तुर्की भाषा : उत्तरेला फिनलंड ते दक्षिणेला तुर्कस्तानपर्यंत व पश्चिमेला हंगेरी ते पूर्वेली मंगोलिया, मांचकुओ व चिनी तुर्कस्तानपर्यंत पसरलेल्या ⇨ उरल-अल्ताइक भाषासमूहातील अल्ताइक शाखेची तुर्की ही सर्वांत महत्त्वाची भाषा आहे.

तुर्की बोलींनी व्यापलेले क्षेत्र अतिशय विस्तृत असून त्यात पुढील गट येतात :

१. ईशान्य गट – रशियातील याकूत मंगोलियाच्या सरहद्दीवरचे तुर्क.

२.हाका गट – मध्य आबाकान खालचा आबाकान यांच्या उत्तरेकडील कामासिंची.

३. अल्ताई गट – अल्ताई तेलेउत उत्तरेकडील कुमांद, तार्तर, शोर, आबा.

४. पूर्व सायबीरिया गट – (चुलिम व तोबोलचे) तार्तर बाराबा बुखारी ओत.

५. व्होल्गा-उरल गट – कझॅनचे तार्तर मिशार तेप्तिआर, बाखकीर, चुवाश.

६. मध्य आशिया गट – चीन व कान्सू प्रांत येथील तुर्क कझाक किरगीझ उझबेक रिक्काचे तुर्क.

७. नैर्ऋत्य गट – अफगाणिस्तान, इराण व तुर्कमेनिस्तान येथील तुर्क इराणमधील आझरबैजान उत्तर कॉकेशस, बालखुर, कुमिक कारापापाख तुर्कस्तानचे तुर्क बेसअरेबियातील गागाउस क्रिमियाच्या दक्षिणेचे तार्तर.

८. इतर – वरील गटात समाविष्ट न होणाऱ्या, पण तुर्कीच्या क्षेत्रात पसरलेल्या इतर सर्व बोली.

लिपी : प्रारंभी सहाव्या शतकात तुर्कांची सेमिटिक लिपीतून निघालेली एक लेखनपद्धती होती. उजवीकडून डावीकडे लिहिल्या जाणाऱ्या या लिपीत चार स्वरचिन्हे व छत्तीस व्यंजनचिन्हे होती. जोडाक्षरे कोणत्याही प्रकारची नव्हती. ही लिपी अनेक तुर्की बोलींनी स्वीकारली.

बोल्शेव्हिक क्रांतीनंतर रशियातील तुर्की बोलींनी रशियन सिरिलिक लिपी किंवा रोमन लिपी स्वीकारली. केमालपाशाच्या प्रेरणेने तुर्की सरकारने ३ नोव्हेंबर १९२८ पासून स्वतःच्या भाषेला सोयीची अशी एक रोमन लिपी अंमलात आणली.

या लिपीत आठ स्वरचिन्हे व एकवीस व्यंजनचिन्हे असून ती पुढील प्रमाणे आहे.  

a आ 

g ग 

s स 

b ब 

g‍ॅ घ 

s श 

c ज 

h ह 

t त 

g च 

I अ 

u उ 

z झ़

d द 

i इ 

ü उ‍ॅ 

e ए 

j झ्य 

v व 

f फ़

k क 

y य 

व्याकरण : पुढे दिलेले व्याकरण तुर्कीमधील प्रमाणभाषेचे आहे.

नाम : नामात लिंगभेद नाही. नामाचे मूळ रूप हेच त्याचे प्रथमेचे एकवचन असते. त्याला लार (किंवा नामात तालव्य स्वर असल्यास लेर) हा प्रत्यय लागून अनेकवचन तयार होते : आदाम् ‘माणसे’, ‘पुरुष’- आदाम्‌लार् ‘माणसे’ एव् ‘घर’ एव्‌लेर् ‘घरे’.

तुर्कीत सहा अधिकृत विभक्ती आहेत : प्रथमा (शून्य), द्वितीया (, , , उ‍ॅ), चतुर्थी (, ), पंचमी (दन्, देन्), षष्ठी (अन्, इन्, उन्, उ‍ॅन), सप्तमी (दा, दे), स्वरान्त शब्दानंतर हेच प्रत्यय द्वितीया (यि), चतुर्थी (या, ये), षष्ठी (नम्, नुन्, न‍ु न्) असे आहेत.

हेच प्रत्यय अनेकवचनाच्या रूपाला लागतात. याशिवाय शब्दयोगी अव्यये असून ठराविक अव्यये ठराविक विभक्तिरूपानंतर येतात.


सर्वनाम : पुढीलप्रमाणे आहेत :

ए. व. 

अ. व. 

प्र. पु 

बेन् 

बिझ् 

द्वि. पु. 

सेन् 

सिझ् 

तृ. पु. 

ओ, ओल् 

ओन्‌लार् 

याची स्वामित्वदर्शक रूपे :

बेनिम् 

बिझिम् 

सेनिन् 

सिझिन् 

ओनुन् 

ओनलारन् 

आनन् 

आन्‌लारन् 

बेनिम् किताप् ‘माझे पुस्तक’ सिझिन् आत् ‘तुमचा घोडा’.

दर्शक सर्वनामे: (निकट) बु, (दूर) ओल्.

दर्शक विशेषण: (निकट) इश्बु, (दूर) ओल् 

प्रश्नवाचक : किम् ‘कोण’ ने ‘काय’ हांगि ‘कोणता’ नसल् ‘कसा’ काय् ‘किती’.

विशेषण : विशेषण विकाररहित असते. ते पंचमीनंतर आल्यास तरभाव आणि सप्तमीनंतर आल्यास तमभाव दाखवते : गुझेल् ‘सुंदर’– गुल्‌देन् गुझेल् ‘गुलाबाहून सुंदर’.

क्रियापद : मेक् हा प्रत्यय क्रियारूप दाखवतो : सेव्‌मेक् ‘प्रेम कर’ – सेविल्मेक् ‘प्रेम केले जा–’ – ‘प्रेमविषय हो-’ सेव्‌मेमेक् ‘प्रेम न कर –’ सेविल्‌मेमेक् ‘प्रेमविषय न हो–’ यावरून दिसेल, की क्रियापदातील नकार हा प्रत्ययाचाच एक भाग असतो.

सेव्‌मेक्‌चा वर्तमानकाळ :

ए. व. 

अ. व. 

प्र. पु.

सेवेरिम् 

सेवेरिझ् 

द्वि. पु. 

सेवेर्‌सिन् 

सेवेर्‌सिनिझ् 

तृ. पु. 

सेवेर् 

सेवेरलेर् 


  ‘आहे’ हे क्रियापदाने जेव्हा दोन नामे जोडली जातात, तेव्हा हे क्रियापद तुर्कीत नामाला प्रत्यय जोडून व्यक्त होते. हे प्रत्यय असे :

ए. व. 

अ. व. 

प्र. पु.

अम्, इम्, उम्, उ‍ॅम् 

‘(मी) आहे’

अझ, इझ्, उझ्, उ‍ॅझ् 

द्वि. पु.

सन्, सिन्, सुन्, सुन्

सनझ्, सिनिझ्, सुनुझ्, सुनुझ.

तृ. पु.

दर्, दिर्, दुर्, दुर्

दरलार्, दिरलेर्, दुर्‌लार्, दुर्‌लेर्

आदामम्‘मी पुरुष आहे’ आदामसन् ‘तू पुरूष आहेस ’. आज्ञार्थाचे प्रत्यय :

ए. व. 

अ. व. 

द्वि. पु.

शून्य

इनझ्

तृ. पु.

सन्

सन्‌लार् इ.

 भूतकाळ व संकेतार्थ :

ए. व. 

अ. व. 

प्र. पु 

म् 

क् 

द्वि. पु.

न्

नझ्

तृ. पु.

शून्य

लार्, लेर्.

अशा प्रकारे क्रियापदाच्या रूपावलीत अनेक रूपे असली, तरी त्यांचा नियमितपणा विलक्षण आहे. 

अव्यय : रीतिदर्शक अव्ययाचा मुख्य प्रत्यय जा (जे) आहे : आघिर ‘जड, ‘कठीण, आधिर्‌जा ‘जडपणे बेन्‘मी’–बेन्‌‌जा‘माझ्या मते’ आदाम्‘माणूस’–आदाम्‌जा‘माणुसकीने’.

काही वाक्ये व शब्द : गुल्‌ गुझेल्‌ दिर्‘गुलाब सुंदर आहे’. गुझेल्‌सिन्‘तू सुंदर आहेस ’.

एवे गिदेजेघिझ्‌ (एव् ‘घर’, गित्‌मेक् ‘जा’–) ‘आम्ही घरी जाऊ’.

केदि वे कपेक् हायवांदर्‌ (केदि ‘मांजर’, कपेक ‘कुत्रा’, हाय्‌वान् ‘प्राणी’) ‘मांजर व कुत्रा (हे) प्राणी आहेत’.

शु केदि वे शु कपेक् गुझेल् हाय्‌वान्‌लार्‌दर् ‘हे मांजर व हा कुत्रा सुंदर प्राणी आहेत ’.

पहिले दहा अंक : १ बिर्, २ इकि, ३ उ‍ॅच्, ४ दर्त्, ५ बेश्, ६ आल्त, ७ येदि, ८ सेकिझ्, ९ दोकुझ्, १० ओन्.

संदर्भ : 1. Cohen, Marcel Meillet, Antoine, Les Langues du monde, Paris, 1952.

   2. Nemeth, J. Trans. Halasi–kun, Turkish Grammar, The Hague, 1962.

कालेलकर, ना. गो.