आर्किमिडीज तत्त्व : एखादा पदार्थ द्रायूत (द्रवरूप किंवा वायुरूप पदार्थात) बुडविला असता त्यावर खालून वर अशी एक प्रेरणा लागू होते. तिला उत्प्रणोदन असे नाव आहे व तिचे मूल्य पदार्थाने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाएवढे असते. बाजूस सारलेल्या द्रायूचे आयतन (घनफळ) पदार्थाच्या बुडालेल्या भागाच्या आयतनाएवढेच असते. हे तत्त्व आर्किमिडीज या ग्रीक गणितज्ञांनी शोधून काढले.

उत्प्रणोदनामुळे पदार्थाच्या वजनात त्याने बाजूस सारलेल्या द्रायूच्या वजनाइतकीच घट होते. तरंगाणाऱ्या पदार्थाच्या बाबतीत उत्प्रणोदन = पदार्थाचे वजन, हा संबंध असतो.

पहा : घनता व विशिष्ट घनता द्रवघनतामापक.

शिरोडकर, सु. स.