आईन-इ-अकबरी: अकबरनामा या प्रसिद्ध फार्सी ग्रंथाचा तिसरा महत्त्वाचा भाग. ⇨अबुल फज्लने तो १५९८ साली लिहून पूर्ण केला. त्यात ⇨अकबराच्या काळातील सामाजिक, राजकीय व आर्थिक परिस्थितीसंबंधी आकडेवारीनिशी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे इतर फार्सी ऐतिहासिक ग्रंथांपेक्षा हा ग्रंथ वैशिष्ट्यपूर्ण झाला आहे.
फ्रॅन्सिस ग्लॅडविनने १७८३ साली हा ग्रंथ सारांशिला. त्याचे मराठी भाषांतर श्री. म. व्यं. लेले यांनी केले आहे. नंतर ब्लॉकमन व जॅरेट यांनी याचे इंग्रजीत सटिप्पण भाषांतर (१८४८) केले. हे भाषांतर सरस असून ते ग्राह्य मानण्यात येते.
पहा : अकबरनामा.
खोडवे, अच्युत