मिल्टन फ्रीडमनफ्रीडमन ,  मिल्टन  : (३१  जुलै  १९१२  –   ).  प्रख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ व  १९७६  च्या नोबेल पारितोषिकाचे मानकरी .  जन्म ब्रुकलिन ,  न्यू यॉर्क येथे स्थलांतरीत गरीब ज्यू कुटुंबात .  मिल्टन फ्री डमन पंधरा वर्षांचे असतानाच त्यांचे वडील मृत्यू पावले .  फ्रीडमन यांचे शिक्षण रट्‌गर्झ ,  शिकागो व कोलंबिया विद्यापीठांतून झाले .  रट्‌गर्झ विद्यापीठात शिकत असताना ,  फ्रीडमन यांच्यावर ऑर्थर बर्न्स  ( फेडरल रिझर्व सिस्टिमचे भावी अध्यक्ष )  आणि होमर जोन्स या दोघा प्राध्यापकांचा प्रभाव पडून त्यांना अर्थशास्त्राच्या अभ्यासात रु ची निर्माण झाली .  बर्न्स ह्यांनी अर्थशास्त्राच्या  अमूर्त सिद्धांताऐवजी अनुभवाधिष्ठित वैज्ञानिक दृष्टीवर अधिक भर देण्यास शिकविले ,  तर जोन्सनी सनातनी विचारसरणी त्यांच्या मनावर ठसविली .

  

 शिकागो विद्यापीठातून  १९३२  मध्ये पदवी संपादिल्यानंतर अर्थशास्त्राच्या पुढील अभ्यासक्रमासाठी फ्रीडमन शिकागो विद्यापीठात दाखल झाले .  शिकागो विद्यापीठातील अध्ययनकाळात फ्रीडमन यांच्यावर फ्रँक नाइट ,  ॲरन डिरेक्टर , जेकब व्हायनर ,  हेन्री सिमन्झ ,  हेन्री शुल्झ या विविध अर्थशास्त्रीय विचारसरणीच्या अध्या प कांचा प्रभाव पडला .  या सर्व मंडळींच्या वैचारीक मांडणीतूनच ‘ शिकागो संप्रदाय ’ ( शिकागो स्कूल )  म्हणून ओळखली जाणारी विचारसरणी विकसि त झाली .  फ्रीडमन आजमितीसही या संप्रदायाचे प्रमुख प्रवक्ते मानले जातात .

  

 फ्रीडमन यांच्या लेखनशैलीवर फ्रँक नाइट यांचा प्रभाव विशेष दिसून येतो .  छोटी परंतु नाट्यपू र्ण वाटतील अशी विधाने मांडावयाची व लगोलग ती अंशतः कशी चू क आहेत हे दाखवीत असतानाच ती मूलतः कशी सत्य आहेत हे पटवून देत जावयाचे ,  यावर त्यांचा भर असतो .  या त्यांच्या शैलीमुळे व डावपेचांमुळे फ्रीडमन हे सहसा विरोधकांच्या पकडीत न येणारे वादपटू म्हणून प्रख्यात आहेत .

  

 पुढे कोलंबिया विद्यापीठात वेस्ली मिचेल यांच्याजवळ फ्रीडमननी अर्थशास्त्राचे धडे गिरवि ले .  सामाजिक शास्त्रात निगमन पद्धती निरु पयोगी असून आर्थिक निर्णय हे विवेकनिष्ठ असतातच असे नाही ,  असा मिचेलचा वि श्वा स असल्याने त्यांचा भर अमूर्त तत्त्वां पासून सुरुवात करून तार्किक पद्धतीने मांडणी करीत जाण्यापेक्षा प्रत्यक्ष निरीक्षणावर अधिक होता .  मिचेल ह्यांनी फ्रीडमनवर विज्ञाननिष्ठेचे संस्कार केले .

  

  ‘नॅशनल रिसोर्सेस कमिटी ’ तर्फे  १९३५  मध्ये अमेरिकेतील सेवनाच्या विविधांगांचा अभ्यास हाती घेण्यात आला ,  त्यात फ्रीडमन सहभागी झाले . १९३७  मध्ये सायमन कुझनेट्स ह्यांनी त्यांना ‘ नॅशनल ब्यूरो ऑफ इकॉनॉमिक रिसर्च ’ तर्फे अमेरिकेतील स्वतंत्र व्यावसायिकांचा अभ्यास करण्यासाठी पाचारण केले .  वैद्य ,  दंतवैद्य ,  वकील ,  प्रमाणित हिशेबनीस व अभियंते यांच्या उत्पन्नांचा अभ्यास करून पुढे याच विषयावर प्रबंध लिहून फ्रीडमननी १९४६  मध्ये डॉक्टरेट मिळविली .  ब्यूरोतर्फे फ्रीडमननी स्टडीज इन इन्कम अँड वेल्थ च्या दुसऱ्या व तिसऱ्या खंडांचे संपादन केले ,  त्यात त्यांची साक्षेपी दृष्टी जागोजागी दिसते .

  

  फ्रीडमन यांचा विवाह  १९३८  मध्ये रो झ डिरेक्टर  ( शिकागो विद्यापीठातील ॲरन डिरेक्टर यांची भगिनी )  यांच्याशी झाला .  त्या शिकागो विद्यापीठात फ्रीडमन यांच्या सहाध्यायी होत्या व पुढे ‘ नॅशनल रिसोर्सेस कमिटी ’ त त्यांच्या सहकारी होत्या .  कॅपिटॅलिझम अँड फ्रिडम हा ग्रंथ लिहिताना त्यांना आपल्या पत्नीचे बहुमोल सहाय्य झाले .

  

  कार्नेगी कॉर्पोरेशनच्या आर्थिक साहाय्याने  १९४१  मध्ये अमेरिकन अर्थव्यवस्थेतील संभाव्य चलनवाढीचा अंदाज घेण्यात येऊन ती टाळण्याच्या उद्देशाने किती कर आकारणी करावी लागेल ,  हे ठरविण्यासाठी कोलंबिया विद्यापीठातर्फे एक प्रकल्प हाती घेण्यात आला .  त्यात सह निर्दे शक म्हणून काम करीत असताना द्रव्यविषयक प्रश्नांकडे व साकलिक अर्थशास्त्रीय सिद्धांतांकडे फ्रीडमन यांचे लक्ष वेधले .  या विषयावरील त्यांचा दृष्टिकोन टॅक्सिंग टू प्रिव्हेन्ट इ न्फ्ले शन  (१९४३ )  या पुस्तकात ग्रथित झाला आहे .  अंदाजपत्रकातील तूट कोणत्या पद्धतीने भरून काढली जाते व तिचा द्रव्याच्या पुरवठ् यावर कोणता परिणाम घडून येतो ,  यावरच चलनवाढीचे स्वरूप अवलंबून राहील असे फ्रीडमन यांनी प्रतिपादिले आहे .  तथापि दुसऱ्या महायुद्धकाळापर्यंत त्यांची द्रव्यवादी भूमिका तयार झालेली नव्हती .  फ्रीडमन हे द्रव्यवादाचे  ( मॉनेटरिझम )  आद्य प्रवर्तक मानले जातात .  राजकोषीय नीतीवर भर देणाऱ्या केन्सवादाचा विरोध फ्रीडमननी सतत केला आहे .

 अमेरिकेच्या वित्तखात्याच्या कर – संशोधन विभागातर्फे  १९४१ – ४३  या काळात करसुधारणा विधेयकांचे आराखडे तयार करण्याचे काम फ्रीडमननी केले . १९४६  मध्ये अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून त्यांची शिकागो विद्यापीठात नेमणूक झाली ,  तेव्हापासून आजतागायत स्वतंत्र बाजारयंत्रणेचा पुरस्कर्ता व अर्थव्यवस्थेतील स र कारी हस्तक्षेपाचा कट्टर विरोधक ही भूमिका त्यांनी कायम ठेवली आहे .

  


 ॲना जे .  श्वा र्ट्‌झ यांच्याबरोबर लिहिलेला फ्रीडमन यांचा बहुचर्चित व प्रशंसित ग्रंथ ए मॉनेटरी हिस्टरी ऑफ द युनायटेड स्टेट्स  १८६७ – १९६७  हा  १९६३  मध्ये प्रसिद्ध झाला .  त्यात  १९३०  ची महामंदी  ( ग्रेट डि प्रे शन )  ही अमेरिकेत द्रव्यपुरवठा कमी झाल्याने उद्‌भवली ,  असे मत मांडले आहे .  परंतु टी काकारांनी त्याचा प्रतिवाद करताना  १९२९  ते  १९३२  या काळात द्रव्यपुरवठ्यात तीन टक्क्यांनी घट झाली ,  तर किंमतींमध्ये मात्र  ३०  टक्क्यांनी घट व बेकारीत  २५  टक्क्यांनी वाढ झाल्याचे दाखवून दिले आहे .

  

  फ्रीडमन यांनी  १९६४  साली अमेरिकन राष्ट्रध्यक्ष्यांच्या निवडणुकीत बॅरी गोल्डवॉटर यांचा व  १९६८  मध्ये रिचर्ड निक्सन यांचा प्रचार केला . १९७२  पर्यंत तरी निक्सन प्रशासनाच्या आर्थिक धोरणावर फ्रीडमन यांच्या विचारांची स्पष्ट छाप दिसते .  

  

  फ्रीडमन यांची  १९६७  मध्ये ‘ अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशन ’ चे अध्यक्ष म्हणून निवड झाली .  फ्रीडमन यांचा बाजारपेठेच्या यंत्रणेवरील विश्वास हा भांडवलशाहीवरील असलेल्या त्यांच्या श्रद्धेतून जन्माला आलेला आहे . भांडवलशाही भौतिक संपन्नतेची जन्मदात्री तर आहेच ,  परंतु मानवी स्वातंत्र्याची ती एक पूर्वअटही आहे ,  असे त्यांना वाटते .  भांडवलशाहीचा सर्वांत मोठा लाभ संपत्तीचा संचय नसून स्त्री – पुरुषांना आपली क्षमता विकसि त करण्याची मिळवून दिलेली संधी ,  हा आहे ,  असे फ्रीडमनना वाटते .  कॅपिटॅलिझम अँड फ्री डम  (१९६२ )  या ग्रंथात भांडवलशाहीमुळे ज्यांचा सर्वात अधिक फायदा होतो ,  असे अल्पसंख्य गट भांडवलशाहीचे कट्टर विरोधक असतात ,  हा विरोधाभास त्यांनी लक्षात आणून दिला .  परंतु भांडवलशाहीला असलेला धोका हा समाजवादी वा साम्यवादी विचारसरणीकडून नसून भांडवलशाहीनेच निर्माण केलेल्या कल्याणका री राज्यापासून आहे  त्यातूनच कमालीची चलनवाढ ,  आर्थिक अव्यवस्था व एकाधिकारशाहीला निमंत्रण मिळते ,  असे त्यांना वाटते .

  

  फ्रीडमनना  १९७६  चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितो षिक मिळाल्याचे घोषित झाल्यानंतर चिलीमधील लष्करी उठावात फ्रीडमन यांचा हात असल्याचा आरोप खुद्द नोबेल पारितोषिक समितीच्या काही सदस्यांनी केल्यामुळे मोठेच वादळ निर्माण झाले होते .  फ्रीडमन  –  समर्थकांनी अर्थातच त्या आरोपाचा प्रतिवाद केला .

  

  एसेज इन पॉझिटिव्ह इकॉनॉमिक्स  (१९५३ ),  ए थिअरी ऑफ द कन्झम्प्‌शन फंक्शन  (१९५९ ),  प्रोग्रॅम फॉर मॉनेटरी स्टॅबिलीटी  (१९५९ ),  इन्फ्ले शन  :   कॉझिस अँड कॉन्सिक्वेन्सिस  (१९६३ ),  द ग्रेट कॉन्ट्रॅक्शन  (१९६५ ), प्राइस थिअरी  (१९७६ ),  इन्फ्ले शन अँड द रोल ऑफ गव्हर्नमेंट  (१९७८ ),  फ्रि टू चूज  (१९८० ) ( सहलेखिका  :  रोझ फ्रीडमन )  हे फ्रीडमन यांचे काही महत्त्वाचे ग्रंथ आहेत .

  

फ्रीडमन हे न्यूजवीक या सुप्रसिद्ध अमेरिकन साप्ताहिकाचे स्तंभलेखक म्हणूनही काम करतात .  टेनिस ,  सुतारकाम ,  व्याख्याने हे फ्रीडमन यांचे फुरसतीचे छंद आहेत .

 हातेकर ,  र .  दे .