खरगपूर : खड्गपूर. पश्चिम बंगाल राज्याच्या मिदनापूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शिक्षणकेंद्र. रेल्वे वसाहत, तंत्रसंस्था, शहर व गाव मिळून लोकसंख्या १,६१,२५७ (१९७१). हे कलकत्ता-नागपूर रेल्वेमार्गावर कलकत्त्याच्या पश्चिमेस ११५ किमी. असून येथून दक्षिणेकडे व उत्तरेकडे रेल्वेमार्ग फुटतात. पूर्व रेल्वे विभागाची मोठी कर्मशाळा येथे असून रेल्वे कामगारांची मोठी वसाहत आहे. १९५१ साली येथे भारत सरकारने विद्यापीठीय दर्जाची मध्यवर्ती तंत्रसंस्था स्थापन केल्यापासून खरगपूरला शैक्षणिक क्षेत्रात मोठे महत्त्व आले आहे.
शाह, र. रु.