पोलिओ : मेरुरज्जू व मस्तिष्कस्तंभ यांमधील प्रेरक तंत्रिका एककांना पोलिओव्हायरस गटातील व्हायरसामुळे उद्‌भवणाऱ्या ⇨ तंत्रिका तंत्राच्या (मज्जा संस्थेच्या) एका सांसर्गिक रोगाला दैनंदिन भाषेत ‘पोलिओ’ म्हणतात. या रोगाचे संपूर्ण नाव ‘ॲक्यूट ॲन्टिरियर पोलिओमायलायटिस’ असे असून तो ‘इन्फन्टाइल पॅरालिसिस’ किंवा ‘बालपक्षाघात’ आणि जर्मन वैद्य याकोप फोन हाइने (१८००–७९) व स्वीडिश वैद्य कार्ल ऑस्कार मेडिन (१८४७–१९२७) यांच्या नावांवरून ‘हाइने-मेडिन रोग’ म्हणूनही ओळखला जातो. या रोगाचे संपूर्ण वर्णन ‘बालपक्षाघात’ या नोंदीत दिलेले आहे.

भालेराव, य. त्र्यं.