्च रिपोर्टस्. वैमानिकीय अभियांत्रिकी, रासायनिक अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी,संगणक विज्ञान व अभियांत्रिकी, विद्युत्-अभियांत्रिकी, मानव्यविद्या व सामाजिक विज्ञाने, औद्योगिक व व्यवस्थापन अभियांत्रिकी, सामग्रीविज्ञान, गणित, यांत्रिक अभियांत्रिकी, धातुवैज्ञानिक अभियांत्रिकी, अणुकेंद्रीय अभियांत्रिकी, भौतिकी, लेसर तंत्रविद्या हे विषय. (२३) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, खरगपूर : खरगपूर, पश्चिम बंगाल स्था. १९५० २,८०,००० ग्रंथ ४५९ अध्यापक, ३,२०४ विद्यार्थी प्रकाशन – न्यूजलेटर (मा.) अवकाश-वैमानिकीय अभियांत्रिकी, कृषी अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र व विभागीय नियोजन, रासायनिक अभियांत्रिकी, रसायनशास्त्र, स्थापत्य अभियांत्रिकी, संगणक विज्ञान व अभियांत्रिकी, विद्युत्-अभियांत्रिकी, इलेक्ट्रॉनिकी व संदेशवहन अभियांत्रिकी, भूविज्ञान व भूभौतिकी, मानव्यविद्या व सामाजिक विज्ञाने, औद्योगिक अभियांत्रिकी व व्यवस्थापन, गणित, यांत्रिक अभियांत्रिकी, धातुवैज्ञानिक अभियांत्रिकी, खाणकाम अभियांत्रिकी, नाविक वास्तुशास्त्र व नाविक अभियांत्रिकी, भौतिकी हे विषय नीच तापमान अभियांत्रिकी केंद्र, संगणक केंद्र, सामग्रीविज्ञान केंद्र, रबर तंत्रविज्ञा केंद्र, ग्रामीण विकास तंत्रविद्या केंद्र. (२४) इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, चेन्नई : चेन्नई, तमिळनाडू स्था. १९५९ राज्याचे नियंत्रण ४०७ अध्यापक, २,४६० विद्यार्थी प्रकाशने-ॲन्युअल रिपोर्ट, हँडबुक अवकाश-वैमानिकीय अभियांत्रिकी, अनुप्रयुक्त यामिकी, रासायनिक अभियांत्रिकी, विद्युत्-अभियांत्रिकी, मानव्यविद्या व सामाजिक विज्ञान, अंकगणित, यांत्रिक अभियांत्रिकी, धातुवैज्ञानिक अभियांत्रिकी, महासागर अभियांत्रिकी, भौतिकी हे विषय. (२५) इंडियन स्कूल ऑफ माइन्स : (ISM). धनबाद, बिहार स्था. १९२६ पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर व संशोधन पदव्या १४१ अध्यापक, ७२५ विद्यार्थी ८७,००० ग्रंथस प्रकाशन – इन्साइड आयएसएम (त्रै.) अनुप्रयुक्त भूविज्ञान, अनुप्रयुक्त भूभौतिकी, अनुप्रयुक्त भौतिकी, इलेक्ट्रॉनिकी व उपकरण योजना, अभियांत्रिकी व खाणकाम अभियांत्रिकी, खनिज तेल अभियांत्रिकी हे विषय खाणकाम यांत्रिकीकरण, खाण पर्यावरण, संगणक केंद्र ही केंद्रे.
भारताबाहेरील संशोधन संस्था
(१) नॅशनल एरॉनॉटिक्स ॲडमिनिस्ट्रेशन : (NASA नासा). वॉशिंग्टन, डी. सी. प्रमुख संशोधन केंद्रे पुढीलप्रमाणे : (अ) लिंडन बी. जॉन्सन सेंटर : नासा, ह्यूस्टन, टेक्सस स्था १९६१ समानव अवकाशयान व आनुषंगिक प्रणाली यांचा अभिकल्प, विकास व चाचणी यांची जबाबदारी, तसेच अंतराळवीरांची निवड व प्रशिक्षण आणि समानव अवकाश-उड्डाणांचे प्रचालन यांची जबाबदारी ४९,००० ग्रंथ, ५,५०,००० तांत्रिक अहवाल, ६०० नियतकालिके प्रयोगशाळा – व्हाइट सँड्स टेस्ट फॅसिलिटी (लास क्रुसेस, न्यू मेक्सिको): स्था. १९६५ अवकाश इंजिने आणि आनुषंगिक प्रचालन प्रणाली यांच्या विकासात्मक व संक्रियात्मक परीक्षणे घेते सामग्री तंत्रविद्यासारख्या क्षेत्रातील चाचण्या घेते अवकाशीय घटक व प्रणाली यांचे पर्यावरणीय मूल्यमापन करते. (आ) गोडार्ड स्पेस फ्लाइट सेंटर : नासा, ग्रीनबेल्ट, मेरिलंड स्था. १९५९ अवकाश संशोधन ३,५०० सभा ५७,००० ग्रंथ, ३,५०० नियतकालिके. (इ) एम्स रिसर्च सेंटर : नासा, मोफेट फिल्ड, कॅलिफोर्निया (ई) जॉन एफ. केनेडी स्पेस सेंटर : नासा, फ्लॉरिडा स्था. १९६२ पूर्वीचे नाव लाँच ऑपरेशन्स सेंटर अवकाशयान क्षेपणाची सोय ३२,००० ग्रंथ, १,०६,००० दस्तऐवज व अहवाल, ५८९ नियतकालिके, १,६०,००० विनिर्देश व मानके. (उ) लँग्ली रिसर्च सेंटर : नासा, हॅम्प्टन, व्हर्जिनिया. (ऊ) लेविस रिसर्च सेंटर : नासा, क्लीव्हलँड, ओहायो. (ए) जॉर्ज सी. मार्शल स्पेस फ्लाइट सेंटर : नासा, AL स्था. १९६०.
(२) यूरोपीयन ऑर्गनायझेशन फॉर न्यूक्लिअर रिसर्च : (CERN सर्न Conseil europeenne pour la recherché nucleaire). जिनीव्हा, स्वित्झर्लंड स्था. १९५४ सभासद – ऑस्ट्रिया, बेल्जियम, झेक प्रजासत्ताक, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, ग्रीस, हंगेरी, इटली, नेदर्लंड्स, नॉर्वे, पोलंड, पोर्तुगाल, स्लोव्हाकिया, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड व युनायटेड किंग्डम मूलकणांसंबंधी संशोधन व सहकार्य करते अभ्यागत शास्त्रज्ञांच्या गटामार्फत अधिकाधिक संशोधन केले जाते कोणत्याही देशांतील शास्त्रज्ञांना सर्न येथे मर्यादित कालावधीसाठी पाचारण करता येते २८ गिगॅझलेक्ट्रॉन-व्होल्ट (GeV) क्षमतेचा प्रोटॉन सिंक्रोट्रॉन (PS), ४५० GeV क्षमतेचा सुपर प्रोटॉन सिंक्रोट्रॉन (SPS), निम्न ऊर्जा प्रतिप्रोटॉन वलय (LEAR) आणि २७ किमी. (LEP) इलेक्ट्रॉन-पॉझिट्रॉन आघातक यांच्या साहाय्याने संशोधन केले जाते, प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्ट (इंग्रजी व फ्रेंच भाषांमध्ये), सर्न कुरिअर (इंग्रजी व फ्रेंच भाषांमधून वर्षातून १० वेळा), वैज्ञानिक व तांत्रिक अहवाल इत्यादी.
(३) यूरोपीयन स्पेस एजन्सी : पॅरिस, फ्रान्स स्था. १९६४ अवकाश संशोधन व तंत्रविद्या आणि शांततामय उपयोगांकरिता त्याचे उपयोग पृथ्वीलगतचे पर्यावरण ते तारकीय ज्योतिषशास्त्र यांच्या अध्ययनाकरिता, अवकाश प्रयोग करण्याकरिता आवश्यक तांत्रिक सोयी पुरविते अनुप्रयुक्त उपग्रह प्रकल्पाचे यूरोपीय कार्यक्रम (दूरसंदेशवहन व वातावरणविज्ञान यांसह), अवकाश प्रयोगशाळा आणि एरिअन क्षेपणयान यांची जबाबदारी पुढील आस्थापनांना मदत करते : यूरोपीयन स्पेस रिसर्च अँड टेक्नॉलॉजी सेंटर (ESTEC), नोर्टव्हाइलक, नेदर्लंड्स यूरोपीयन स्पेस ऑपरेशन सेंटर (ESOC), डार्मस्टाट, जर्मनी यूरोपीयन स्पेस रिसर्च इन्स्टिट्यूट (ESRIN), फ्रॅस्काती, इटली यूरोपीयन सेंटर फॉर स्पेस लॉ, पॅरिस, फ्रान्स यूरोपीयन ॲस्ट्रानॉट सेंटर (EAC), कोलोन, जर्मनी सभासद – ऑस्ट्रिया, बेल्जियम, डेन्मार्क, फिनलंड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली, नेदर्लंड्स, नॉर्वे, स्पेन, स्वीडन, स्वित्झर्लंड आणि युनायटेड किंग्डम, कॅनडा विशेष सहकार्य कराराने संलग्न ESTEC ग्रंथालयात २०,००० ग्रंथ, १ लाख सूक्ष्म प्रतिमापट, २०,००० अहवाल व मानके प्रकाशने – ॲन्युअल रिपोर्टस्, बुलेटिन, जर्नल, अर्थ ऑब्झर्व्हेशन क्वार्टर्ली, रीचिंग फॉर द स्काइज (सर्व त्रैमासिके), न्यूज अँड व्ह्यूज (द्वै.), परिषदांचे कार्यवृत्तांत व तांत्रिक अहवाल.
सूर्यवंशी, वि. ल.
“
आपल्या मित्रपरिवारात शेअर करा..