अल्बाइट : खनिज. स्फटिक त्रिनताक्ष गटातील, साधे किंवा सामान्यत: यमल [ àफेल्सपार गट]. स्फटिक पुष्कळदा (010) ला समांतर व चापट वडीसारखे असतात. पाटन : (001) उत्कृष्ट, (010) उत्तम [àस्फटिकविज्ञान पाटन]. भंजन खडबडीत ते शंखाभ. ठिसूळ. कठिनता ६—६.५ वि. गु. २.६०—२.६२. चमक काचेसारखी. पाटनाच्या पृष्ठाची चमक कधीकधी मोत्यासारखी. रंग पांढरा किंवा फिकट निळा, फिकट करडा किंवा लालसर किंवा हिरवट. पारदर्शक ते उपपारभासी (काहीसे दुधी काचेसारखे). कस रंगहीन. रा. सं. NaAlSi3O०. सामान्यतः याच्यात CaAl2Si208 याचा (ॲनॉर्थाइटाचा) अल्पसा अंश असतो. अल्बाइट हे’फेल्सपार’ नावाच्या एका महत्त्वाच्या गटातले खनिज असून ते पुष्कळ क्षारीय (सिलिकेचे प्रमाण कमी व सोडियम-पोटॅशियम यांसारख्या मूलद्रव्यांच्या खनिजांचे प्राबल्य असणाऱ्या) अग्निज खडकांत, पट्टिताश्मात व ðसुभाजात घटक-खनिज म्हणून आढळते. झिलई केल्यावर दुधी व इतर निरनिराळ्या रंगांची झलक दाखविणारे ‘चंद्रकांत’ (मूनस्टोन) नावाचे रत्न असते त्याचा काही अंश अल्बाइटाचा असतो.
ठाकूर, अ. ना.
“