रक्तगट: ⇨कार्ललँडस्टायनर या ऑस्ट्रियन-अमेरिकन विकृतिवैज्ञानिकांनी १९०० सालाच्या सुमारास मानवी रक्तातील तांबड्या कोशिका (पेशी) अलग काढून दुसऱ्या व्यक्तीच्या रक्तरसात (रक्त साखळल्यानंतर द्रवरूपात राहणाऱ्या रक्ताच्या भागात) मिसळल्यास त्यांचे समूहन होते (एकत्र होऊन पुंजका तयार होतो), हे दाखवून दिले. त्यापूर्वी १८७५ मध्ये लिओनार्ड लँडोइस या शास्त्रज्ञांनी एका जातीच्या प्राण्याच्या रक्तातील तांबड्या कोशिका दुसऱ्या जातीच्या प्राण्याच्या रक्तरसात मिसळल्यास त्यांचे समूहन होते, असे दाखवले होते. आपल्या प्रयोगामध्ये एकाच व्यक्तीच्या रक्तातील तांबड्या कोशिका व रक्तरस मिसळल्यास समूहन होत नाही, हेही लँडस्टायनर यांच्या लक्षात आले होते. अधिक संशोधनानंतर मानवी रक्ताची विभागणी

कोष्टक क्र. १. ABO पद्धतीतील प्रतिजन व प्रतिपिंड 

रक्तगट

तांबड्या कोशिकेवरील प्रतिजन

रक्तरसातील नैसर्गिक प्रतिपिंड

A

B

AB

O

A

B

A व B

प्रतिजन नाहीत

प्रतिरोधक – B

प्रतिरोधक – A

प्रतिपिंड नाहीत

दोन्ही प्रतिपिंड

तांबड्या कोशिकांच्या कलाच्छादनावरील (पातळ पटलमय आवरणावरील) विशिष्ट आनुवंशिक कारकावरून करता आली. कोशिकांवरील या प्रतिजनांना (किंवा समूहजनकांना) लँडस्टायनर यांनी A व B अशी नावे दिली. मानवी रक्तरसात दोन प्रतिपिंडेही आहेत व त्यांना प्रतिरोधक – A आणि प्रतिरोधक – B कोष्टक क्र. २ ABO पद्धत : रक्तगट निश्चितीअशी नावे दिली गेली [⟶ प्रतिपिंड]. या माहितीवरून मानवी रक्ताचे चार प्रकार अथवा रक्तगट ओळखता आले : (१) तांबड्या कोशिकांवर फक्त प्रतिजन – A असल्यास तो रक्तगट A रक्तरसात प्रतिपिंड प्रतिरोधक – B असतात. (२) कोशिकांवर फक्त प्रतिजन – B असल्यास रक्तगट B रक्तरसात प्रतिपिंड प्रतिरोधक – A असतात. (३) कोशिकांवर दोन्ही प्रतिजन A आणि B असल्यास रक्तगट AB रक्तरसात वरील प्रतिपिंडांपैकी कोणताही नसतो. (४) कोशिकांवर प्रतिजन – A आणि प्रतिजन – B हे दोन्ही नसल्यास रक्तगट O रक्तरसात दोन्ही प्रतिपिंडे असतात.

रक्तगटांच्या या विभागणी पद्धतीला ABO पद्धत म्हणतात व ती थोडक्यात कोष्टक क्र. १ मध्ये दिली आहे.

व्यक्तीचा रक्तगट ठरविण्याकरिता विशिष्ट पद्धतीने तयार केलेले रक्तरस वापरतात व त्यांना प्रतिरोधक – A रक्तरस अथवा B – रक्तरस आणि प्रतिरोधक – B रक्तरस अथवा A – रक्तरस अशी नावे आहेत. अज्ञात रक्तगट असलेल्या रक्तांच्या नमुन्याचे दोन भाग करतात व वरील रक्तरसात मिसळून परिणाम प्रत्यक्ष डोळ्यांनी किंवा सूक्ष्मदर्शकाखाली तपासून रक्तगटाची निश्चिती करता येते, हे कोष्टक क्र. २ मध्ये दर्शविले आहे.

 

विविधरक्तगटपद्धती: वरील प्रारंभिक संशोधनानंतर मानवी तांबड्या कोशिकांवर तीनशेपेक्षा अधिक रक्तगट प्रतिजन असल्याचे आढळून आले. यांशिवाय काही श्वेत कोशिकांची व बिंबाणूंशीही [⟶ रक्त] ते संबंधित असल्याचे समजले आहे. मानवी शरीराच्या जटिल बहुरूपतेचा हा एक प्रकार आहे. तांबड्या कोशिकांच्या प्रतिजन गुणधर्मावर आधारित अशा अनेक रक्तगट पद्धती शोधल्या गेल्या व त्यांतील

कोष्टक क्र. ३. प्रमुख मानवी रक्तगट पद्धती 

रक्तगट पद्धतीचे नाव

शोधाचे वर्ष

ABO

MN (किंवा MNSs)

P

Rh अथवा ऱ्हीसस

ल्यूथेरन

केल

ल्यूइस

डफी

किड

डिएगो

I

Xg

डॉमब्रॉक

१९००

१९२७

१९२७

१९४०

१९४५

१९४६

१९४६

१९५०

१९५१

१९५५

१९५६

१९६२

१९६५

प्रतिजनांना निरनिराळी नावे देण्यात आली. लँडस्टायनर यांनी आयुष्याच्या अखेरीपर्यंत (१९४३) रक्तासंबंधी संशोधन केले व १९४० मध्ये त्यांनी Rh अथवा ऱ्हीसस या एका महत्त्वाच्या रक्तगट पद्धतीचा शोध लावला. प्रमुख रक्तगट पद्धतींची नावे कोष्टक क्र. ३ मध्ये दिली आहेत.

वरील नावांपैकी काही नावे संशोधकांनी दिली आहेत आणि काही ज्या व्यक्तींच्या रक्तात हे विशेष फरक प्रथम आढळले त्या व्यक्तींच्या नावांवरून दिली गेली आहेत उदा., केल हे नाव केल नावाच्या स्त्रीच्या रक्तरसात प्रतिरोधक – K नावाचे विशिष्ट प्रतिपिंड प्रथम आढळल्यावरून त्या रक्तगटाला केल हे नाव मिळाले.

रक्तगट आनुवंशिक असून मेंडेल यांच्या आनुवंशिकी सिद्धांताप्रमाणे [⟶ आनुवंशिकी] पिढ्यान्‌पिढ्या कुटुंबातून येत राहतात. ‘सटर’ नावाचा रक्तगट सटर नावाच्या एका निग्रो रुग्णाच्या नावावरून ओळखला जातो. यातील विशिष्ट प्रतिजन विशेष लक्षण असून तो वंशागत असतो. २०% अमेरिकन निग्रोंमध्ये सापडणारा हा रक्तगट इतर वांशिक गटांत फार क्वचित आढळतो. प्रमुख रक्तगट प्रकार ABO, Rh वगैरे आनुवंशिकतः एकमेकांपासून स्वतंत्र असतात.


जवळजवळ दोनशे रक्तगटांची आनुवंशिक संरचना पूर्णपणे समजली आहे. दोन निकटवर्ती गुणसूत्रांवरील (एका पिढीतून पुढील पिढीत आनुवंशिक लक्षणे नेणाऱ्या सुतासारख्या सूक्ष्म घटकांवरील) जीन (आनुवंशिक लक्षणे निदर्शित करणारी एकके) रक्तगट निश्चिती करतात. हे जीन तीन प्रकारचे असतात. प्रकार O, प्रकार A आणि प्रकार B. यांपैकी प्रकार O जवळजवळ क्रियाशून्य असतो. एका गुणसूत्रावर एकाच प्रकारचा जीन असू शकतो. तीन प्रकारच्या जीनांपासून सहा प्रकारचे संयोग बनू शकतात : OO, OA, OB, AA, BB, आणि AB. या संयोगांना ‘आनुवंशिकीय संयोग’ म्हणतात व प्रत्येक व्यक्तीमध्ये या सहा संयोगांपैकी एकच वंशागत असतो. आनुवंशिकीय संयोग, रक्तगट, प्रतिजन आणि प्रतिपिंड यांचा संबंध कोष्टक क्र. ४ मध्ये दिला आहे.

तांबड्या कोशिकांशिवाय श्वेत कोशिकांवर व बिंबाणूंवरही प्रतिजन आहेत. त्यांमध्ये ABO शिवाय एका जटिल पद्धतीचे प्रतिजन असतात व त्यांना HLA असे नाव ह्यूमन लिम्फोसाइट अँटिजेन या इंग्रजी नावातील आद्याक्षरांवरून दिले आहे. हे प्रतिजन २५ पेक्षा जास्त प्रकारचे असून त्यांपैकी फक्त कोणतेही चारच एका व्यक्तीत असू शकतात. श्वेत कोशिकांवरील हे प्रतिजन ऊतक-प्रतिरोपण (त्याच व्यक्तीच्या शरीरातील एका ठिकाणचे वा अन्य व्यक्तीच्या शरीरातून घेतलेले

कोष्टक क्र. ४. आनुवंशिकीय संयोग व रक्तगट 

आनुवंशिकीय संयोग

रक्तगट

प्रतिजन

प्रतिपिंड

OO

OA किंवा AA

OB किंवा BB

AB

O

A

B

AB

A

B

A आणि B

प्रतिरोधक – A आणि

प्रतिरोधक – B

प्रतिरोधक – B

प्रतिरोधक – A

ऊतक-कोशिकासमूह-दुसऱ्या ठिकाणी बसविण्याच्या) शस्त्रक्रियेपूर्वी ऊतक प्रकार ठरविण्याकरिता उपयुक्त असतात.

वर उल्लेखिल्याप्रमाणे अनेक रक्तगट पद्धती शोधल्या गेल्या असल्या, तरी वैद्यकीय काही महत्त्वाच्या पद्धतींबद्दल खाली थोडक्यात माहिती दिली आहे.

Rhअथवाऱ्हीससपद्धत:१९३९ मध्ये पी. लेव्हिन व आर्‌. स्टेटसन या शास्त्रज्ञांनी एका मृतजात अर्भकाच्या मातेच्या रक्ताचा अभ्यास केला. त्या स्त्रीमध्ये तिच्या पतीच्या रक्ताचे ⇨रक्ताधानकेल्यानंतर रक्तविलयक प्रतिक्रिया (तांबड्या कोशिकांतील रक्तारुण-हीमोग्लोबिन-हे प्रथिन अलग होण्याची प्रतिक्रिया) उत्पन्न झाली होती. ABO पद्धतीप्रमाणे योग्य रक्त असूनही असे का झाले याबद्दल संशोधन केल्यानंतर ABO पद्धतीतील प्रतिजनांशिवाय आणखी काही प्रतिजन असावेत, अशी शंका आली. १९४० मध्ये लँडस्टायनर व अलेक्झांडर वीनर यांनी ऱ्हीसस (मॅकाकाम्युलाट्टा) माकडाच्या रक्तातील तांबड्या कोशिका सशाच्या रक्तात अंतःक्षेपणाने (इंजेक्शनाने) मिसळून काही प्रतिरोधक रक्तरस तयार केले. या रक्तरसांचा मानवी रक्तावरील परिणाम अभ्यासताना अमेरिकेतील ८५% गोरे लोक एका रक्तगटात, तर उरलेले १५% दुसऱ्या प्रकारच्या रक्तगटात असल्याचे आढळले. अधिक संशोधनानंतर ABO पद्धतीतील प्रतिजनांशिवाय निराळे प्रतिजन असावेत, हे समजले व त्यांना ‘Rh कारक अथवा घटक’ किंवा ‘Rh प्रतिजन’ असे नाव देण्यात आले. पुढे अनेक संशोधकांनी यासंबंधी संशोधन केल्यामुळे जीन, प्रतिजन व प्रतिरोधक-रक्तरस यांना निरनिराळी नावे दिली गेली. मुळातच जटिल असेलली ही पद्धत त्यामुळे अधिक घोटाळ्याची बनली.

या रक्तगटाविषयी थोडक्यात महत्त्वाची माहिती अशी : ज्या व्यक्तीच्या रक्तकोशिकांवर Rh प्रतिजन असतील तिला किंवा तिच्या रक्तगटाला ‘Rh धन’ (Rh – पॉझिटिव्ह) आणि हे प्रतिजन नसल्यास ‘Rh ऋण’ (Rh-निगेटिव्ह) अशा संज्ञा वापरतात. कधी कधी आर्‌. ए. फिशर आणि आर्‌. आर्‌. रेस या शास्त्रज्ञांनी वापरलेल्या CDE पद्धतीप्रमाणे रक्तगटांचा उल्लेख ‘D-धन’ किंवा ‘D-ऋण’ असाही करतात. ९५ % भारतीय D-धन असल्याचे आढळले आहे.

या पद्धतीच्या शोधामुळे पुढील गोष्टी साध्य झाल्या आहेत : (१) ABO पद्धतीप्रमाणे रक्त निवडूनही रक्ताधान प्रतिक्रिया निर्माण होत असत. त्या Rh पद्धतीमुळे टाळणे शक्य झाले. म्हणून ABO आणि Rh या दोन्ही पद्धतींप्रमाणे रक्तगट ठरविणे आवश्यक असते. (२) नवजात अर्भकातील गंभीर रक्तविलयजन्य रोग अथवा जन्मजात कावीळ या रोगाचे कारण समजले व प्रतिबंधात्मक उपाय योजता आले. (३) रक्तगटाची वैयक्तिक निश्चिती करता येऊ लागून न्यायवैद्यक व मानवशास्त्र यांच्या अभ्यासात प्रगती झाली [⟶ ऱ्हीसस घटक].

MNरक्तगटपद्धत:माकडाप्रमाणेच सशाच्या रक्तापासून बनविलेल्या प्रतिरोधक-रक्तरसाच्या मानवी तांबड्या कोशिकांच्या परिणामांवरून लँडस्टायनर आणि लेव्हिन यांनी ही पद्धत शोधली. कोशिकांवरील प्रतिजनांना त्यांनी M व N अशी नावे दिली. प्रतिरोधक-रक्तरस S आणि प्रतिरोधक-रक्तरस s यांच्या परिणामावरून या पद्धतीला MNSs असेही नाव पडले. M व N प्रतिजनांची उत्पत्ती M व N या दोन वैकल्पिक जीनांमार्फत नियंत्रित असते. प्रतिरोधक-रक्तरस S च्या शोधानंतर (१९४७) ही रक्तगट पद्धत बरीच जटिल असल्याचे लक्षात आले. रक्ताधान व नवजात अर्भकातील रक्तविलयन रोग यांच्याशी या रक्तगटाचा संबंध नसला, तरी मानवशास्त्र व आनुवंशिकी यांत आणि न्यायवैद्यकातील विवाद्य पितृत्व ठरवण्याकरिता ही पद्धत उपयुक्त ठरली आहे.

Xgरक्तगटपद्धत:अनेक वेळा रक्ताधान लागलेल्या एका रुग्णाच्या रक्तरसात मान, फिशर, रेस आणि इतर काही शास्त्रज्ञांना १९६२ मध्ये सापडलेल्या प्रतिपिंडाला त्यांनी ‘Xg’ असे नाव दिले. सर्व ज्ञात रक्तगट प्रतिजनांपेक्षा याचे वैशिष्ट्य म्हणजे ते X या लिंग गुणसूत्राशी [⟶ आनुवंशिकी] निगडित असते. फक्त ही एकच रक्तगट पद्धत लिंग गुणसूत्रांशी संबंधित असून वैद्यकात लिंग गुणसूत्रांशी संबंधित असलेल्या रोगांच्या अभ्यासात तिचा उपयोग करतात.

ल्यूइसरक्तगटपद्धत:ल्यूइस आडनावाच्या स्त्री रुग्णात प्रथम आढळलेल्या प्रतिजनावरून हे नाव देण्यात आले. प्रतिजनांना Lea व Leb अशी नावे आहेत. हे प्रतिजन प्रत्यक्षात तांबड्या कोशिकांचे नसून प्रथम रक्तरसात येतात व नंतर कोशिकांवर अधिशोषित होतात (कोशिकांच्या पृष्ठभागी आकृष्ट केले जाऊन तेथे साचतात). तांबड्या कोशिकांशिवाय लाळ व इतर काही शरीरद्रव्यांतही ते असतात. त्यांची निर्मिती ऊतकात होते व वयाच्या सहाव्या वर्षांपर्यंत ती पूर्ण झालेली नसते. ही रक्तगट पद्धत आनुवंशिकतः पूर्णपणे स्वतंत्र असते परंतु ABO पद्धतीतील जीन व या पद्धतीतील जीन यांची अन्योन्यक्रिया होत असावी. गर्भारपणी मातेच्या वारेतून गर्भाच्या रक्तात हे प्रतिजन शिरत नसल्यामुळे त्यांचा नवजात अर्भकातील रक्तविलयन रोगाशी संबंध नसतो. मात्र ते कधीकधी रक्ताधान प्रतिक्रियेत कारणीभूत असतात.


 Iरक्तगटपद्धत: वीनर, उंगर व इतर काही शास्त्रज्ञांनी १९५६ मध्ये शोधिलेल्या या रक्तगट पद्धतीतील प्रतिजनांना त्यांनी ‘I’ हे नाव दिले. यात दोन प्रतिजन असून दुसयास ‘i’ म्हणतात. जन्मापासून १८ महिन्यांच्या वयापर्यंत i — प्रतिजन कमजोर बनत जातो आणि I अधिक सूक्ष्म बनून निरोगी प्रौढावस्थेतही हीच अवस्था टिकते. १५,००० पैकी एकाच व्यक्तीत I — प्रतिजनांची न्यूनता असते व फक्त i — प्रतिजन तांबड्या कोशिकांच्या पृष्ठभागावर असतो. काही कारणांमुळे जेव्हा तांबड्या कोशिकांचे उत्पादन गर्भावस्थेतील उत्पादनासारखे बनते तेव्हा हे प्रतिजन गर्भावस्थेतील अवस्थेसारखेच बनतात. काही संसर्गजन्य रोगांत, तसेच लसीकार्बुद [⟶ लसीका तंत्र], संक्रामक एककेंद्रक कोशिकता (रक्तात एककेंद्रकी श्वेत कोशिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढणे) यांमध्ये या प्रतिजनांवर परिणाम होतो. काही रक्तरोगांशी [उदा., तनुकोशिक पांडुरोग ⟶ पांडुरोग] हा रक्तगट संबंधित असल्याने रक्ताधानाच्या वेळी कधी कधी तो विचारात घ्यावा लागतो.

जागतिकविभागणी: काही जनसमूहांतील ABO रक्तगटांच्या विभागणीसंबंधीची माहिती कोष्टक क्र. ५ मध्ये दिली आहे.

दुसऱ्या एका पाहणीचा निष्कर्ष कोष्टक क्र. ६ मध्ये दिला आहे.

न्यूझीलंडमधील माओरी आणि आर्क्टिक भागातील एस्किमो या जमातींत ५०% O रक्तगटाचे व ५०% A रक्तगटाचे, तर जपानमधील ऐनू जमातींत ३८%, आशियातील भारतीयांत ३७% व तार्तर लोकांत ३३% B रक्तगटाचे लोक आढळले आहेत. काँगोमधील पिग्मींमध्ये १०%, जपानी लोकांत ११%, ईजिप्शियन लोकांत १०% AB रक्तगटाचे लोक आढळतात. जागतिक लोकसंख्येतील रक्तगट विभागणीच्या अशा विविधतेचे कारण अजूनपर्यंत समजलेले नाही.

कोष्टक क्र. ५. काही जनसमूहांतील रक्तगटांची विभागणी (%)

जनसमूह

रक्तगट

O

A

B

AB

कॉकेशियन

निग्रो

मंगोलियन

४०

४२

२९

४५

२४

४२

१०

२८

२०

कोष्टक क्र. ६. काही जनसमूहांतील रक्तगटांची विभागणी (%)

जनसमूह

रक्तगट

O

A

B

AB

गोरे इंग्रज

पश्चिम आफ्रिकन निग्रो

उत्तर भारतीय

काही दक्षिण अमेरिकन इंडियन

४७

५४

३३

१००

४२

२०

२४

२२

३४

पहिल्या महायुद्धाच्या वेळी यूरोपियन सैनिकांशिवाय आशियायी, आफ्रिकन, मध्यपूर्वेतील व स्लाव्हिक सैनिकांचे रक्तगट तपासण्याची संधी मिळाली. त्या वेळी वांशिक व जातिभिन्नतेनुरूप रक्तगटात फरक होतात, हे लक्षात आले. याच संदर्भात B रक्तगटाबद्दल पुढील माहिती उपलब्ध झाली : मध्य चीनमध्ये या रक्तगटाचे प्रमाण ३५% आहे. दक्षिणेस भारताकडे हे हळूहळू कमी होत गेले. पश्चिमेकडे सायबेरियात ते कमी कमी झाले. अलास्कातील रहिवाश्यांत ते १०% आणि उत्तर अमेरिकेतील इंडियन लोकांत हे प्रमाण शून्यावर आले आहे.

Rh रक्तगटाचे प्रमाण यूरोपियन गोऱ्या लोकांत ८५% धन आणि कृष्णवर्णीय व पौर्वात्य लोकांत ९८% ते १००% धन आढळले आहे. उत्तर स्पेनमध्ये २५% ते ३५% Rh — ऋण रक्तगट, तसेच चीनमध्ये ९९% Rh— धन रक्तगट आढळतो.

महत्त्व: पूर्वनियोजित किंवा तातडीच्या रक्ताधानापूर्वी दाता व ग्राहक यांच्या रक्तगटांची तपासणी करून ते अनुरूप आहेत किंवा नाहीत हे ठरविणे आवश्यक असते. याविषयी अधिक माहिती ‘रक्ताधान’ या नोंदीत दिली आहे.

आ. १. नवजातातील रक्तविलयनजन्य रोगाचा विकास

 आ. २. Rh घटकामुळे उद्‌भवणाऱ्या प्रतिक्रिया : (अ) Rh — ऋण रुग्ण : (१) ऊतक कोशिका, (२) Rh — ऋण तांबड्या कोशिका, (३) Rh — धन तांबड्या कोशिका, (४) प्रतिपिंड, (५) दुसरे Rh — धन रक्ताधान (अंतःक्षेपण सुई रक्तवाहिनीत) (आ) Rh — ऋण माता (गर्भवती) व Rh — धन गर्भ : (१) ऊतक कोशिका, (२) वार.

नवजात अर्भकातील रक्तविलयजन्य रोग गर्भिणी व गर्भ यांच्या रक्तगटांच्या असंयोज्यतेमुळे (संयोग होण्यास अयोग्य असल्यामुळे) उत्पन्न होतो.

Rh-धन रक्तगटाचे रक्त चुकून Rh-ऋण रक्तगट असलेल्या स्त्री रुग्णास रक्ताधानात दिले गेल्यास किंवा गर्भिणीच्या प्रथम गर्भारपणात पित्यापासून Rh-धन रक्तगट मिळालेल्या गर्भाचे अल्पसे रक्त मातेच्या रक्तात मिसळले, तर तिच्या रक्तात प्रतिरोधक प्रतिपिंड निर्मिती होते.

Rh-धन रक्तगटाचे रक्त त्याच स्त्रीला दुसऱ्या वेळी दिले गेल्यास किंवा तिच्या दुसऱ्या गर्भारपणी गर्भाचा रक्तगट Rh—धन असल्यास निर्माण होणाऱ्या प्रतिपिंडाचे प्रमाण वाढते. हे प्रतिपिंड वारेतून गर्भाच्या रक्तात येऊन रक्तविलयनास कारणीभूत होतात.


कोष्टक क्र. ७. पितृत्व विवर्जन : ABO पद्धत

मातेचा

रक्तगट

अपत्याचा

रक्तगट

पित्याच्या

रक्तगटाची शक्यता

पित्याच्या

रक्तगटाची अशक्यता

O

O

O

A

A

A

A

B

B

B

B

AB

O

A

B

O

A

B

AB

O

B

A

AB

AB

O, A किंवा B

A किंवा AB

B किंवा AB

O, A किंवा B

कोणताही

B किंवा AB

B किंवा AB

O, A किंवा B

कोणताही

A किंवा AB

A किंवा AB

A, B किंवा AB

AB

O किंवा B

O किंवा A

AB

O किंवा A

O किंवा A

AB

O किंवा B

O किंवा B

O

Rh रक्तगटाच्या असंयोज्यतेमुळे सौम्य ते गंभीर विकृती नवजात अर्भकात निर्माण होते. तशीच परंतु अतिशय सौम्य ते सौम्य विकृती ABO रक्तगटांच्या असंयोज्यतेतून उद्‌भवते. माता बहुधा O रक्तगटाची असते व गर्भ A किंवा B रक्तगटाचा असतो. गर्भारपणात २०% तॆ २५% या प्रमाणात ABO असंयोज्यता आढळत असली, तरी फक्त १० पैकी एखाद्याच नवजातात रोग उद्‌भवतो.

विवाद्य पितृत्व ठरविण्याकरिता रक्तगट निश्चिती उपयुक्त ठरली आहे (उदा., पित्याच्या संपत्तीचा वाटा औरस अपत्याइतकाच अनौरस अपत्याला देण्याचा प्रश्न उद्‌भवतो तेव्हा अपत्याचे पितृत्व निर्धारित करणे आवश्यक असते). माता, अपत्य आणि लोक समजुतीप्रमाणे पिता असलेल्या व्यक्तीच्या रक्तगटांची तपासणी करून पितृत्व विवर्जन करता येते. अपत्यामध्ये माता किंवा पिता यांच्यापैकी एकाच्या रक्तगटाच्या कारक निश्चितच असतो. ABO व MN रक्तगट पद्धती वापरून अनुक्रमे कोष्टक क्र ७ व ८ मध्ये दर्शविल्याप्रमाणे अनुमाने काढता येतात.

केवळ ABO पद्धत वापरल्यास पितृत्त्वाचा आरोप खोटा असल्याची फक्त सु. २०% प्रकरणांत निश्चिती मिळते. MN पद्धतीमुळे ती १८% मिळते. याकरिता आणखी काही रक्तगट पद्धतींचा वापर करून जवळ जवळ ६८% पुरुष पितृत्वाच्या खोट्या आरोपातून मुक्त होऊ शकतात.

कोष्टक क्र. ८. पितृत्व विवर्जन : MN पद्धत

अपत्याचा रक्तगट

मातेचा रक्तगट

पित्याचा अशक्य रक्तगट

MN

MN

N

M

M

N

कोणताही

कोणताही

M

N

M

N

कधीकधी प्रसूतिगृहे किंवा बालकगृहे यांमध्ये मुलांची अदलाबदल झाल्यास मातृत्व ठरविण्याकरिता रक्तगट परीक्षा उपयुक्त ठरते.

जुळे, तिळे किंवा चतुष्क जन्मलेल्या अर्भकांतील फरक रक्तगट तपासणीने ठरवता येतात. ऑस्ट्रेलियात १९५० मध्ये जन्मलेल्या एका चतुष्काच्या तपासणीत चारही अर्भके एकमेकांपासून भिन्न असल्याचे व चार निरनिराळ्या अंड्यांपासून जन्मल्याचे आढळले होते.

मानवशास्त्राच्या अभ्यासात शरीरमापन, त्वचेचा रंग इत्यादींपेक्षा रक्तगट तपासणी अधिक उपयुक्त ठरली आहे. शरीरमापन व त्वचारंग यांतील व्यक्तिगत किंवा निरनिराळ्या जमातींतील बदल यांसंबंधीचे जीन निश्चित करणे अशक्य आहे. याउलट रक्तगटातील फरक एका जीन युग्मावर अवलंबून असून ते व्यक्तीत किंवा जनसमूहात ओळखता येतात.

काही जनसमूहांच्या अभ्यासानंतर काही रक्तगट प्रतिजन काही वंशांचे वैशिष्ट्य असल्याचे आढळले आहे.

कोष्टक क्र. ९. निरनिराळ्या वंशांतील विशेषता दर्शक रक्तगट प्रतिजन

जनसमूह (% प्रमाण)

रक्तगट पद्धत व प्रतिजनाचे नाव

कॉकेशियन

मंगोलियन

निग्रो

डिएगो, Dia

डफी, Fy (a—b—)

केल, Jsa

Rh, V

३६

६८ – ९०

२०

२७ – ४०

ABO पद्धतीशिवाय मानवशास्त्राच्या अभ्यासात MN पद्धतीचाही उपयोग करण्यात आला आहे. या पद्धतीतील काही क्वचित आढळणारे प्रतिजन फक्त निग्रो लोकांतच आढळले आहेत. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे S व s यांपैकी कोणतेही १% निग्रोंच्या रक्तातील तांबड्या कोशिकांवर नसते.

मानवी रक्तगटांच्या अभ्यासाव्यतिरिक्त ⇨नरवानरगणातील काही मानवेतर प्राण्यांच्या रक्तगटांचा अभ्यास करण्यात आला आहे. मानवी रक्तगट ठरविण्याकरिता जे विक्रियाकारक वापरतात तेच या प्राण्यांतील प्रतिजन ओळखण्याकरिता वापरता येतात. गोरिला वगळता इतर कपी ABO पद्धतीशी जुळतात. चिंपँझीमध्ये अधिक प्रमाणात A रक्तगट आढळतो, तर काही O रक्तगटाचेही असतात. ओरँगउटान बहुधा A व कधीकधी B किंवा AB गटाचे आढळतात. गिबन O शिवाय इतर कोणत्याही रक्तगटाचे असू शकतात. कपींच्या तांबड्या कोशिकांवर ‘M –सदृश’ व ‘N-सदृश’ प्रतिजन आढळले आहेत. मानवशास्त्रात मानव व ⇨मानवसदृशकपींचा अभ्यास अभिप्रेत असल्याने त्यांच्या रक्तगटांच्या अभ्यासाला विशेष महत्त्व आहे. [⟶ मानवशास्त्र].

रक्तगट निश्चित आनुवंशिकीय नियमांनुसारच तयार होतात. शिवाय ते ठरवणे सोपे असते त्यामुळे जननिक सहलग्नतेच्या अभ्यासाकरिता जननिक चिन्हक म्हणून त्यांचा उपयोग करतात. रक्तस्रावी रोग [⟶ रक्तक्लथन] हा लिंग-गुणसूत्राशी सहलग्न असल्यामुळे तो रक्तगटाशी निगडित असल्याचे समजते.

याशिवाय रक्तगटांचा आणि काही विकृतींचा संबंध असल्याचे आढळते. O रक्तगट असलेल्या व्यक्तींत ⇨पचनजव्रणांचे प्रमाण अधिक, तर A रक्तगट जठर कर्करोगाच्या व्यक्तींत अधिक आढळतो. HLA प्रतिजनांच्या अभ्यासावरून काही सांध्याच्या रोगांसंबधीची माहिती उपलब्ध झालेली आहे.

अवयव प्रतिरोपण शस्त्रक्रियेपूर्वी दाता व ग्राहक यांचे रक्तगट योग्य असावे लागतात. अन्यथा प्रतिरोपित

अवयव अस्वीकृत होण्याची शक्यता असते. ABO पद्धतीतील प्रतिजन या बाबतीत शक्तिशाली आहेत.

संदर्भ : 1. Best, H. C. Taylor, N. B. The Living Body, Bombay, 1961.

    2. Guyton, A. C. Textbook of Medical Physiology. Tokyo, 1976.

    3. Mourant, A. E. and others, The Distribution of HumanBloodGroups and other Polymorphisms, London, 1976.

   4. Race, R. R. Sanger, R. Blood Groups in Man, Philadelphia, 1962.

   5. Shah, S. J. and others, Ed., A.P. I. Textbookof Medicine, Bombay, 1986.

   6. Weatherall, D. J. and others, Ed., Oxford Textbook of Medicine, Oxford, 1984.

भालेराव, य. त्र्यं. कुलकर्णी, वि. श्री.