फ्रॅंको – प्रशियन  ( जर्मन )  युद्ध   : ( १५ जुलै १८७० – १० मे १८७१ ).  हे युद्ध फ्रान्स व प्रशिया या दोन देशांत झाले. या युद्धाच्या वेळी फ्रान्समध्ये सम्राट तिसरा नेपोलियन   बोनापार्ट हा राज्य करीत होता .  प्रशियात पहिला विल्यम सत्तेवर होता .  ⇨ ऑटो फोन बिस्मार्क हा त्याचा पंत प्र धान  ( चॅन्सेलर )  होता .  ॲल्सेस- लॉरेन प्रदेशापासून पॅरिसपर्यंत युद्धक्षेत्राची व्याप्ती होती .  या यु द्धात फ्रान्सचा पराभव झाला व फ्रॅंकफुर्ट येथे तह होऊन युद्ध समाप्त झाले .  युद्धाची पाश्वभूमी व कारणे  :  फ्रान्स – प्रशिया यांतील यूरोपीय वर्चस्वाबद्दलची स्पर्धा व अनुषंगाने एकमेकांच्या वाढत्या प्रभावाला शह देण्याचे डावपेच यांची परिणती म्हणजे हे युद्ध होय .  विशेषतः १८६६ साली प्रशियाने ऑस्ट्रियाचा जो पराभव केला  ( ऑ स्ट्रि याला जर्मन भाषिकांच्या एकीकरणासाठी ),  त्यामुळे यूरोपातील सत्तासंतुलन बिघडले होते .  जर्मनीच्या नेतृत्वाची प्रबल अशी सत्ता प्रशियाच्या रूपाने यूरोपात उदयास येत होती आणि प्रशियामध्येही फ्रॅंकोप्रशियन संघर्षाला अनुकूल असे वातावरण तयार होत होते .  पहिल्या नेपोलियनने १८०६ सालच्या ⇨ येनाच्या युद्धात प्रशियाचा पराभव केला होता .  त्याचे शल्य जर्मन सत्ताधाऱ्यांना बोचत होते .  तसेच ऱ्हाईन नदीच्या प्रदेशात फ्रेंच आक्रमणाची श क्य ता होती .  यामुळे प्रशियात फ्रेंचविरोधी वातावरण निर्माण झालेले होते .  ऑस्ट्रिया- फ्रान्स युद्धात  ( १८५९ )  फ्रेंचांनी इटलीमध्ये हस्तक्षेप केला होता .  ⇨ तिसऱ्या नेपोलियन ने १८६७ मध्ये ल क्सें बर्ग मिळविण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता .  प्रशियाचा पंतप्रधान ऑटो फोन बिस्मार्क यालाही फ्रान्सशी युद्ध व्हावे ,  असेच वाटत होते .  अ शा युद्धात फ्रान्स पराभूत होईल व त्यामुळे दक्षिणेकडील जर्मन संस्थानांचे डोळे उघडून ती जर्मन सं घरा ज्यात सामील होतील व जर्मन संघराज्याचे स्वप्न साकार होईल ,  अशी त्याची अपे क्षा होती .  या दृष्टीनेच बिस्मार्कने राजकीय डावपेच व लष्करी तयारी चालू ठेवली होती .  फ्रान्सच्या दृष्टीने उत्तर – दक्षिण जर्मन राज्यांचे एकीकरण धोकादायक होते .  या पार्श्वभूमीवर फ्रान्स – प्रशिया युद्ध अटळ होते .  जर्मनीच्या वाढत्या सामर्थ्यामागील धोक्याची सूचना तिसऱ्या नेपोलियनला असली ,  तरी दूरदृष्टीच्या अभावी त्याने लष्करी तयारीसंबंधी फारशी दक्षता घेतली नाही. १८७० च्या  जूनपर्यंत यूरोपमध्ये कोठेही युद्धाचे ढग दिसत नव्हते .  त्यामुळे नेपोलियनच्या या शैथिल्याबद्दल फ्रान्समध्ये फारशी टीकाही झाली नाही .  या उलट प्रशियाची सैनिकी संघटना व यंत्रणा अत्यंत कार्यक्षम होती .  फ्रान्स – प्रशियातील संघर्ष होण्याची शक्यता अकस्मात निर्माण झाली ,  ती स्पेनच्या गादीवर कोणी बसावे ह्या प्र श्ना वरून .  २ जुलै १८७० रोजी स्पेनची राणी दुसरी इझाबेला हिला पदच्युत करण्यात आले .  स्पेनच्या जनतेने राजा विल्यमचा नातेवाईक होहेंझॉलर्न – झीख – मारिंगन या उपशाखेतील राजपुत्र लिओ पो ल्ट यास स्पेनचे राजपद दे ऊ केले व लिओपोल्टने ते मान्य केले .  लिओपोल्ट स्पेनचा राजा होणे प्रशियाच्या दृष्टीने हितावह होते   तथापि फ्रान्सच्या दृष्टीने ते धो क्या चे असल्याने फान्सने त्याला कडाडून विरोध केला . फ्रेंच राजदून बेनेदेत्तीने लिओपोल्टला माघार घेण्यास भाग पाडावे ,  असा राजा विल्यमला आग्रह केला .  विल्यमने तसे करण्यास असमर्थता दर्शविली   तथापि लिओपोल्टने स्वेच्छेने माघार घेतल्यास त्यास आपला विरोध नाही .  असे सू चित केले .  युद्ध अटळ आहे ,  असे वाटत असताना १२ जुलै १८७० रोजी पित्याच्या सल्ल्यानुसार लिओपोल्टने स्पेनची गादी स्वीकार णार नाही , हे जाहीर केले .  मुत्सद्देगिरीत फ्रान्सचा विजय झाला .  युद्ध टळले असे वाटू लागले .  एव ढ्या वरच न थांबता नेपोलियनच्या आज्ञेप्रमाणे १३ जुलै १८७० रोजी एम्स गावी बेनेदेत्तीने विल्यमची भेट घेतली व विल्यमने जाहीर रीत्या लिओपोल्टचे नाव मागे घ्यावे व पुढेही त्यास त्याच्या घराण्यातील व्य क्ती स स्पेनची गादी स्वीकारण्यास मंजुरी दे ऊ नये ,  असे आश्वासन विल्यमकडून मागितले .  विल्यमला त्याचे बोलणे उद्धटपणाचे वाटले .  विल्यमने आश्वासन देण्यास नकार दिला व बेनेदेत्तीची बोळवण केली .  वस्तुतः या परिस्थितीत युद्ध उद् ‌ भवण्याचे कारण नव्हते .  वरील हकीकत राजाने एम्सहून बिस्मार्कला तारेने कळविली व वर्तमानपत्रांना ही बातमी देण्यास सांगितले   परंतु बिस्मार्कने तारेतील मजकुरात असा काही फेरफार केला , की त्यामधून फ्रान्सने प्रशियावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला व प्रशियाच्या राजाने फ्रेंच राजदूताचा अपमान करून त्याच्या माग ण्या धुडकावून लावल्या ,  असा अर्थ निघाला .  महत्त्वाकांक्षी जर्मनी व मत्सरग्रस्त फ्रान्स या दोहोंमधील जनमत एकमेकांविरुद्ध प्रक्षुब्ध झालेले होतेच .  बिस्मार्कच्या वरील कृतीमुळे त्याची परि णती युद्धात झाली  ( १५ जुलै १८७० ).  फ्रान्सच्या संसदेने उत्तर जर्मन संघराज्याविरु द्ध युद्धाची घोषण केली . प्रशिया युद्धसज्ज होतेच .  फ्रान्सच्या युद्ध तयारीत गोंधळ होता .  फ्रेंच सेनापतींना गतशील हालचालींच्या युद्धाचा अनुभव नव्हता .  कित्येकांना नकाशा वाचता येत नव्हता .  पहिल्या दोन दिवसांतच जर्मनांनी ॲल्सेस – लॉरेन यांवर चाल केली आणि मेट् ‌ सच्या लढाईत लॉरेनच्या फ्रेंच सेनेची कोंडी झाली .  १२ ऑगस्ट १८७० रोजी ग्रॅव्हलॉत – सॅं – प्रिव्हा येथे फ्रेंचांचा दारुण पराभव झाला .  १ सप्टेंबर रोजी सिदॅनच्या वे ढ्या त फ्रेंच सैन्याची वाताहत हो ऊ न तिसऱ्या नेपोलियनला कैद करण्यात आले .  ४ सप्टेंबरला तिसरे फ्रेंच साम्राज्य ढासळले आणि लि आँ  गांबेत्ता व जनरल ल्वी झ्यू ल त्रॉश्यू यांच्या नेतृत्वाखाली तिसरे प्रजासत्ताक सत्तेवर आले .  १९ सप्टेंबर १८७० पासून पॅरिस प्रशियन सेनेने घेरले .  जर्मनांना फ्रेंच गनिमांचे हल्ले व पॅरिस आणि मेट् ‌ स येथील वेढे अशा त्रिविध आघा ड्या सांभाळाव्या लागल्या .  त्यामुळे जर्मन सैन्य जेरीस आले होते   परंतु दुष्काळ आणि फ्रेंच राष्ट्रीय रक्षक दलाने बंड व दगा केल्यामुळे २६ जानेवारी १८७१ रोजी पॅरिस येथे युद्धबंदी झाली .  २८ जानेवारी १८७१ रोजी जर्मन सैन्य पॅरिसमध्ये शिरले .  १० मे १८७१ रोजी फ्रॅंकफुर्ट येथे तह होऊन ,  ॲल्सेस – लॉरेन हे प्रांत व ८०० कोटी रुपयांची खंडणी जर्मनीला देण्यात आली .  प्रशियाचा विजय होण्यापूर्वी त्यां चा उत्कृष्ट पल्लेदार तोफ खाना व रायफली ,  युद्धाकरिता प्रचंड सेनाबळ सज्ज करण्याची यंत्रणा ,  रेल्वे व तारायंत्र यांचा वापर करून केलेल्या सैन्याच्या शीघ्र हालचाली व त्यावरील नियंत्रण ,  खंबीर राजकीय व सैनिकी नेतृत्व इ .  गोष्टी कारणीभूत झाल्या .  उलट प्रजा ,  प्रशासन व सम्राट यांच्यातील बिघडलेले संबंध ,  तत्कालीन विज्ञान व तंत्रविद्या यांचा लाभ घेण्याबाबतची उदासीनता ,  दुबळे युद्धनेतृत्व इ .  कारणांनी फ्रान्सचा पराभव झाला .  फ्रान्समध्ये १८४८  –  ५० या सालांतील समतावाद्यांचा उठाव व त्यामुळे निर्माण झालेली परि ‌ स्थिती हे आणखी एक पराभवाचे कारण म्हणता येईल .  या युद्धाचे राजकीय व युद्धतां त्रि क परि ‌ णाम दूरगामी होते  :  या युद्धामुळे पश्चिम यूरोपचा नका शा बदलला व यूरोपातील फ्रान्सचा प्रभाव नष्ट झाला .  जर्मन संस्थानांचे एकीकरण पू र्ण होऊन जर्मनी या प्रबळ राष्ट्राचा उदय झाला .  जर्मनीच्या औद्योगिकीकरणास झपा ट्या ने चालना मिळाली .  इटलीचे एकीकरण पू र्ण झाले .  मा र्क्स व त्याचे समकालीन यांच्या साम्यवादी विचारप्रणालीस चालना मिळाली .  या युद्धामुळेच आधुनिक युद्धतंत्राचे स्वरूप वैज्ञानिक प्रगतीमुळे बदलत आहे ,  हे दिसून आले .  जर्मन जनरल स्टाफ प्रणालीचे अनुकरण यूरोपीय राष्ट्रे करू लागली .  महायुद्धासारख्या स र्वं कष युद्धाची चाहूल या फ्रॅंको – प्रशियन ( जर्मन )  युद्धाने लागली ,  असे समजण्यात आले .

 पहा :  जर्मन   प्रशिया   फ्रान्स  ( इतिहास )

 संदर्भ :  1 . Howard, Michael, The Franco-Prussion war : the German Invasion of France,  1870 – 1871 , London,  1961 .

            2.  Thomson, David, Europe Since Napoleon, Harmondworth,  1973 .

 पोतनीस ,  चं .  रा .  दी ‌ क्षित ,  हे .  वि .