आनंदसूत: (आयुर्वेद). सहापट गंधक जिरविलेल्या पाऱ्याचा हा कल्प आहे. प्रथम पारा बचनागाच्या चटणीत खलून, वांग्यात मसाला भरतो त्याप्रमाणे धोत्र्याच्या फळांत तो भरून कापडाच्या झोळीत तो कुचल्याच्या काढ्यात २४ तास शिजवावा, नंतर पारा वेगळा काढून पुन्हा याप्रमाणेच दोनदा करून, त्यात सहापट गंधक जिरवून रससिंदूर करावा. त्या रससिंदुरात वैक्रांत भस्म समभाग, जयपाळ १/१८ व बचनाग या सर्वांच्या दुप्पट घालून धोत्र्याच्या व माक्याच्या रसात मंद अग्नीवर शास्त्रोक्त पद्धतीने शिजवावा.
एका तांदूळाइतक्या प्रमाणात हा खडीसाखरेबरोबर द्यावा. कोणत्याही रोगावर अनुरूप अनुपानातून द्यावा.
जोशी, वेणीमाधवशास्त्री