बड्‌डकहा : पैशाची भाषेतील कथाग्रंथ. बड्‌डकहा ह्या ग्रंथनामाचे संस्कृत रूप बृहत्कथा. कवी गुणाढ्य हा ह्या कथाग्रंथाचा कर्ता. सातवाहनवंशी राजा हाल ह्याच्या दरबारी गुणाढ्य होता, असे म्हटले जाते. तसे असल्यास इसवी सनाचे पहिले वा दुसरे शतक हा गुणाढ्याचा काळ ठरतो.बड्‌डकहा हा कथासंग्रह आज लुप्त झालेला आहे काश्मीरी पंडीत सोमदेव ह्याने ⇨ कथासरित्सागर हा प्रचंड कथासंग्रह बड्‌डकहाच्या आधारे तयार केला. तथापी मूळ बड्‌डकहा प्रमाणेच कथासरित्सागराची रचना त्याने केली, की संस्कृतातील एकाद्या काश्मीरी बृहत्कथेवरून हा ग्रंथ त्याने निर्माण केला ह्याबाबत विद्वानांत मतैक्य नाही.

तगारे, ग. वा.