कीर्तने, विनायक जनार्दन : (१८४०—१८९१). एक मराठी नाटककार. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील राजुरीस झाला. शिक्षण कोल्हापूर व मुंबई येथे झाले.
ते प्रथम शिक्षक होते. तथापि पुढे इंदूर व बडोदे संस्थानांतून न्यायाधीश, नायब दिवाण इ.अधिकारपदांवर त्यांनी कामे केली. थोरले माधवराव पेशवे हे नाटक लिहून मराठीत त्यांनी स्वतंत्र व सुसंघटीत नाट्यरचनेचा पाया घातला (१८६१). जयपाळ हे त्यांचे दुसरे नाटक (१८६५) बायबलच्या जुन्या करारातील एका कथेवर आधारलेले आहे. साधी व सुटसुटीत भाषा हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य होते. त्याशिवाय मध्य हिंदूस्थानविषयक एका इंग्रजी ग्रंथाचा अनुवाद व काही निबंध त्यांनी लिहीले आहेत.
कुलकर्णी, अ. र.
“