कच्च्या साखरेचे परिष्करण : कच्च्या साखरेत ९६–९९ % सुक्रोज असते. शिवाय तिच्यात राख बनविणारी द्रव्ये, अशर्करा द्रव्ये, आर्द्रता इ. अशुद्घी असतात. तसेच मेण, प्रथिने व अत्यल्प सेल्युलोज, लवणे व वसा यांसारख्या अशुद्घी असतात. म्हणून उच्च गुणवत्तेची साखर तयाररण्यासाठी कच्च्या साखरेचे परिष्करण करतात. उत्पादनापैकी सु.३५% कच्च्या साखरेचे परिष्करण केले जाते.
बहुतेक सर्व मोठ्या कारखान्यांत बाहेरून आणलेल्या कच्च्या साखरेचेही परिष्करण केले जाते. त्यातून उदी साखर, घनाकार खडे, खडीसाखर वा रवाळ साखर बनवितात. यासाठी कच्ची साखर प्रथम धुतात, वितळवितात, स्वच्छ करतात आणि तिचा रंग घालविणारी विरंजन क्रिया करतात. नंतर तिचे स्फटिकीभवन करून व स्फटिक सुकवून साखर गोण्यांत साठवितात. या परिष्करणामुळे साखर महाग होते. परिष्करण प्रक्रियेद्वारा विविध रंगांचे व स्वादांचे पाकही तयार करतात. ते अन्न प्रक्रिया उद्योगांत वापरतात. द्रवरूप सुक्रोज व पर्यस्त शर्करायुक्त द्रव आणि संपूर्ण पर्यस्त शर्करायुक्त द्रवही तेथे तयार करतात.
कच्ची साखर वितळविणे व स्फटिकांवरील मळीचे पटल काढणे : स्फटिकयुक्त साखरेच्या दाट पाकावर संस्करण करून स्फटिकांना चिकटून बसलेले मळीचे पटल काढून टाकतात. हा पाक व स्फटिक रोवळ्यांसारख्या केंद्रोत्सारकांध्ये वेगळे केले जातात. नंतर पाण्याच्या फवाऱ्याने स्फटिक धुतात. ही धुतलेली साखर मळसूत्राकार वाहक मार्गाने वितळविण्याच्या पात्रात पाठविली जाते. तेथे ती ६५° से. तापमानाच्या गरम पाण्यात विरघळते. त्यात थोडे ताजे गरम पाणी घालतात. येथे सु. ६५% विरघळलेले घन पदार्थ असलेला पाक मिळतो. परतात.द्रवरूपसुक्रोजवपर्यस्तशर्करायुक्तद्रवआणिसंपूर्णपर्यस्तशर्करायुक्तद्रवहीतेथेतयारकरतात.
कच्चीसाखरवितळविणेवस्फटिकांवरीलमळीचेपटलकाढणे : स्फटिकयुक्त साखरेच्या दाट पाकावर संस्करण करून स्फटिकांना चिकटून बसलेले मळीचे पटल काढून टाकतात. हा पाक व स्फटिक रोवळ्यांसारख्या केंद्रोत्सारकांध्ये वेगळे केले जातात. नंतर पाण्याच्या फवाऱ्याने स्फटिक धुतात. ही धुतलेली साखर मळसूत्राकार वाहक मार्गाने वितळविण्याच्या पात्रात पाठविली जाते. तेथे ती ६५° से. तापमानाच्या गरम पाण्यात विरघळते. त्यात थोडे ताजे गरम पाणी घालतात. येथे सु. ६५% विरघळलेले घन पदार्थ असलेला पाक मिळतो.
विरंजन : फॉस्फेटीकरणाने हा तयार झालेला पाक स्वच्छ करतात, म्हणजे पाकात फॉस्फोरिक अम्ल व लाइम (कॅल्शियम ऑक्साइड) घालतात. यामुळे कॅल्शियम फॉस्फेट तयार होते. नंतर प्लवक शोधक उपकरणात खरवडण्याच्या क्रियेने हे फॉस्फेट काढून टाकतात किंवा कार्बोनेटीकरणाने तयार होणारे कॅल्शियम कार्बोनेट गाळून वेगळे करतात. या प्रत्येक प्रक्रियेत वर्ण अवक्षेपक द्रव्य घालतात. त्यामुळे पाकाचा रंग साक्याच्या रूपात वेगळा केला जातो.
साखरेवर प्रक्रिया करण्यासाठी एक साहाय्यक प्रयुक्ती वापरतात. तिच्यात डायाटमी मातीचा वापर करणाऱ्या दाबपत्र छानकातून कार्बोनेटयुक्त मिश्रणाचा रस गाळतात. यातून फिकट उदी वा पिवळसर रस मिळतो. अधिक क्रियाशील म्हणजे सक्रियित कणमय कार्बन, हाडापासून बनविलेला कोळसा व ॲक्रिलिक स्टायरॅनिक द्रव्यांची आयन विनिमय करणारी रेझिने यांसारख्या कार्बन पृष्ठशोषकांनी या रसाचे पुन्हा विरंजन करतात. असे विरंजन अनेक आनुक्रमिक किंवा समांतर रचनांमध्ये केले जाते.
स्फटिकीभवन : अशा रीतीने मिळालेला चांगला स्वच्छ रस निर्वात पात्रांच्या मालिकेत उकळून कोरडी साखर तयार केली जाते. या रसाची वा पाकाची शुद्घता म्हणजे त्याच्यातील सुक्रोजाचे प्रमाण सु. ९८ टक्क्यांहून जास्त असते. रस उकळण्यासाठी वापरण्यात येणारी यंत्रणा गुंतागुंतीची असते. रसातील मळी पूर्णपणे निघून जाण्यासाठी तो किमान सहा किंवा सात टप्प्यांत उकळणे गरजेचे असते. पहिल्या तीन वा चार टप्प्यांतील रस एकत्र करून तो उकळून त्याचे स्फटिकीभवन करून शुभ्र व्यापारी साखर तयार करतात. बेकरी किंवा मेवामिठाईसाठी लागणारी जाड कणांची खास साखर रस स्वतंत्रपणे उकळून तयार करतात. साखरेचे मिश्रण विशिष्ट मेशच्या चाळण्यांनी चाळून विशिष्ट आकारमानांच्या कणांची साखर तयार करतात. साखरेची घट्ट पुट व आयसिंग यांसाठीची रवाळ साखर किंवा मेवामिठाईसाठीची पिठीसाखर दळून व चाळून बनविली जाते. ती कोरडी रहावी म्हणून तिच्यात थोड्या प्रमाणात (सु. ३ टक्क्यांपर्यंत) स्टार्च वा कॅल्शियम फॉस्फेट मिसळतात. उदी वा पिवळ्या रसांच्या मिश्रणाचे स्फटिकीभवन करून फिकट ते गडद उदी साखर तयार करतात. सर्वात गडद रंगासाठी त्यात कॅरोमेल टाकतात किंवा पांढऱ्या स्फटिकांवर उदी पाकाचा लेप देऊनही उदी साखर तयार करतात. पांढरी वा उदी साखर पाकात मिसळून, आकार देऊन व सुकवून तिचे घनाकार खडे बनवितात.
आवेष्टन व साठवण : कोरडी साखर छोट्या पुड्या ते गोण्यांएवढ्या मोठ्या आवेष्टनांत भरतात. ही आवेष्टने कागद, कापड, बारदान किंवा प्लॅस्टिकचे अस्तर असलेले बारदान यांची असतात.
कोष्टक क्र.३.पांढरीसाखरवपरिष्करणकेलेल्यासाखरेचेगुणवत्तापरिणाम.
पांढरी साखर | परिष्करण केलेली साखर | |
शर्करा(सुक्रोज)
रंगIU (अंक) आर्द्रता पर्यस्तसाखर गंधक राख गाळ धूसररंग |
९९.५–९९.८%
८०–१२० ०.०३-०.०४% ०.०२–०.०५% ०.००२–०.००४% ०.०३-०.०४% ५०–१०० ppm ३०–१०० ppm |
९९.९%
२०–३५ ०.०१-०.०२% ०.००५% नाही ०.०१-०.०२% २० ppm पेक्षा कमी ०–३० ppm |
(ppm म्हणजेप्रतिदशलक्षभागात)
बीटचीसाखर : बीटच्या साखरेच्याकारखान्यांतसर्वसाधारणपणेफक्त शुभ्र साखरतयार करतात. मळीशेषद्रवात एक घटकम्हणून असते किंवास्फटिकांवर लेप देण्यासाठी ती वापरतात.
बीटचीकाढणीववाहतूक : जगातील विविध समशीतोष्ण प्रदेशांत बीटचे पीक घेतात. बीटच्या कंदांचे वजन १ ते ८ किग्रॅ. असते. कंद काढल्यानंतर त्यांच्यातील साखरउसातील साखरेप्रमाणे लवकर खराब होत नाही. त्यामुळे सर्व कंद एकाच वेळी काढतात. कंद परिसरीय तापमानाला अनेक आठवडे, तर गोठविण्याच्या तापमानाला अनेकमहिने साठविता येतात. कंदाची पाने वेगळी करतात व ती पशुखाद्यांत वापरतात. हे कंद मालवाहतूकीद्वारा गळितासाठी कारखान्यांकडे पाठवितात. तेथे विश्लेषणासाठीत्यांचे नमुने घेऊन वजन करतात. साखर, माती, नायट्रोजन, कचरा व लवणे या घटकांचे प्रमाण या विश्लेषणातून कळते. बीट हे मूळ असल्याने त्यात उसापेक्षा नायट्रोजनांचेप्रमाण पुष्कळच जास्त असते. बीटवरील प्रक्रियेच्या विविध टप्प्यांवर या नायट्रोजन संयुगांचा परिणाम होऊ शकतो.
शुभ्रसाखरउत्पादन : कारखान्यांत बीटचे कंद प्रथम धुतात. त्यामुळे धूळ, माती, खडे, काही कचरा वगैरे निघून जातात. नंतर नसराळ्यासारख्या मार्गातून कंद कापकरणाऱ्या यंत्रात गुरुत्वाकर्षणाद्वारे पडतात. चूर्ण केले तरी बीटच्या कोशिकाभित्ती भंग पावत नाहीत म्हणून तेथे त्यांचे इंग्रजी व्ही (V) अक्षराच्या आकाराचे लांब व एकाटोकाला निमुळते तुकडे होतात. या चिरोट्यांसारख्या तुकड्यांना ‘कॉसेट’ म्हणतात, त्यांचे आकारमान ३×४ ते ७ सेंमी. असते. या विशिष्ट आकारामुळे साखरेच्यानिष्कर्षणासाठी कमाल क्षेत्रफळ उपलब्ध होते. अनेक पात्रांच्या प्रतिप्रवाही रॉबर्ट विसरकांसारख्या उपकरणात या तुकड्यांतून साखरेचे निष्कर्षण होते. रेणू एकमेकांतमिसळण्याचे कार्य या विसरकात होते. या विसरकात प्रक्रियेच्या मुख्य प्रवाहाच्या उलट दिशेत मात्र त्याला समांतर साखर विरघळविणारा गरम पाण्याचा प्रवाह वाहत असतो.या प्रतिप्रवाही रचनेमुळे कमी दाबाच्या द्रायूच्या (वायू व द्रव मिश्रणाच्या) प्रवाहाचे कमी वेगाच्या उच्च दाब प्रवाहात परिवर्तन होते. कारण पाण्याचा प्रवाह मिश्रणाच्या प्रवाहातूनरेटला जातो. येथे तापमान ७५° से. पेक्षा जास्त ठेवतात. यामुळे साखर विरघळण्याचे प्रमाण वाढते आणि सूक्ष्म जीवांची वाढ कमी होऊन सूक्ष्मजीवनाशक द्रव्ये किमानवापरली जातात. येथे सु. ९८% साखरेचे निष्कर्षण होऊन कच्चा वा विसरण रस तयार होतो. विसरकात एकापुढे एक अशी अनेक बंदिस्त निष्कर्षण पात्रे असतात. एकापात्रातून पुढील पात्रात क्रमाने पाणी व रस सोडता येतो अथवा तो बाहेर काढण्याची सोय असते. उरलेल्या चोथ्यात पाण्याचे प्रमाण ९० टक्क्यांहून जास्त असते. तसेच त्याचाऊष्मांक कमी असल्याने हा चोथा जाळता येत नाही. तो दाबून सुकवितात. यासाठी वापरण्यात येणाऱ्या शुष्कक यंत्रणेला सर्वाधिक ऊर्जा लागते व त्यासाठी महागडे इंधनविकत घ्यावे लागते. मात्र पशुखाद्य म्हणून या चोथ्याला चांगली किंमत मिळत असल्याने असे करणे परवडते. शिवाय चोथ्यापासून मिळणाऱ्या मोनोसोडियम ब्यूटामेंटचापशूंना पूरक पोषकतत्वे पुरविण्यासाठी उपयोग होतो. बीटपासून गूळ वा खांडसरी साखर तयार होत नाही.
शुद्घीकरण : १०–१४ % सुक्रोज असलेल्या कच्च्या रूपातील रसात लाइम (कॅल्शियम ऑक्साइड) टाकून त्याचे कार्बोनेटीकरण करतात. यामुळे हा रस शुद्घ होतो.पुष्कळदा कार्बोनेटीकरणाच्या पहिल्या वदुसऱ्या टप्प्यांदरम्यान रस गाळतात व दाट करतात. लाइम मिसळून तापविलेल्या मिश्रणातून कार्बन डाय-ऑक्साइड वायूपाठविल्याने कॅल्शियम कार्बोनेट तयार होते. अशा रीतीने हे घन कार्बोनेट व शर्करेतर द्रव्ये यांचे मिश्रण बनते. ते गाळून टाकल्यावर मागे उरणाऱ्या पातळ रसावर सल्फरडाय-ऑक्साइड वायूची प्रक्रिया करतात. रंग घालविण्याच्या विरंजनाच्या या पहिल्या टप्प्यात अशुद्घ द्रव्ये निघून जातात व रसाचे ⇨ पीएचमूल्य कमी होते. नंतर रससक्रियित कार्बनातून नेऊन उरलेला रंग घालवितात. त्यानंतर उसाच्या रसावर करतात तशी प्रक्रिया या रसावर करतात. या प्रक्रिया पीएच मूल्य सातपेक्षा किंचित अधिकअसताना करतात. कारण याहून कमी पीएच मूल्य असताना पर्यस्त शर्करा तयार होऊन तिची नायट्रोजन संयुगांबरोबर विक्रिया होते व रसाला रंग येतो. याहून उच्च पीएचमूल्याला सुक्रोज व मोनोसॅकॅराइडे यांचे क्षारीय भंजन होते.
संहतीकरण व स्फटिकीभवन : शुद्घीकरणानंतर मिळणारा निर्मळ व पातळ रस बहुप्रभावी बाष्पित्रांत पंपाद्वारे नेला जातो. तेथे हा अधिक दाट होतो. कच्ची साखरप्रक्रियेप्रमाणेच पाच बाष्पित्रांच्या मालिकेतून जाताना पातळ रसातील जादा पाणी निघून जाते. यातून ६० ते ६५% सुक्रोज व घन पदार्थ असलेला रस मिळतो. या रसापासूनमोठ्या निर्वात पात्रांध्ये सामान्यतः तीन टप्प्यांत साखरेचे स्फटिकीभवन होते. पहिल्या टप्प्यात मिळालेल्या साखरेवर उकळून अंतिम उत्पादन म्हणून प्रक्रिया करतात. दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यांत बनणारी साखर परत वितळवून रसात मिसळून पहिल्या टप्प्याची साखर तयार करण्यासाठी परत वापरतात. केंद्रोत्सारक रोवळ्यांमध्ये साखरशेषद्रवापासून वेगळी केली जाते. त्यानंतर ही साखर सुकवितात. यासाठी विशिष्ट प्रकारची शुष्कके व शीतक उपकरणे वापरतात.
आवेष्टन व साठवण : आवेष्टनांत बंदिस्त करण्याआधी बीटची सर्व साखर ४५° से. पेक्षा थंड करणे गरजेचे असते. कारण याहून अधिक तापमानाला ती आवेष्टनांत वभांडारगृहांत घट्ट व कठीण होते. शिवाय तिचा रंग बदलू शकतो. कारखान्यात साखर सायलोंमध्ये (पेवांत) साठवितात आणि वर्षभर मागणीनुसार गोण्यांत व इतर आवेष्टनांतभरून बाजारपेठेत पाठवितात.
भारत : भारतातील साखर उद्योग चांगला विकसित झाला असून याच्या ग्राहकांची संख्या एक अब्जाहून अधिक आहे. जगात साखरेच्या उत्पादनात भारताचा ब्राझीलनंतरदुसरा क्रमांक आहे. भारतात उसाचे पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सु. ४.५ कोटी आहे आणि देशाच्या ग्रामीण भागातील बहुसंख्य मजूर साखर उद्योगावर अवलंबून आहेत.कृषिउत्पादनावर आधारलेला हा कापड उद्योगानंतरचा अशा प्रकारचा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग आहे.
भारतातील राज्यांच्या ऊसक्षेत्राशी एकूण लागवडीखालील ४.४२ दशलक्ष हेक्टर ऊसक्षेत्राशी टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे: (१) महाराष्ट्र ३७.३६, (२) उत्तर प्रदेश २७.३९,(३) कर्नाटक १३.५३, (४) तमिळनाडू ६.७७, (५) गुजरात ६.२९, (६) आंध्र प्रदेश २.७२, (७) उत्तराखंड १.५४, (८)बिहार १.३६, (९) हरियाणा १.३१ व इतर राज्ये १.७२.तसेच भारतातील ऊस लागवड करणाऱ्या प्रमुख राज्यांच्या ऊसक्षेत्राची टक्केवारी पुढीलप्रमाणे आहे : (१) उत्तर प्रदेश ४७.०५, (२) महाराष्ट्र १७.५२, (३) कर्नाटक ७.७६,(४) तमिळनाडू ७.४७, (५) गुजरात ४.५७, (६) आंध्र प्रदेश ३.७६, (७) बिहार २.८३, (८) उत्तराखंड २.२८, (९) हरियाणा १.७६, (१०) मध्य प्रदेश १.४३, (११) पंजाब १.४३, (१२) इतर राज्ये २.१४.
भारताच्या केंद्र सरकारच्या नियमानुसार (ऊस आदेशाच्या तिसऱ्या कलमानुसार) उसाची किमान आधारभूत किंमत ठरविली जाते. कमिशन फॉर ॲग्रिकल्चरल कॉस्ट अँडप्राइसेस आणि संबंधित राज्य शासन यांच्या संमतीने ही किमान आधारभूत किंमत ठरविली जाते. २०११–१२ सालासाठी ही किंमत ९.५% उतारा असलेल्या उसासाठी दरक्विंटलला रु. १३९ एवढी निश्चित केली होती. परंतु ही किंमत ‘आधारभूत’ न म्हणता ती ‘वाजवी व किफायतशीर’ असे म्हटले होते.
कोष्टक क्र.४.: ९.५%साखरेच्याउताऱ्यालादिलेलीशासकीयआधारभूतकिंमत(रुपये/क्विंटल).
वर्ष | २००४ – ०५ | २००५ – ०६ | २००६ – ०७ | २००७ – ०८ | २००८ – ०९ | २००९ – १० | २०१० – ११ |
आधारभूत किंमत | ७४.५० | ७९.५० | ८०.२५ | ८१.१८ | ८१.१८ | १२९.८४ | १३९.१२ |
महाराष्ट्र राज्यामधील एकूण साखर उत्पादनामध्ये प्रमुख साखर उत्पादक जिल्ह्यांची आकडेवारी टक्क्यांमध्ये पुढीलप्रमाणेआहे : (१) कोल्हापूर १८.९२, (२) सोलापूर१८.६५, (३) पुणे १५.६४, (४) अहमदनगर १२.५५, (५) सांगली ८.१८, (६) सातारा ८.००, (७) उस्मानाबाद ४.६३, (८) लातूर ३.२६, (९) बीड २.७३, (१०) नासिक१.८५, (११) जालना १.४९ व इतर जिल्हे ४.२०.
धनंजयराव गाडगीळ व वैकुंठभाई मेहता यांच्या मार्गदर्शनाखाली १९५० साली भारतातील सहकारी क्षेत्रातील पहिला साखर कारखाना प्रवरानगर येथे उभा राहिला. नंतरमहाराष्ट्रात इतरत्र व इतर राज्यात सहकारी साखर कारखाने निघाले. साखर उद्योगाने शेतमजूर व अकुशल कामगारांना रोजगार मिळाला. यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेतीलहा महत्त्वाचा उद्योग बनला. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात सहकारी साखर कारखान्यांमुळे ग्रामीण जीवनात सुधारणा होऊन कृषि-औद्योगिक विकास झाला. जलसिंचन, खतेव कीटकनाशके वापरून ऊस व परिणामी साखर यांचे उत्पादन वाढले. लागवड, तोडणी, वाहतूक, प्रत्यक्ष साखर कारखाना आणि इतर सहकारी संस्था यांमुळे रोजगारनिर्माण झाले. शैक्षणिक, आरोग्य व वाहतूक यांविषयीच्या पूरक सोयीसुविधा यांतून उपलब्ध झाल्या व ग्रामीण जनतेचे जीवनमान उंचावले. कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय इ.पूरक व्यवसाय उभे राहिले. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारली. सरकारचा महसूल वाढला. या उद्योगातून मिळणाऱ्या उपपदार्थांचा उपयोग होऊ लागला. एथेनॉलचाइंधनातील वापर, सहवीजनिर्मिती इ. गोष्टींमुळे साखर कारखान्यांची स्थिती सुधारण्यास मदत झाली व एकूणच ग्रामीण जीवनाचा कायापालट झाला.
अर्थात या उद्योगापुढेही समस्या आहेत. पुष्कळ साखर कारखाने डबघाईला आले तर काही बंद पडले. विविध प्रकारचे कर, लेव्ही, जुनाट यंत्रसामग्री व अतिरिक्त कर्मचारीयांमुळे उत्पादन खर्च वाढत आहे आणि स्पर्धेत टिकून राहण्याची क्षमता घटते आहे. शासकीय धोरणातील त्रुटी, उसाची टंचाई व आर्थिक व्यवस्थापनाचा अभाव यांमुळेथकबाकी वाढली. शिवाय गैरकारभार, भ्रष्टाचार व कार्यक्षमता घटल्यामुळे कारखान्यांचा तोटा वाढला. यावर पुढील उपाय सुचविले जातात : उसाच्या योग्य जातींचीलागवड करणे, ऊतक संवर्धन पद्घतीच्या लागवडी करणे (यामुळे खर्चात बचत होते), सेंद्रिय व गांडूळ खते वापरणे, डुबकऐवजी ठिबक सिंचन वापरणे, खोडव्याचे अधिकउत्पादन घेणे वगैरे
कोष्टक क्र.५.भारतवमहाराष्ट्रराज्ययांच्यासाखरउत्पादनासंबंधीची२००८-०९व२००९-१०यादोनहंगामांतीलआकडेवारी.
भारत | महाराष्ट्र | |||
१एकूणसाखरकारखाने
(अ)उभारलेले (आ)चालूअसलेले २गाळपक्षमता(दशलक्षTCD ) ३गाळपझालेलाऊस(दशलक्षटन) ४साखरउत्पादन(दशलक्षटन) ५उसाचासाखरउतारा(टक्के) |
२००८-०९
– ५१६ २२.४८० २४९.९०६ २६.३५७ १०.५५ |
२००९-१०
– ४८८ २३.००१ १४४.९७८ १४.५३८ १०.०३ |
२००८-०९
१९५ १४७ ०.४७७ ४०.०२७ ४.५७९ ११.४६ |
२००९-१०
१९९ १४२ ०.४९९ ६१.३९० ७.०६६ ११.५४ |
कोष्टक क्र.६.महाराष्ट्रराज्याच्यासाखरउत्पादनासंबंधीची२००९-१०याहंगामातीलविभागवारआकडेवारी
अ. क्र. विभाग | विभागातील जिल्हे | साखर कारखाने
उभारलेले चालू असलेले सरकारी खाजगी |
गाळपक्षमता (हजारTCD) | गाळप झालेला ऊस (हजार टन) | साखर उत्पादन
(हजार टन) |
उसाचा साखर उतारा (टक्के) |
कोल्हापूर
पुणे अहमदनगर औरंगाबाद नांदेड अमरावती नागपूर |
कोल्हापूरवसांगली.
सातारा,पुणेवसोलापूर. नासिकवअहमदनगर. धुळे,नंदूरबार,जळगाव,औरंगाबाद, जालनावबीड. परभणी,हिंगोली,नांदेड,उस्मानाबादवलातूर. बुलढाणा,यवतमाळ,वाशिमवअमरावती. वर्धा,नागपूरवभंडारा. |
३६ ३० ३
४५ ३४ ९ २६ १९ ३ ३६ १४ ३ ३६ १३ १० १४ २ १ ६ ० १ |
११०.७००
१३४.२६६ ६५.८५० ७७.००० ७३.७५० २६.३०० ११.२५० |
१५,६८०.०५६
२५,७७४.२४५ ९,३६३.९६८ ३,६२५.८३१ ६,६९०.४१७ २२२.५६५ ३२.७३५ |
१,९१५.६१६
२,९८०.९९३ १,०१७.७८६ ३८३.८७४ ७४२.७१९ २२.८७७ २.८६५ |
१२.२२
११.५७ १०.८८ १०.६९ ११.२२ १०.३५ ८.७५ |
उपपदार्थांसाठी पूरक उद्योग उभारणेमद्यार्क व कागद बनविणेसहवीजनिर्मिती करणेमका, बीट व रताळी सारखी पर्यायी पिके घेणे उत्पादन खर्चात बचत करणेसाखरेच्या किमतीतील चढ-उतारासाठी निधी उभारणे इत्यादी. यासंबंधात सरकार पुढील उपाय योजू शकते: निर्बंध व करटाळणे, आयात-निर्यात धोरण पोषक राखणे, साखरेच्या कोठ्याविषयीचे धोरण शास्त्रीय रीतीने ठरविणे, उसाची किमान आधारभूत किंमत समतोल विचारांतून ठरविणे, साखर विक्रीचेवेळापत्रक काटेकोरपणे निश्चित करणे, राखीव साठ्याकरिता अतिरिक्त निधी व साठविण्याची व्यवस्था करणे, विविध प्रकारची साखर बनविणे. या उपायांमुळे जागतिक स्पर्धेतटिकून रहायला मदत होईल. सर्वसाधारणपणे १ टन उसापासून १.३ क्विंटल साखर, ३५०किग्रॅ. चोयट्या व या चोयट्यांपासून १०० युनिट वीज आणि ४० किग्रॅ. मळी व यामळीपासून ११ लि. एथेनॉल मिळू शकते. एथेनॉल इंधनात वापरता येते. साखरेचा उतारा चांगला होण्यासाठी उसाच्या जातीत व तिच्या मशागतीत सुधारणा करणे गरजेचेआहे. त्यामुळे उपपदार्थांपासूनही अतिरिक्त नफा मिळू शकतो. भारतात वर्षाला सु. २.२ कोटी टन साखर वापरली जाते. यापैकी सु. ५५% साखर मिठाईत, २०% गोळ्या,बिस्किटे, चॉकलेटे, शीतपेये, जॅम, जेली वगैरेंत वापरली जाते तर सु. २५% साखरेचा घरगुती वापर होतो.
बरेच साखर कारखाने वीज व वाफ स्वतः तयार करीत असल्यामुळे याबाबतींत स्वयंपूर्ण झालेले आहेत परंतु वीज हा कारखान्यांचा मुख्य निर्मितीस्रोत ठरणार आहे. त्यासाठीअत्याधुनिक यंत्रसामग्री, उच्च दाबाची बाष्पित्रे व उच्च प्रतीची जनित्रे बसविणे आवश्यक आहे. कारखान्यातील वाफेचा वापर जवळजवळ ५०% प्रतिएकक ऊस गाळपासाठीलागतो.जागतिक पातळीवर वाफेचा वापर ३२ ते ३५% प्रतिएकक ऊस गाळपाइतके आहे. यामुळे भुशाच्या रूपातील चोयट्यांमध्ये ऊर्जेची प्रचंड प्रमाणात बचत होते. त्याचावापर वीजनिर्मितीसाठी केल्यास अतिरिक्त फायदा कारखान्याला मिळू शकतो. कारखान्यातील वीजनिर्मितीमुळे काही अंशी संकटांवर मात करता येईल. महाराष्ट्रातीलजवळपास १७ सहकारी साखर कारखान्यांनी सहवीजनिर्मिती प्रकल्प चालू केलेले आहेत. इतर १० कारखान्यांना सहवीज प्रकल्पांसाठी मंजुरी मिळालेली आहे (२०१०अखेर) सदर वीजनिर्मिती अपारंपरिक इंधन वापरून होणार असल्याने संयुक्त राष्ट्रांकडून कारखान्याला कार्बन क्रेडिट विक्रीचा फायदा होणार आहे.
बीटपासून साखर तयार करण्याचा प्रयोग भारतात प्रथम जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंकुशनगर येथील समर्थ सहकारी साखर कारखान्यात करण्यात आला.यासाठी त्याला पुण्याच्या वसंतदादा पाटील शुगर इन्स्टिट्यूटने तांत्रिक सहकार्य केले आहे. तेथे २००६–०७ या गळीत हंगामात दररोज १०० मेट्रिक टन बीटपासून रसनिष्कर्षित करणारे संयंत्र उभारले आहे. बीटपासून मिळालेला रस उसाच्या कच्च्या रसात मिसळला जातो. नंतर उसाच्या रसापासून पांढरी साखर मिळविण्याच्या प्रक्रियेद्वारेया मिश्ररसापासून पांढरी साखर मिळविली जाते.
आरोग्यआणिआहार :आरोग्य : साखर ही संज्ञा सर्वसाधारणपणे साध्या कार्बोहायड्रेटांसाठी वापरली जाते. साध्या कार्बोहायड्रेटांत फ्रुक्टोज, ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज यांसारखी मोनोसॅकॅराइडे असतात, तर माल्टोज आणि सुक्रोजासारखी डायसॅकराइडे असतात. फ्रुक्टोज हे प्राथमिक मोनोसॅकॅराइड असल्यास ग्लायसेमिक निर्देशांक हा कमी व आरोग्यपूर्ण नोंदला जातो (ग्लायसेमिक निर्देशांक दिलेला आहार किती प्रमाणात रक्तातील साखरेच्या स्तरात बदल घडवितो यावरून ठरवितात. यावरून आहाराचे निर्धारण मूल्य आकड्यांत ठरविलेले असते). ही साधी साखर आंत्रात शोषली जाऊन नंतर यकृतात तिचे ग्लायकोजेनात रूपांतर होते. ती वेळोवेळी अन्नात असलेल्याशर्करेच्या प्रमाणानुसार वापरली जाते, ज्यामुळे रक्तातील ग्लुकोज स्तराचा चढ-उतार नियमित ठेवला जातो. परंतु, ग्लुकोज जर प्राथमिक मोनोसॅकराइड असेल तरग्लायसेमिक निर्देशांक अधिक आणि कमी आरोग्यपूर्ण असतो. जर चयापचयात बिघाड झाला तर ग्लुकोज आतड्यातून थेट रक्तप्रवाहात मिसळून ग्लुकोजाचे प्रमाण वाढते वअग्निपिंडांना ते प्रमाण कमी करण्यासाठी अधिक इन्शुलिनाची निर्मिती करावी लागते. अतिरिक्त इन्शुलिनाचे प्रमाण प्रतिकारक्षमता प्रणालीला निस्तेज करते. रक्तातीलसाखरेची (ग्लुकोज) गुणकारिता ठरलेली असते. जर ग्लुकोजाचे प्रमाण खूप कमी असेल तर अशक्तता किंवा रक्तशर्करान्यूनता जाणवू शकते. ग्लुकोजाचा स्तर खूप जास्तअसेल तर मधुमेहासारखे आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्यास सुरुवात होते.
सध्या कर्करोगाच्या वाढीस किंवा नियंत्रणास कारणीभूत होण्यास साखरेचा किती सहभाग असतो याविषयी महत्त्वपूर्ण संशोधन सुरू आहे, कारण ग्लुकोजाला कर्करोगाचेइंधन समजले जाते. १९३१ साली नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ ⇨ ओटोहाइन्रिखव्हारबुर्ख यांनी पहिल्यांदा शोधून काढले की, कर्करोगाच्या कोशिकांचे चयापचय हेनिरोगी कोशिकेहून मूलतः निराळे असते. त्यांच्या संशोधनातील महत्त्वाचा भाग, कर्कार्बुदांमध्ये अवायुजीवी ग्लायकोलायसीस जास्त होते हा होता. ग्लुकोज हेकर्ककोशिकांद्वारा इंधन म्हणून वापरले जाते व त्याचे उपउत्पादन म्हणून लॅक्टिक अम्लाची निर्मिती निरोगी कोशिकांपेक्षा जास्त होते. कर्ककोशिकांद्वारा ग्लुकोजाच्याकिण्वनातून तयार झालेले लॅक्टिक अम्ल यकृतात वाहून नेले जाते. ग्लुकोजाचे लॅक्टेटमध्ये झालेले रूपांतरण कर्ककोशिकेमध्ये अधिक अम्लीय सामू (पीएच) दर्शवितातआणि लॅक्टिक अम्लाच्या अतिरिक्ततेमुळे थकवा व शीण जाणवतो. मोठी कर्कार्बुदे अधिक अम्लीय सामू दर्शवितात. सर्वसाधारण वायुजीवी चयापचयात ग्लुकोजापासूननिर्माण होणारी ऊर्जा ३८ मोल एटीपी (ॲडोनिसीन ट्राय फॉस्फेट) असते, तर कर्ककोशिकांतील अवायुजीवी चयापचयातून केवळ दोन मोल एटीपी असते. थोडक्यातकर्करोगात ‘ऊर्जा’ वाया जाते, त्यामुळे रुग्णास थकवा आणि अवपोषण जाणवते. या विष्यंदी चक्रामुळे शरीराचा ऱ्हास होतो. या कारणामुळे ४०% कर्करोगाचे रोगी कुपोषणानेमृत्यू पावतात.
आहारातील साखरेच्या प्रमाणावरून आरोग्य ठरते. शरीरात साखरेच्या प्रमाणाचा समतोल बिघडला म्हणजे मधुमेहासारखा विकार तर जडतोच त्याशिवाय प्रतिकारक्षमताप्रणाली, हृदय आदींवरदेखील गंभीर परिणाम होतो. त्याखेरीज मेदवृद्ध्ी, दंतदोष, हृद्धमनी रोग असे विकार निर्माण होतात. [⟶ आहार व आहारशास्त्र इन्शुलीनकोलेस्टेरॉल मधुमेह].
आहार : अमेरिकन मानकांनुसार प्रौढांत सरासरी आवश्यक असलेले साखरेचे प्रमाण दर दिवशी ६० ग्रॅ. किंवा दर आठवड्यास ४५० ग्रॅ. असावे. विशेषेकरून सुक्रोज किंवाउच्च फ्रुक्टोज असलेली साखर वापरात असावी. सुक्रोज आणि फ्रुक्टोज प्रौढांत सरासरी १२% पर्यंत ऊष्मांक पुरवितात, तर लहानांमध्ये त्याहून थोड्या अधिक प्रमाणातपुरवितात. अन्नात नैसर्गिक रीत्या मिळणारी साखर असते. फ्रुक्टोज, ग्लुकोज व सुक्रोज फळे आणि काही भाजीपाल्यांतून तर लॅक्टोज दुधातून मिळते. या नैसर्गिक साखरेच्यासेवनाचे प्रमाण साधारण ८% एवढे असते, तर (दुधामुळे) लहान मुलांत अधिक असते. साखरेत प्रथिने, खनिज पोषके आणि जीवनसत्त्वे नसल्याने साखरेला ‘पोकळऊष्मांक’ म्हणतात.
साखर उत्कृष्ट परिरक्षक असते. कारण ती पाणी अधिशोषित करते व सूक्ष्मजंतूंची वाढ होण्यास रोखते. यामुळे अनेक अन्नपदार्थांत साखर वापरतात. जॅमांमध्ये ३० ते ६० टक्केसाखर असते, तर मध आणि नैसर्गिक सिरपांमध्ये ७५ टक्क्यांहून अधिक साखर असते. (चित्रपत्रे).
पहा: कार्बोहायड्रेटे सेल्युलोज स्टार्च.
संदर्भ : 1. Chen, क्ष. C. P. Chou, C. C. Canesugar Handbook : A Manual for Canesugar Manufacturers and Their Chemists, 1993.
2. Chou, C. C. Handbook of Sugar Refining : A Manual for Design andOperation Sugar Refining Facilities, 2001.
3. Clarke, M. A. Godshall, M. A. Eds., Chemistry and Processing of Sugarbeetand Sugarcane, 1988.
4. Gaman, P. M. Sherrington, K. B. Science of Food, 1998.
5. Mathlouthi, M. Reiser, P. Eds., Sucrose : Properties and Applications, 1994.
6. Pigirolamo, M. Diet and Cancer : Makers, Prevention and Treatment, New York, 1994.
7. Volk T, et al. pH in human tumor Xenografts :Glucose. Br. J Cancer, Sept. 68, 1993.
8. Warburg, O. On theOrigin of Cancer Cells, Science, Feb. 123: 309-4,1956.
ठाकूर, अ. ना. घाडगे, सुभाष रा. वाघ, नितिन भ.
“