स्टाइन स्ट्रव्हल्स

स्ट्रव्हल्स, स्टाइन : (३ ऑक्टोबर १८७१—१५ ऑगस्ट १९६९). फ्लेमिश कथा-कादंबरीकार. मूळ नाव फ्रँक लातर. जन्म पश्चिम फ्लँडर्समधील कर्टराइकजवळील ह्यूल येथे. ॲव्हलगेम येथील शाळेत शिकत असतानाच आपल्यात लेखकाचे गुण आहेत, याची जाणीव त्याला झाली होती. पुढे तो जर्मन, इंग्लिश, डॅनिश ह्या भाषा, तसेच थोडीफार रशियन भाषा शिकला. द पाथ ऑफ लाइफ (१८९९, इं. भा. १९१५) हा त्याचा पहिला कथासंग्रह. १९०५ मध्ये कर्टराइकजवळील इंगूइगेम ह्या गावात तो स्थायिक झाला आणि लेखनाला त्याने पूर्णतः वाहून घेतले. वायव्य फ्लँडर्सच्या प्रदेशातील ग्रामीण जीवनात त्याला आपल्या लेखनाचे विषय मिळाले. त्याच्या सूक्ष्म निरीक्षणाला त्याच्या कल्पनाशक्तीची जोड मिळाली. परिसरातील वातावरणाशी भावनिक नाते जोडून आपल्या समृद्ध भाषाशैलीने तो आपल्या कथा-कादंबर्‍यांचा आशय जिवंतपणे मांडीत असे. त्याने निर्माण केलेल्या वाङ्मयीन जगात निसर्ग एक सर्वसाक्षी शक्ती म्हणून स्थायिक झाला आणि लेखनाला त्याने पूर्णतः वाहून घेतले. वायव्य फ्लँडर्सच्या प्रदेशातील ग्रामीण जीवनात त्याला आपल्या लेखनाचे विषय मिळाले. त्याच्या सूक्ष्म निरीक्षणाला त्याच्या कल्पनाशक्तीची जोड मिळाली. परिसरातील वातावरणाशी भावनिक नाते जोडून आपल्या समृद्ध भाषाशैलीने तो आपल्या कथा-कादंबर्‍यांचा आशय जिवंतपणे मांडीत असे. त्याने निर्माण केलेल्या वाङ्मयीन जगात निसर्ग एक सर्वसाक्षी शक्ती म्हणून अवतरतो. त्याने केलेले निसर्गचित्रण जगद्विख्यात चित्रकार ⇨ व्हिन्सेंट व्हान गॉखच्या चित्रशैलीची स्मृती जागृत करते. आपल्या कृषिजीवनातील समस्यांशी आणि आपल्या नियतीशी झगडणृया शेतकृयांच्या व शेतमजुरांच्या प्रभावी व्यक्तिरेखनासाठी तो विशेष ख्याती पावला. ओल्ड यान (१९०२, इं. भा. १९३६), ‘ द फ्लॅक्स फील्ड ’ (१९०७, इं. शी.) ह्या त्याच्या विशेष निर्देशनीय साहित्यकृती होत. त्याच्या कथा-कादंबऱ्यांमुळे फ्लेमिश गद्य संपन्न झाले.

इंगूइगेम येथे तो निधन पावला.

कुलकर्णी, अ. र.