स्नेल व्हान रॉयेन, व्हिलेब्रॉर्ट : (१३ जून १५८०—३० ऑक्टोबर १६२६). डच ज्योतिषशास्त्रज्ञ व गणितज्ञ. प्रकाशाच्या प्रणमनाच्या नियमासाठी प्रसिद्ध. त्यांनी त्रिकोणीकरणाची पद्धत शोधून का ढ ल्या मु ळे पृथ्वीचे आकारमान काढणे शक्य झाले आणि मापने घेण्याच्या पद्धतीत क्रांती घडून आली.
स्नेल यांचा जन्म नेदर्लंड्समधील लायडन येथे झाला. १६१३ मध्ये त्यांची लायडन विद्यापीठात त्यांच्या वडिलांच्या जागी गणिताचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली. १६२१ मध्ये त्यांनी प्रकाशाच्या प्रणमनाच्या नियमाचा शोध लावला. या नियमात एका विशिष्ट माध्यमातून दुसर्या माध्यमात प्रकाश
प्रणमित होतो तेव्हा विशिष्ट तरंगलांबीच्या प्रकाशा-साठी एक स्थिरांक (m) मिळतो, sin i / sin r = m ( येथे i = आपाती कोन, r = प्रणमन कोन ). यालाच स्नेल नियम असे म्हणतात. या नियमामुळे प्रकाशाच्या प्रणमनाचा संबंध पदार्थांच्या ( माध्यमांच्या ) गुणधर्मांशी असल्याचे दाखविता आले. त्यांचा हा नियम आधुनिक भूमितीय प्रकाशकीसाठी मूलभूत ठरला आहे [⟶ प्रकाशकी ]. गणितज्ञ म्हणून काम करीत असताना त्यांनी Eratosthenes Batavus हा ग्रंथ लिहिला.
स्नेल यांचे लायडन येथे निधन झाले.
भदे, व. ग.
“