अबीर : (बुक्का). देवपूजेत, विशेषतः नैमित्तिक पूजेत देवाला वाहावयाची सुगंधी भुकटी. पूजा, कीर्तने, भजने, यात्रा इत्यादींच्या प्रसंगी भक्तमंडळी ही कपाळी लावतात. वारकरी संप्रदायातील लोक क्षेत्राहून परत येताना अबीर प्रसाद म्हणून आणतात. 

अबीराचे काळा अबीर व पांढरा अबीर असे दोन प्रकार आहेत. कोळसा, चंदन, नागरमोथा, बकुळीची फुले, वाळा, दवणा, मरवा, इत्यादींची वस्त्रगाळ पूड एकत्र मिसळून काळा अबीर तयार करतात. पांढरा अबीर हा कापूर, चंदन, वाळा, दवणा, नाचणी, देवदार, गव्हलाकचरा, लवंगा, वेलची इत्यादींच्या वस्त्रगाळ पुडीचा केलेला असतो. पांढरा अबीर  मुख्यतः बंगालमध्ये व जैन लोकांत वापरला जातो. 

वैद्य, श्री. द.