अपभ्रंश भाषा :इंडो-आर्यन भाषांच्या प्राचीन, मध्य व अर्वाचीन अशा तीन अवस्था स्थूलमानाने दिसून येतात. त्यांतील पहिली  संस्कृत, दुसरी प्राकृत व तिसरी अर्वाचीन आर्यभाषांची होय. काही अभ्यासक १००० ते १२०० च्या दरम्यान आढळून येणाऱ्‍या एका साहित्यिक भाषेला ‘अपभ्रंश’ हे नाव देतात. अपभ्रंश हा शब्द शिष्ट-भाषेशी न जुळणाऱ्‍या अशुद्ध भाषिकरूपांना उद्देशून पतंजलीनेही वापरला आहे (‘पूर्वनिपातेऽपभ्रंशो रक्ष्य:’ ५·२·२१). ‘शास्त्रेषु संस्कृतादन्यत्’ अशी दंडी त्याची व्याख्या करतो, तर वाग्भटालंकारकर्ता वाग्भट (बारावे शतक) ‘प्रादेशीय शुद्ध रूप’ असे त्याचे वर्णन करतो (अपभ्रंशस्तु यच्छुद्धं तत्तद्देशेषु भाषितम्).

झ्यूल ब्लॉक याच्या मते अपभ्रंश ही एक भाषिक अवस्था नसून, नव-आर्यभाषांच्या प्रारंभी वापरण्यात येणारी, प्राकृताचे अनुकरण करणारी, कधी संस्कृत रुपांनाही वाव देणारी एक लेखनशैली आहे. हेमचंद्राच्यासिद्धहेमचंद्र  या ग्रंथाच्या आठव्या अध्यायाच्या चौथ्या पादाची ३२९ ते ४४६ ही सूत्रे अपभ्रंशाची लक्षणे देतात. त्यांत आलेली अपभ्रंश काव्यातील केवळ काही उदाहरणे पाहिल्यास या भाषेचे निदान लेखनातले संमिश्र स्वरूप लक्षात येईल.

व्राचड व नागर हे अपभ्रंशाचे महत्त्वाचे भेद असून, त्यांची ध्वनिपद्धती जवळजवळ प्राकृतासारखी आहे. त्यांतील संस्कृत-

-प्राकृत ‘’ चे ‘’ हे परिवर्तन मराठीला अपरिचित आहे.

 रूपविचाराकडे लक्ष दिल्यास ही अवस्था प्राकृतच्या मानाने जरा पुढे गेल्याचे आणि नव-आर्यभाषांच्या जवळ आल्याचे दिसते. विभक्तिप्रत्ययांची पुढील रूपे लक्षात घेतल्यास त्याची अंशत: कल्पना येईल.

 

एकवचन

अनेकवचन

प्रथमा

द्वितीया

तृतीया पंचमी षष्ठी सप्तमी संबोधन

देव, देवा, देवु, देवो देव, देवा, देवु

देवे, देवें, देवे(वि)ण, देविं देवहे, देवहु

देव, देवसु, देवस्सु, देवहो, देवह

देवे, देवि

देव, देवा, देवु, देवो

देव, देवा. देव, देवा.

देवहिं, देवेहिं.

देवहु.

देव, देवहं.

देवहिं.

देव, देवा, देवहो.

‘अम्’ चे ‘उम्’ हे परिवर्तन, षष्ठीची ‘महार’, ‘तुहार’, ‘अम्हार’-‘हमार’, ‘तोहार’ अशी रूपे सिंहली, पश्चिम हिमालयाकडील भाषा, सिंधी व मराठी त्याचप्रमाणे जिप्सी या आर्यभाषा सोडून सर्वत्र आढळतात. क्रियापदात द्वि. पु. एकवचनाचा ‘अहु’ (प्राकृत—‘अह’) हे प्रत्यय मराठी व ओडिया सोडून उत्तरेकडे सर्वत्र आढळतात. मराठीशिवाय इतर सर्व भाषांत पूर्वकालवाचक अव्यय (ल्यूबंत) बनवण्यासाठी धातूला लागणारा प्रत्यय अपभ्रंशातील ‘इ’ (शौरसेनी —‘इअ,’ संस्कृत ‘य’) या प्रत्ययापासून आला आहे.

संदर्भ : 1. Bloch, Jules, La formation de la langue marathe, Paris, 1920.

           2. Bloch  Jules, LIndo-aryen, du Veda aux tempo modernes, Paris, 1934.

कालेलकर, ना. गो.