पायरोमॉर्फाइट : (ग्रीन लेड ओअर). खनिज. स्फटिक षट्कोणी, प्रचिनाकार क्वचित कोपरे गोलसर होऊन ते मृदंगासारखे झालेले, तर कधी पोकळ असतात [→स्फटिकविज्ञान]. पुष्कळदा पायरोमॉर्फाइट गोलाकार, वृक्काकार (मूत्रपिंडाकार), द्राक्षाच्या घडासारख्या, तंतुमय व कणमय रूपांतही आढळते. भंजन खडबडीत ते शंखाभ [→खनिजविज्ञान]. ठिसूळ. कठिनता ३.५-४. वि. गु. ६.५-७.१. चमक रेझिनासारखी ते काहीशी हिऱ्यासारखी. रंग ऑलिव्हप्रमाणे हिरवट, उदी, पिवळा, क्वचित नारिंगी पिवळा, करडा वा पांढरा. काहीसे पारदर्शक ते दुधी काचेसारखे पारभासी. पारदर्शक व रंगहीन प्रकार क्वचितच आढळतो. रा. सं. Pb5Cl(PO4)3. यामध्ये फॉस्फरसाच्या जागी आर्सेनिक वा व्हॅनेडियम येऊ शकते. अशा प्रकारे मिमेटाइट व व्हॅनेडिनाइट यांच्याशी समाकृतिक (सारखे स्फटिकाकार असलेले) आहे. कधीकधी शिशाच्या जागी अंशतः कॅल्शियम येते. हे द्वितीयक म्हणजे नंतरच्या क्रियांनी तयार झालेले
ठाकूर, अ. ना.
“