अध:स्वस्तिक : (प्रतिशेखर). भगोलाचा (निरीक्षक ज्याच्या मध्यावर आहे व ज्याची त्रिज्या अमर्याद आहे असा काल्पनिक गोल, → भगोल) ⇨खस्वस्तिक (शेखरबिंदू) व भूमध्य यांना जोडणारी रेषा तशीच पुढे वाढविल्यास पुन्हा भगोलास ज्या बिंदूत मिळते तो बिंदू. अध:स्वस्तिक, भूमध्य व खस्वस्तिक एकाच सरळ रेषेत असतात. क्षितिजापासून ९०पण खस्वस्तिकाच्या विरुद्ध अंगास अध:स्वस्तिक असते.

नेने, य. रा.