फ्रिट , आल्फ्रेट हेर्मान : (११ नोव्हेंबर १८६४ – ५ मे १९२१ ). जर्मन शांततावादी चळवळीचा एक संस्थापक , शांततेच्या नोबेल पारितोषिकाचा सहमानकरी व ऑस्ट्रियन विचारवंत . जन्म व्हिएन्ना येथे . ऐन तारु ण्यात तो बर्लिनमध्ये गेला आणि त्याने पुस्तक विक्रेत्याचा धंदा सुरू केला . तो नियतकालिकांतून स्फुट लेखनही करीत असे . बर्लिनमधील वास्तव्या त त्याचा बेर्टा फोन झुटनर या शांततावादी थोर स्त्रीशी परिचय झाला . तिच्या प्रभावामुळेच फ्रिटने ‘ तुमची शस्त्रे खाली ठेवा ’ (Die Waffen neiderl ) या नावाचे एक नियतकालिक जागतिक शांततेच्या प्रसारार्थ काढले . (१८९१ ). हेच नियतकालिक १८९९ पासून ‘ शांतता रक्षक ’ ( Friedenswarte ) या नावाने प्रसिद्ध होऊ लागले . झुटनरच्याच प्रेरणेने व सहाय्याने पुढे त्याने ‘ जर्मन शांतता संघ ’ स्थापन केला . (१८९२ ). पहिल्या महायुद्धापूर्वी हा संघ जर्मनीतील शांततावादी चळवळीचा केंद्रबिंदू होता . फ्री ट मूलतः शांततावादी होता आणि आंतरराष्ट्रीय अराजकतेला तोंड देण्यासाठी कायदेशीर उपाय आणि अध्यात्मिक जीवनदृष्टी यांचे पुनरुज्जीवन यांचा त्याने पुरस्कार केला .
पहिले महायुद्ध सुरू होताच , फ्री टने जर्मनीच्या आक्रमक आणि युद्धखोर धोरणावर टी का केली व त्या धोरणाच्या निषेधार्थ स्वित्झर्लंडमध्ये प्रया ण केले . तेथून तो आंतरराष्ट्रीय सामंजस्य आणि संघटना यासंबंधीचे लेखन प्रसिद्ध करू लागला . तत्काळ शांतता प्रस्थापित व्हावी , म्हणून युद्धग्रस्त राष्ट्रांना त्याने आ वाह न केले व त्या दृष्टीने तातडीचे प्रयत्न सुरू केले . पहिल्या महायुद्धानंतर व्हर्साय येथे शांतता तह झाला . (१९१९ ). तो त्याला मान्य नव्हता तथापि जर्मनीने आपल्या लष्करी बळावर तो तह धुडकावून लावू नये , म्हणून त्याने इशारा दिला . फ्री टने जागतिक शांततेसंबंधीचे आपले विचार Handbuch der Friedensbewegung ( इं . भा . हँड बुक ऑफ द पीस मुव्हमेन्ट , २ खंड , १९११ – १३ ) व Mein kriegstagebuch ( इं . भा . माय वॉर डायरी , ४ खंड , १९१८ – २० ) या दोन ग्रंथां तून मांडले आहेत . शांततेच्या कार्याबद्दल त्यास टोबीआस मीखाएल कारेल आसर (२८ एप्रिल १८३८ – २९ जुलै १९१३ ) याच्या बरोबर नोबेल पारितोषिक दिले (१९११ ). जर्मन आंतरराष्ट्रीय विधिज्ञांवर त्याच्या विचारांचा प्रभाव पडल्याचे दिसून येते . तो व्हिएन्ना येथे मरण पावला .
फ्री टबरोबर नोबेल शांतता पारितोषिक मिळविणारा डच विधिज्ञ आसर नेदर्लंड्समधील ॲम्स्टरडॅम येथे जन्मला . तो ॲम्स्टरडॅम विद्यापीठात आंतरराष्ट्रीय कायद्याचा प्राध्यापक होता . (१८६२ – ९३ ) त्याने आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने Revue de Droit International et de Legislation Compare’e ( इं . भा . रि व्ह्यू ऑफ इंटरनॅशनल लॉ ॲन्ड कंपॅ रेटिव्ह लेजिस्लेशन ) हे नियतकालिक सुरू केले (१८६९ ). द हेग येथील शांतता परिषदांत त्याने हॉलंडचे प्रतिनिधि त्व केले . (१८९९ – १९०७ ). त्याने आंतरराष्ट्रीय शांततेसाठी द इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल लॉ ही संस्था स्थापण्यात पुढाकार घेतला (१८७३ ). या संस्थेस १९०४ मध्ये शांततेचे नोबेल पारितोषिक मिळाले . त्याने द हेग येथील शांतता परिषदेत (१८९९ ) शांततेसाठी एक कायम स्वरूपाचे लवाद न्यायालय स्थापन करण्यात पुढाकार घेतला . त्याचा तो सभासदही होता . या कामगिरीबद्दल त्याला नोबेल पारितोषिक दिले . तो द हेग येथे मरण पावला .
देशपांडे , सु . र .