मूर्धतैल : (आयुर्वेद). डोक्यावर तेलाचा उपयोग करणे. याचे प्रकार चार : (१) अभ्यंग, (२) परिषेक, (३) बोळा व (४) बस्ती. हे क्रमान उत्तरोत्तर श्रेष्ठ आहेत. रुक्षता, कंडू इत्यादिकांवर अभ्यंग खवडे, डोके दुखणे, आग इत्यादींवर परिषेक केस गळणे, त्वचा फाटणे इत्यादींवर बोळा आणि तीव्रशिरारोग, अर्दित स्पर्शनाश, दृष्टिमांद्य इत्यादींवर बस्ती द्यावा.
बस्ती : डोक्याभोवती चामड्याचा पट्टा बांधून तेल न गळण्याकरिता उडदाचे पीठ लावूण विधियुक्त त्यात तेल डोके बुडेपर्यंत घालणे.
जोशी, वेणीमाधवशास्त्री