हेरिंग मासा : या अस्थिमीन माशाचा समावेश ऑस्ट्रेइक्थीजवर्गात क्लुपिफॉर्मीस गणाच्या क्लुपिडी कुलात होतो. याच्या आ. १. अटलांटिक हेरिंग (क्लुपिया हेरेंगनस हेरेंगनस)प्रामुख्याने अटलांटिक हेरिंग (क्लुपिया हेरेंगनस हेरेंगनस) व पॅसिफिक हेरिंग( क्लुपिया हेरेंनगस पालसी) या दोन जाती आहेत. सुरुवातीस या दोन स्वतंत्र जाती आहेत असे मानले जात होते, परंतु सध्या एकाच प्रजातीच्या उपजाती आहेत असे मानले जाते. 

 

हेरिंग माशाचे डोके लहान, शरीर प्रवाहरेखित असून ते सुंदर व आकर्षक रंगाचे मासे आहेत. त्यांच्या शरीराच्या बाजू चंदेरी रंगाच्याव पाठीमागील बाजू गडद निळसर रंगाची असते. त्याच्या शरीरावरचक्रज शल्क असतात. पृष्ठपक्ष व अधरपक्ष लहान असतात. पूर्ण वाढ झालेल्या माशाची लांबी २०–३८ सेंमी. असते. मोठ्या प्रमाणावर आढळणारी ही माशाची जाती आहे. सायक्लॉप्ससारखे कोपेपॉड, मृदुकाय प्राणी, क्रस्टेशियन्स तसेच इतर माशांचे डिंभ हे या माशाचे अन्न आहे. ते नेहमी कळपात वावरत असतात. हे मासे कॉड, सामन व ट्यूना यांसारख्या मोठ्या आकाराच्या माशांचे खाद्य आहेत. हे मासे पकडण्यासाठीउभे तरंगते जाळे व मोठ्या तोंडाचे जाळे (ट्रॉल) वापरतात. 

 

आ. २. पॅसिफिक हेरिंग (क्लुपिया हेरेंगनस पालसी)यूरोपमध्ये पकडलेले बहुतेक हेरिंग मासे खारवितात किंवा तुकडेकरून त्याचे लोणचे करतात किंवा धुरी देऊन त्यांना किपरर्ड हेरिंगम्हणून विकतात. पूर्व कॅनडा व उत्तर–पूर्व अमेरिकेत या माशांचे डबा-बंदीकरण करतात. पॅसिफिक महासागरात याची मोठ्या प्रमाणावर मासेमारी केली जाते. याचा उपयोग मत्स्य तेल व खत म्हणून करतात. 

 

हेरिंग माशांचा प्रजनन काळ डिसेंबर ते उन्हाळ्याच्या मध्यापर्यंत आहे. सागरात तरंगणारी लाकडे, खडक यांवर मादी सु. ४०,००० अंडीघालते. अंड्यातून दोन आठवड्यांत पिले बाहेर पडतात. काही वेळा हेरिंग मासे अंडी घालण्यासाठी किनाऱ्यावर येतात. अंडी घातल्यावर सर्व मासे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. हेरिंग माशाच्या दरवर्षीच्या उत्पादनात खूप फरक आढळतो. कारण दरवर्षी निर्माण होणाऱ्या माशांची संख्या स्थिर नाही. यामध्ये मोठ्या प्रमाणावर फरक आहे. हे मासे सु. ४ वर्षांनंतर प्रजननक्षम होतात. त्यांचे आयुष्य सु. २० वर्षांचे असते. 

 

क्लुपिया प्रजातीतील उदा. ब्रिंसलिंग व स्प्राट या माशांशिवायक्लुपिडी कुलातील इतर माशांनाही उदा. स्किपजॅक हेरिंग (ॲलोसा क्रिसोयलोरिस) आणि एलवाईफ (पोमोलोबस स्यूडोहारेनगस) या माशांनाही हेरिंग ही संज्ञा वापरतात. तसेच क्लुपिडी या कुलाशिवायइतर कुलातील उदा., वुल्फ हेरिंग (कायरोसेंट्रस दोराब) [→ हैद] यांसारख्या विशिष्ट माशांनाही हेरिंग ही संज्ञा वापरतात.

 

पहा : दिंडस मत्स्य वर्ग. 

पाटील, चंद्रकांत प.

 

अटलांटिक हेरिंग (हॅरिंगस हॅरिगंस) पॅसिफिक हेरिंग (क्लुपिया हॅरिंगस पालासी)