निर्वाह खर्च : विशिष्ट जीवनमान टिकविण्यासाठी करावा लागणारा खर्च एखाद्या राष्ट्रात किंवा समाजात निरनिराळे सामाजिक गट किंवा समूह असतात व त्या त्यासमूहातील माणसांच्या राहणीच्या विशिष्ट सवयी व संकेत असतात. आपल्या दैनंदिन जीवनासाठी कोणत्या वस्तू व सेवा यांचा किती रमाणात उपयोग घ्यावयाचा , हे त्या समूहातील व्यक्तीसमूहाच्या विशिष्ट सवयींनुसार व संकेतां नुसार ठरवीत असतात. ज्या वस्तू आणि सेवा ह्या व्यक्ती विकत घेतात, त्यांवरून त्यांचे राहणीमान दिसून येते. वस्तू व सेवा यांच्या किंमती सतत बदलत असल्यामुळे निर्वाहासाठी म्हणजेच आपले विशिष्ट राहणीमान टिकवून ठेवण्यासाठी त्यांना जो खर्च करावा लागतो, तो बदलत जातो. निर्वाहखर्चात होणार्या या बदलांवरून किंमतींमधील फेरफारांचा त्या विशिष्ट समूहातील व्यक्तींच्या जीवनावर काय परिणाम होतो, याचा अंदाज घेता येतो. निर्वाहखर्चात होत जाणारा बदल मोजण्याचे एक साधन म्हणून निर्वाहखर्च निर्देशांकाचा उपयोग करतात.
निर्वाहखर्च निर्देशांक हा एखाद्या विशिष्ट समूहासाठी तयार करतात. उदा., श्रमिकवर्ग. निरनिराळ्या गावी किंवा शहरी राहणार्या श्रमिकांच्या खाण्यापिण्याच्या व खर्चाच्या सवयी वेगवेगळ्या असल्यामुळे भिन्न ठिकाणांच्या श्रमिकांसाठी वेगवेगळे निर्वाह खर्च निर्देशांक तयार करावे लागतात. ज्या समूहासाठी असा निर्देशांक तयार करावयचा, त्यातील कुटुंबाच्या व्ययपत्रकाची आधारकाळी एक नमुना पाहणी करावी लागते. या नमुनापाहणीवरून अन्न, वस्त्र, इंधन, घरभाडे आणि इतर वस्तूंवरील त्यासमूहातील कुटुंबाचा सरासरी खर्च किती होतो, हे समजते. त्यावरून त्यांच्या निरनिराळ्या गरजांचे तौलनिक महत्त्व ठरविता येते. या तौलनिक महत्त्वावरून वेगवेगळ्या गटांवरील खर्चासाठी निर्देशांक तयार करताना किती भर घ्यावयाचा, हे निश्चित करता येते. आधारकाळात निरनिराळ्या गटांवर झालेला खर्च व ज्या कालखंडासाठी निर्देशांक तयार करावयाचा, त्यामधील किंमती विचारात घेऊन आधारकालीन जीवनमान टिकविण्यास त्या त्या गटासाठी करावा लागणारा खर्च, यांचीशेकडेवारी काढून त्या गटवारप्रमाणांची भारित सरासरी (वेटेडॲव्हरेज) काढली, म्हणजे निर्वाहखर्च निर्देशांक तयार होतो. मे १९७२ मध्ये मुंबई कामगारांचा निर्वाहखर्च निर्देशांक १९६ होता. याचा अर्थ आधारवर्षी म्हणजे १९६० मध्ये १००रू. खर्च करून जे जीवनमान मुंबईतील कामगार कुटुंबास सरासरीने उपलब्ध होत असे, ते टिकविण्यासाठी किंमतींत झालेल्या फेरबदलांमुळे मे १९७२ मध्ये त्या कुटुंबाला १९६रू. खर्च करणे आवश्यक होते.
निर्वाहखर्च निर्देशांकाचा उपयोग महागाईभत्ता देण्याविषयी जे प्रश्न उद्भवतात, ते सोडविण्यासाठी करता येतो. या निर्देशांकात किती वाढ झाली म्हणजे महागाई भत्ता देण्यास सुरुवात करावयाची, तो कितपत घ्यावयाचा, तो केव्हा व किती प्रमाणात वाढवावयाचा यांसंबंधी मालक आणि मजूर यांमध्ये वाटाघाटी ठराव करता येतात. काही ठिकाणीशासनाच्याआदेशाप्रमाणेमहागाईभत्याचीनिर्वाहखर्चनिर्देशांकाशीसांघडघातलीजाते. अशारीतीनेवाढत्या निर्वाहखर्चाबरोबर वाढते उत्पन्न मिळण्याची सोय अगाऊच केलेली असली, म्हणजे कामगारांना वेतनवाढीसाठी मालकांशी झगडावे लागत नाही. अलीकडे सतत वाढणार्या किंमतींमुळे औद्योगिक शांततेचा भंग होऊ नये, म्हणून निर्वाहखर्च निर्देशांक आणि कामगारवेतन यांची योग्य सांगड घालणे अनिर्वार्य झाले आहे.
धोंडगे, ए. रा.