आभोग : प्राचीन काळी धृपदगीताचे संगीतदृष्ट्या आणि शब्दरचनादृष्ट्या स्थायी, अंतरा, संचारी आणि आभोग असे जे चार भाग असत, त्यांतील आभोग हा चौथा भाग. प्रथमतः प्रत्येक भागात चार चरण नियमाने असत. आभोगामध्ये गायक हा तिन्ही सप्तकांतील स्वरांचा मुक्त उपयोग करून तारसप्तकात जाणे जितके शक्य असेल, तितके जात असे. दाक्षिणात्य संगीतात प्राचीन प्रबंधगायनाचे उद्ग्राह, मेलापक, ध्रुव आणि आभोग असे जे चार धातू (अवयव) असत, त्यांतील आभोग हा अंतिम धातू होय.

मंगरूळकर, अरविंद