उभयधर्मी संयुगे: परिस्थितीस अनुसरून अम्लीय व क्षारकीय (अम्लाबरोबर विक्रिया झाल्यास लवणे देणाऱ्या संयुगांचे) असे दोन्ही गुणधर्म दाखविणारी संयुगे. उभयधर्मी संयुगांत मुख्यतः ॲल्युमिनियम, त्रिसंयुजी [तीन संयुजा असणारे, संयुजा] क्रोमियम, जस्त, द्विसंयुजी (दोन संयुजा असणारे) कथिल, शिसे, अ‍ँटिमनी, आर्सेनिक, सोने व प्लॅटिनम यांच्या ऑक्साइडांचा व हायड्रॉक्साइडांचा तसेच काही कार्बनी संयुगांचा समावेश होतो. उदा., ZnO. प्रबल अम्लाशी व प्रबल क्षारकाशी याच्या पुढील विक्रिया होतात (H+ आयनांचे प्रमाण जास्त असणाऱ्या अम्लाला प्रबल अम्ल व OH आयनांचे प्रमाण जास्त असलेल्या क्षारकाला प्रबल क्षारक म्हणतात. आयन म्हणजे विद्युत् भारित अणू, रेणू वा अणुगट).

ZnO

+

2HCI

=

ZnCl2

+

H2O

झिंक ऑक्साइड

हायड्रोक्लोरिक अम्ल

झिंक क्लोराइड 

 

ZnO 

+

2NaOH 

=

Na2ZnO2 

+

H2O

झिंक ऑक्साइड

सोडियम हायड्रॉक्साइड

सोडियम झिंकेट

 

काही कार्बनी रेणूंत अम्लधर्मी कारबॉक्सिल गट (COOH) व क्षारधर्मी ॲमिनो गट (NH2) असे दोन्ही गट असतात. त्यामुळे ती उभयधर्मी होतात. उदा.ग्लायसीन,H2N–CH2–COOH. ग्लायसीन जलीय विद्रावात कारबॉक्सिल गटाचे विगमन (रेणूंचे साध्या रेणूंत किंवा अणूत होणारे तात्पुरते विभाजन) होऊन एक हायड्रोजन आयन तयार होतो. त्यामुळे रेणूच्या एका टोकाशी ऋण भार निर्माण होतो. त्याच रेणूच्या दुसऱ्या टोकाशी असलेला ॲमिनो गट एक प्रोटॉन घेतो. त्यामुळे त्या टोकाशी धन भार निर्माण होतो. या विक्रियांमुळे पुढे दाखविल्यासारखा संकरित द्विध्रुवी आयन (त्स्वीटर आयन) निर्माण होतो.

+NH3– CH2– CO2

त्स्वीटर आयन 

ग्लायसीन स्वतः आणि संकरित आयन हे दोन्ही उभयधर्मी असल्यामुळे या विद्रावात H3Oची वाढ किंवा घट होणे शक्य नसते. अशा ठिकाणी अवक्षेपण (साका) होत नाही. परंतु pH मापक [विद्रावाची अम्लता किंवा क्षारकीयता मोजणारे उपकरण, → पीएच मूल्य] वापरून वरील गोष्टीचा पडताळा पाहता येतो.

मिठारी, भू. चिं.