देवदिवाळी : मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला देवदिवाळी किंवा देवांची दिवाळी म्हणतात. पंचांगांमधून ‘देवदीपावलि’ असा निर्देश असतो. माणसांचे सर्व व्यवहार देवांवर कल्पिण्याच्या प्रघातामुळे, माणसांप्रमाणे देवांच्या दिवाळीची कल्पना आली असावी. या दिवशी आपापल्या कुलदैवताला पंचपक्वान्नांचा नैवेद्य दाखविण्याची रूढी आहे. काही ठिकाणी या दिवशी बैलांच्या झुंजी लावण्याची चाल आहे. या दिवसापासून खंडोबाचा उत्सव सुरू होतो.

केतकर, ग. वि.