पर्पटी : (पापडी). पारा, गंधक, सोने इ. द्रव्ये घालून केलेला पापडीसारखा कल्प बाहुल्याने ग्रहणीच्या रोगांवर वापरतात आणि ग्रहणी ज्या उदरस्थ होते त्यावर हा कल्प रोगनाशक कार्य करतो. याचे रसपर्पटी, सुवर्णपर्पटी, पंचामृत पर्पटी, प्राणदापर्पटी इ. अनेक प्रकार आहेत. अग्नी आणि ग्रहणी हे विकृत झाल्याने होणारे पांडुरोग, क्षय इ. रोगांवरही हे कल्प अवस्थानुरूप उपयुक्त होतात.
रसपर्पटीत पारा व गंधक सुवर्णपर्पटीत पारा, गंधक व सुवर्ण पंचामृत पर्पटीत पारा, गंधक, अभ्रक, ताम्र आणि लोह ही द्रव्ये असतात. प्राणदापर्पटीत पारा, अभ्रक, लोह, शिसे, कथिल यांचे भस्म तसेच मिरी व बचनाग ही समभाग व सर्वसमान गंधक असतो.
जोशी, वेणीमाधवशास्त्री