चांदूर: अमरावती जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण, लोकसंख्या ११,५०० (१९७१). हे अमरावतीच्या आग्नेयीस सु. २४ किमी., मुंबई- नागपूर-कलकत्ता या रुंदमापी लोहमार्गावर आहे. कापसाची ही प्रसिद्ध बाजारपेठ असून येथे सरकी काढून गठ्ठे बांधणे, तेल गाळणे इ. व्यवसाय चालतात. आसमंतात विपुल संत्री होतात. येथे कुटीरोद्योग प्रशिक्षण केंद्र, माध्यमिक शाळा वगैरे सोयी आहेत. चांदूरला चांदूर-रेल्वे असेही म्हणतात.

कुलकर्णी, गो. श्री.