वांग शृ – फु : (तेरावे वे शतक). चिनी नाटककार. दा-दू येथे जन्मला. याच्या जीवनाविषयी फारशी माहिती मिळत नाही. त्याने तेरा किंवा चौदा नाटके लिहिली. त्यांतील तीन आज पूर्णतः उपलब्ध असून त्यांतील स्यी-स्यांग जि (इं. शी. ‘रोमान्स ऑफ द वेस्टर्न चेंबर’) हे सर्वोत्कृष्ट मानले जाते.
एका प्रेमकहाणीवर हे नाटक रचिलेले आहे. वांगपूर्वी शेकडो वर्षे ही प्रेमकहाणी लोकांना ठाऊक होती आणि काहींनी तिला नाट्यरूप देण्याचा प्रयत्नही केला होता.परंतु वांगच्या ह्या नाट्यकृतीने अन्य नाट्यकृतींना निष्प्रभ केले. कथेला दिलेले प्रभावी नाट्यरूप, व्यक्तिरेखांच्या मानसिक संघर्षाचे केलेले प्रत्ययकारी चित्रण आणि उत्कृष्ट संवाद ही या नाट्यकृतीची काही शक्तिस्थाने होत.
थान जुंग (इं.) कुलकर्णी, अ. र. (म.)
“