हंटर, विल्यम : (२३ मे १७१८-३० मार्च १७८३). ब्रिटिश प्रसूतितज्ञ, शिक्षणतज्ञ आणि लेखक. त्यांच्या अध्यापन आणि वैद्यकीय सेवेने उच्च मानके निर्माण केली आणि घरकाम करणाऱ्या स्त्रियांच्या (सुईणींच्या) हातून प्रसूतिशास्त्र काढून घेऊन त्याला वैद्यक- शास्त्राची एक शाखा म्हणून प्रस्थापित केले.

विल्यम हंटर

हंटर यांचा जन्म लाँग काल्डरवुड (लॅनार्कशर, स्कॉटलंड) येथे झाला. त्यांनी वैद्यक विषयातील पदवी ग्लासगो विद्यापीठातून १७५० मध्ये प्राप्त केली आणि १७५६ मध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्याचापरवाना मिळविला. १७४६ सालापासून त्यांनी शस्त्रक्रिया तंत्र व शरीररचनाशास्त्र या विषयांचे पाठ (व्याख्याने) देण्यास सुरुवात केली व आयुष्यभर त्यांनी हे पाठ दिले. फ्रान्समध्ये असताना (१७४३-४४आणि १७४८) त्यांच्या असे लक्षात आले की, तेथील वैद्यकाचेशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला विच्छेदनासाठी स्वतंत्रपणे शवदिले जाते. ग्रेट ब्रिटनला परतल्यावर ती पद्धत त्यांनी तेथे सुरू केली.रॉयल ॲकॅडेमीच्या स्थापनेनंतर (१७६८) तेथे हंटर यांची शरीररचना-शास्त्राचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. त्यांनी ग्लासगो विद्यापीठाला पुस्तके, नाणी आणि कला (चित्रे/शिल्पे) यांचा आपला संग्रहभेट दिला. त्यामुळे स्कॉटलंडमध्ये पहिले सार्वजनिक ‘हंटर वस्तु संग्रहालय (हंटेरियन म्यूझीयम) निर्माण करण्याची प्रेरणा मिळाली.

हंटर यांनी १७५६ नंतर विशेषे करून प्रसूतिशास्त्रासंबंधीच्या सेवेवर भर दिला.त्या काळचे ते सर्वाधिक यशस्वी प्रसूतितज्ञ होते. त्यामुळे त्यांना ग्रेट ब्रिटनची राणी शार्लट यांचे विशेष वैद्य होण्याचा सन्मान मिळाला (१७६२). त्यांनी एकूण तीन ग्रंथ लिहिले. त्यांतील सर्वांत महत्त्वपूर्णग्रंथ द ॲनॅटॉमी ऑफ द ह्यूमन ग्रेव्हिड युटेरस, एक्झिबिटेड इन फिगर्स (१७७४) हा होय.

हंटर यांचे लंडन (इंग्लंड) येथे निधन झाले.

ढमढेरे, वा. रा. भालेराव, य. त्र्यं.