वसंत कुसुमाकर : रससिंदूर आणि प्रवाळ, मौत्तिक, अभ्रक, रुपे, सोने, लोह, कथिल, शिसे यांचे भस्म उक्त प्रमाणात घेऊन शुभ दिवशी अडुळसा, हळद, ऊस, कमलपुष्प, मालतीपुष्प, केळीचा कांदा, चंदन यांचा यथासंभव रस, पाणी, काढा यांच्या सात-सात भावना देऊन खल करावा. हा रोगानुरूप अनुपानाने ते ते रोग नष्ट करतो. रोग पित्तप्रधान असताना याचा उत्तम उपयोग होतो. क्षय, प्रमेह, रक्तपित्त, वाती, अम्लपित्त यांवर उक्त अनुपानाबरोबर हा द्यावा. हा कामोद्दीपक, तुष्टीपुष्टी करतो.

जोशी, वेणीमाधवशास्त्री