अल् कूफा : इराकमधील प्राचीन शहर. हे बगदादपासून १२८ किमी. दक्षिणेस, युफ्रेटीसच्या हिंदीया उपनदीच्या काठी आहे. ६३८ मध्ये खलिफाने बसरा व कूफा ही शहरे स्थापली. सातव्या शतकात कूफा भरभराटलेले होते. ते अब्बासी खिलाफतीचे, शिक्षणाचे आणि संस्कृतीचे महान केंद्र होते. अरबी लिपी येथेच पूर्णत्वाला पोहोचली म्हणून या गावावरून अरबी लिपीच्या एका शैलीला ‘कूफी ’ नाव पडले. मध्ययुगात कार्पेथियनांनी वारंवार ते लुटले. त्यानंतर ॲन् नजफ व हिल्ला शहरांच्या उदयामुळे ते मागे पडले.

 

गद्रे, वि. रा.