कार्डमम्‌ : सह्याद्रीचा दक्षिणेकडील फाटा. मसाल्याचे पदार्थ या टेकड्यांवर होत असल्याने इंग्रजांनी त्यास कार्डमम्‌ नाव दिले. या टेकड्या केरळच्या प्रामुख्याने एर्नाकुलम्‌-कोट्ट्यम्‌ या जिल्ह्यांत वायव्यआग्नेय पसरल्या आहेत. काही वेळा दक्षिणेकडे कन्याकुमारीपर्यंत गेलेल्या टेकड्यांनाही कार्डमम्‌ म्हणतात. या टेकड्यांची सर्वसाधारण उंची ९०० मी. ते १,००० मी. असून, त्यांतील उत्तरेकडील काही शिखरे २,९०० मी. पर्यंत उंचीची आहेत. चहा, कॉफी, सागवान, बांबू, चिंच व मसाल्याच्या वस्तू ही येथील प्रमुख उत्पन्ने होत.

शाह. र.रू.