फोटॉन : विद्युत् चुंबकीय ऊर्जेच्या अविभाज्य व अत्यल्प मूल्य असलेल्या एका कणाला अथवा पुंजकणाला फोटॉन असे म्हणतात . फोटॉनाशी संबंधित असणाऱ्या प्रकाश तरंगाची कंप्रता ( एका सेकंदात होणाऱ्या कंपनांची संख्या ) जर v असेल , तर फोटॉनाची ऊर्जा h v एवढी असून त्याचा संवेग h v /c एवढा असतो (h = माक्स प्लांक यांचा विश्व स्थिरांक व c = निर्वातातील प्रकाशवेग ). प्रकाशाचे वरील कण स्वरूप गृहीत धरले , तर ⇨ कॉ म्पट न परिणाम , ⇨ प्रकाश वि द्यु त् व तत्सम आविष्का रां चे स्पष्टीकरण देता येते . व्यतिकरण इ . प्रकाशीय आविष्कारांचे विशदीकरण करण्याकरिता प्रकाशाचे तरंग स्वरूप लक्षात घ्यावे लागते [⟶ प्रकाश प्रकाशकी ]. आधुनिक विद्युत् गतिकीमध्ये ( विद्युत् , चुंबकीय व यांत्रिक आविष्कारांमधील संबंधाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रामध्ये ) विशिष्ट तरंगलांबी , वेगदिशा व ध्रुवीकरण या राशींनी फोटॉनाचे संपूर्ण स्वरूप निश्चित केले जाते , असे मानून लँ ब स्थानच्युती ( डब्ल्यू . ई . लँ ब या भौतिकीवि ज्ञां च्या नावाने ओळखण्यात येणारा आणवीय भौतिकीतील आविष्कार ) इ . आविष्कारांची मीमांसा दिली जाते . [⟶ पुंजयामिकी पुंज सिद्धांत ].
शिरोडकर , सु . स .