पायोरिया : पायोरिया या इंग्रजी शब्दाचा मूळ अर्थ ‘पूमय निःस्राव’ असा आहे. सर्वसाधारणपणे ही संज्ञा दात व हिरड्यांतून येणाऱ्या पृमय निःस्रावाकरिता वापरतात. पायोरिया हे एक लक्षण असून मूळ विकृती हिरड्या व दातांच्या मुळाभोवतालच्या ऊतकांचा (पेशीसमूहांचा) शोथ (दाहयुक्त सूज) ही असते. हिरड्या दाबल्यास पू बाहेर पडतो. तोंडाची रुची पालटून दुर्गंधीयुक्त उच्छ्वास येतो. तोंडाच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष केल्याने ही विकृती उद्भवते. अनेक वेळा ती अज्ञानहेतुकही (अज्ञात कारणामुळे होणारीही) असू शकते. पायोरियाविषयी अधिक माहिती ‘दंतवैद्यक’ या नोंदीत दिलेली आहे.
भालेराव, यं. त्र्यं.