काप्रा, फ्रॅंक : (१८ मे १८९७ —               ). अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक.  इटलीतील पालेर्मो गावी जन्म. १९०३ तो अमेरिकेत आला. तेथे कॅलिफोर्नियातील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी  या संस्थेत शिक्षण घेत ल्यानंतर त्याने १९२१  मध्ये हॉलिवुड येथील चित्रपट सृष्टीत प्रवेश केला. पहिल्या महायुद्धाच्या वेळी तो सैन्यात असताना त्याने व्हाय वुई फाइट या शीर्षकाखाली युद्धविषयक माहितीपटही तयार केले होते. त्याच्या तीन चित्रपटांना उत्कृष्ट दिग्दर्शनाबद्‌दल अकादमी ऑफ मोशन पिक्चर  आर्टस अँड सायन्सेस  या संस्थेचे  ‘ऑस्कर अवॉर्ड’  म्हणून ओळखले जाणारे अकादमी पुरस्कार मिळाले. इट हॅपंड वन नाइट (१९३४) व लॉस्ट होरायझन (१९३७) हे त्याचे गाजलेले चित्रपट होत. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्टस्‌ अँड सायन्सेस या संस्थेचा तो अध्यक्ष व कोलंबिया स्टुडिओज या संस्थेचा दिग्दर्शक होता.

फ्रँक काप्रा

दिवाकर, प्र. दि.