कारेन भाषा : कारेन ही ⇨तिंबेटो-ब्रह्मी भाषासमूहातील ब्रह्मदेशाच्या दक्षिण भागात बोलली जाणारी भाषा आहे. तिच्या भाषिकांना ‘ख्या’ हे नाव असून तिचे महत्त्वाचे केंद्र उत्तरेकडे कारेन्नी हे आहे. ख्रि.पू. पाचव्या शतकात तिबेटो-ब्रह्मी टोळ्यांची एक लाट मॉङ‌्ख्मेरव्याप्त भागात उतरली असावी. कारेन बोलींपैकी `प्वो’ व `स्गा’ या विशेष प्रसिद्ध आहेत. या दोन्ही बोलींत ब्रह्मी शब्द भरपूर आहेत. उसनवारीचे हे प्रमाण बरेच कमी असणारी `ख्यो-वी ’ (रक्त कारेन) ही बोली मात्र अजून अपरिचित आहे. ब्रह्मीत न आढळणारे अगदी भिन्न असे तिबेटो-ब्रह्मी शब्द या भाषांत भरपूर आहेत. संख्यावाचक शब्द अजूनही मूळ भाषेतील आहेत पण काही बोलींत फक्त पहिले पाचच शिल्लक असून पुढील गणना या पाचांच्या आधारे केलेल्या नव्या रूपांनी होते. कारेन बोली वापरणाऱ्यांची संख्या साधारणपणे १२ लाखांवर दिली जाते. १९६१ च्या खानेसुमारीप्रमाणे कारेन भाषिकांची संख्या भारतात ४३१ होती.

भाषिक वैशिष्ट्ये : संयुक्त व्यंजन म्हणून शब्दारंभी फक्त अघोष (अल्पप्राण किंवा महाप्राण) स्फोटक , , , हीच रचना येऊ शकते. अनुनासिकापूर्वी आणि मागून , येऊ शकतो. फक्त स्गामध्ये त्र हे संयुक्त व्यंजन शब्दारंभी येते. रक्त कारेनमध्ये , शब्दान्ती येऊ शकतात पण अंत्य अनुनासिकांचा मात्र लोप झाला आहे, तर प्वोमध्ये अशी अनुनासिके त्यांच्या पूर्वी येणाऱ्या स्वरांत मिसळली आहेत. प्वोमध्ये सहा प्रकारचे स्वररोह आहेत. स्गामध्ये पाच आहत.  

शब्दसिध्दी प्रत्यय व उपसर्ग लावून होते. उदा., मा हा उपसर्ग अकर्मक क्रियापदाला सकर्मक बनविणारा आहे.  

क्रियापद वाक्याच्या शेवटी न नेता कर्ता व कर्म यांच्यामध्ये ठेवणाऱ्या कारेन व `म्याओ-त्स ’ याच काय त्या तिबेटो-ब्रह्मी बोली आहेत. नामविस्तारक नामापूर्वी येतो, तर विशेषण नामानंतर येते.

संदर्भ : Meillet, Antoine Cohen, Marcel, Les langues du monde, Paris, 1954.

कालेलकर, ना.गो.