फ्रॉस्ट , रॉबर्ट : (२६ मार्च १८७४ – २९ जानेवारी १९६३ ). विख्यात अमेरिकन कवी . सॅन फ्रॅन्सिस्को येथे जन्मला . त्याचे माध्यमिक शिक्षण लॉरेन्स येथे झाले . १८९७ मध्ये त्याने हार्व्ह र्ड विद्यापीठात प्रवेश घेतला परंतु तेथे दोन वर्षे राहिल्यानंतर तो पुन्हा लॉरेन्सला परतला . त्यानंतर अनेक प्रकारच्या नोकऱ्या केल्यावर डेरी , न्यू हँ पशर येथे आपल्या आजोबांची शेतीवाडी त्याने काही काळ पाहिली . तेथील एका शिक्षणसंस्थेत शिक्षक म्हणूनही काम केले . डेरी येथील वास्तव्यात फ्रॉस्टने एमर्सन वाचला त्याच्या साहित्याचा फ्रॉस्टच्या मनावर खोल संस्कार झाला . डेरी येथील निसर्गात त्याने उत्कट रस घेतला कविता केल्या . १९१२ मध्ये तो इंग्लंडला आला . अ बॉइज विल (१९१३ ) आणि नॉर्थ ऑफ बॉस्टन (१९१४ ) हे त्याचे पहिले दोन काव्यसंग्रह इंग्लंडमध्ये प्रसिद्ध झाले . १९१५ मध्ये तो अमेरिकेस परतला . त्यानंतर मुख्यतः शेती करणे आणि निरनिराळ्या शिक्षणसंस्थांतून शिकविणे हे व्यवसाय त्याने केले . शेतकामाने त्याला त्याच्या काव्याचे विषय पुरवले इतकेच नव्हे , तर त्याच्या काव्याचे स्वरूपही सिद्ध केले . कविता ही कुदळ , फावडे ह्या अवजारांसा र खी चोख आणि सरळसोट असावी , असे तो म्हणे . आयुष्याच्या अखेरीपर्यंत तो कविता करीत होता . बॉस्टन येथे त्याचे निधन झाले .
उपर्युक्त दोन संग्रहाखेरीज न्यू हँपशर ए पोएम विथ नोट्स अँ न्ड ग्रेस नोट्स (१९२३ ), वेस्ट – रनिंग ब्रूक (१९२८ ), अ फर्दर रेंज (१९३६ ), अ विटनेस ट्री (१९४२ ), अ मास्क ऑफ रीझन (१९४५ ), स्टीपल बुश (१९४७ ), अ मास्क ऑफ मर्सी (१९४७ ) आणि अँ न्ड ऑल वी कॉल अमेरिकन (१९५८ ) हे त्याचे काही उल्लेखनीय काव्यसंग्रह होत .
‘ काव्याचा जन्म आनंदात आणि शेवट तत्वचिंतनात होतो ’ असे फ्रॉस्ट म्हणत असे . साध्या विषयातील मोठा आशय टिपून घेण्याची शक्ती अविस्मरणीय व्यक्तिरेखा निर्मिण्याचे कौशल्य संयत, सूचक शैली निसर्गाकडे डोळसपणे पाहण्याची प्रवृत्ती बोलभाषेचा हृद्य उपयोग सूक्ष्म , मार्मिक विनोद आणि अभिव्यक्तीतील दुर्बोधतेचा संपूर्ण अभाव ही फ्रॉस्टच्या कवितेची महत्वाची वैशिष्ट्ये होत . लहानलहान भावगेय कवितांपासून दीर्घ , नाट्यात्म काव्यांपर्यंत रचनेचे वेगवेगळे प्रकार फ्रॉस्टच्या कवितेत आढळून येतात . ग्रीक – लॅटिन साहि त्या च्या जन्मभरच्या उपासनेतून अभिजात , अविनाशी काव्याचे गुण त्याने आत्मसात केले होते . म्हणूनच त्याची कविता वरवर साधी वाटली , तरी तो साधेपणा फसवा आहे . त्याची कविता अतिशय गाढ व संपन्न आहे . फ्रॉस्टची संपूर्ण कविता कंप्लीट पोएम्स ऑफ रॉबर्ट फ्रॉस्ट ह्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे (१९५१ ).
लाँगफेलो व वॉल्ट व्हिटमन या थोर अमेरिकन कवींनंतर अखिल अमेरिकेचा प्रातिनिधिक कवी अशी मान्यता फ्रॉस्टला मिळाली . अमेरिकेतील विख्यात वा ङ्म यीन पुलीट्झर पारितोषिक त्याला चार वेळा मिळाले . ह्यांशिवाय अन्य अनेक मानसम्मान त्याला मिळाले . जॉन केनेडी ह्यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर त्यानिमित्त झालेल्या जाहीर समारंभप्रसंगी प्रारंभीचे शुभचिंतन करण्याचा अपूर्व मान रॉबर्ट फ्रॉस्टला देण्यात आला . त्या वेळी ‘ द गि फ्ट आ उ टराइट ’ ही अमेरिकेबाबतची आपली सुप्रसिद्ध कविता त्याने गायिली . फ्रॉस्ट हा पंडित जवाहरलाल नेहरू ह्यांचा आव ड ता कवी .
‘ द वुड्स आर ल व्ह्ली , डार्क ऍन्ड डीप ,
बट आय हॅव प्रॉमिसीस टू कीप ,
ॲ न्ड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ’
अँ न्ड माइल्स टू गो बिफोर आय स्लीप ’
ह्या फ्रॉस्टच्या एका कवितेतील ओळी त्यांना विशेष आवाहक वाटत. अ वे आ उट ( १९२९ ) नावाचे एक नाटकही त्याने लिहिले आहे .
संदर्भ : 1. Browey, R. W. The Poetry of Robert Frost, New York, 1963.
2. Cook, R. L. Robert Frost : A Living Voice, St. Amherst, Mass., 1974.
3. Cox, J. M. Ed. Robert Frost : A Collection of Critical Essays, Englewood Cliffs, 1962.
4. Gerber, P. L. Robert Frost, Twayne, 1966.
5. Gould, Jean, Robert Frost, New York, 1964.
6. Thompson, L. R. The Art and Thought of Robert Frost, New York, 1942.
7. United States Information Agency, Robert Frost, His Life, His Poems, His Land, Washington, D.C. 1965.
नाईक , म . कृ .
“