सागरी विमान : पाण्याच्या पृष्ठभागावरून आरोहण (उड्डाण) करू शकणाऱ्या व त्यावर अवतरण करू (उतरू) शकणाऱ्या विमानाला‘ सागरी विमान’ म्हणतात. प्लावक (पाण्यावर तरंगणारे) विमान, उडती नौका आणि उभयचर (पाण्याच्या पृष्ठभागावर व जमिनीवर आरोहण व अवतरण करणारे) विमान हे सागरी विमानांचे तीन प्रकार आहेत. पहिले दोन प्रकार फक्त पाण्याच्या पृष्ठभागावरच वापरता येतात. प्लावक विमान जमिनीवरील विमानासारखेच असते मात्र त्याच्या खालच्या बाजूला (तळाला) चाकांऐवजी मोठे तराफे (प्लवक) जोडलेले असतात. उडत्या नौकेची काया जलाभेद्य व जहाजाच्या कायेप्रमाणे पाण्यावर तरंगणारी असते. उभयचर विमाने म्हणजे ज्यांच्या तराफ्यां ना वा नौ-कायेला चाके बसविलेली आहेत, अशी प्लावक विमाने किंवा उडत्या नौकाच असतात. ही चाके वैमानिक आत ओढून घेऊ शकतो किंवा बाहेर काढू शकतो. यामुळे उभयचर विमान जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावर उतरविता येते अथवा तेथून ते उडविता येते.

आ. १. एक एंजिन असलेले प्लावक विमानसागरी विमाने समुद्र, सरोवर, जलाशय, उपसागर, नदीचे संथ व मोठे पात्र येथे पाण्याच्या पृष्ठभागावर तसेच हिम, बर्फ यांच्या पृष्ठभागावर वापरता येतात. प्लावक विमाने व उडणाऱ्या नौका यांच्यासाठी राखून ठेवलेली धावपट्टी तिच्या सर्व सीमांवर विजेचे तरंगणारे पिवळे संकेतदीप लावून दर्शवितात. लष्कराच्या सागरी विमानांसाठी समुद्रात, उपसागरात, सरोवरात किंवा नदीच्या पात्रात निराळ्या धावपट्ट्या न दर्शविता ती क्षेत्रे राखून ठेवतात. प्लावक विमान व उभयचर विमान ही त्यांच्या रचनेमुळे फार मोठी करता येत नाहीत. याउलट उडती नौका हवी तेवढी मोठी बनविता येते. प्रचालक, पंख वगैरे भाग पाण्यापासून दूर ठेवण्यासाठी उडत्या नौकेचा सांगाडा उंच व मोठा ठेवावा लागतो. यामुळे तिचे वजन वाढून तिची कार्यक्षमता कमी होते. नौकेच्या जलाभेद्य कायेचा उपयोग अवतरण यंत्रणा, तसेच कार्यकारी, प्रवासी कक्ष म्हणून होतो. जहाजा सारख्या आकारामुळे उडती नौका स्थिर असताना पाण्यावर तरंगू शकते. पाण्यावर गतिमान असताना तिच्या पाण्यात बुडालेल्या भागावर द्रवगतिकीय प्रेरणेने व पंखावरील वायुगतिकीय प्रेरणे ने ती पाण्यावर तरंगू शकते. वर हवेमध्ये चढल्यावर तिच्या पंखावरील वायुगतिकीय प्रेरणेने ती हवेत तरंगू शकते. वरील सर्व अवस्थां म ध्ये ती नेहमी स्थिर असणे जरूरीचे असते. अवतरणाच्या वेळी याउलट क्रिया घडतात प्लावक विमानाचे तराफे हे अवतरण यंत्रणेचे काम करते.

वैज्ञानिक संशोधनाचा जमिनीवरील विमानांप्रमाणेच सागरी विमानांनाही फायदा झाला आहे. अमेरिका, ब्रिटन व जर्मनी येथील प्रसिद्घ प्रयोगशाळांमध्ये सागरी विमानांच्या वायुगतिकीय व द्रवगतिकीय कार्यक्षमते विषयी पुष्कळच संशोधन झाले आहे. येथे सागरी विमानांविषयीचे सिद्घांत व व्यावहारिक उपयोग पडताळून पाहण्यासाठी⇨ वातविवरे व पाण्याच्या मोठ्या टाक्या उभारण्यात आल्या. या संशोधनातून उडत्या नौकेच्या कायेचे व सांगाड्याचे आकार, उड्डाणाची व अवतरणाची कार्यक्षमता आणि लष्करी उपयोगांकरिता खवळलेल्या समुद्राशी मुकाबला करण्यासाठीची यंत्रणा वा व्यवस्था या बाबतींत खूप सुधारणा झाली.

इतिहास : सागरी विमान फ्रा न्समध्ये आंरी फाब्री यांनी १९१ ० मध्ये उडविले होते. अमेरिकेत पहिले व्यावहारिक सागरी विमान ग्लेन एच्. कर्टिस यांनी१९११-१२ दरम्यान तयार केले. सागरी विमानाच्या अभिकल्पाविषयीच्या (आराखड्याविषयीच्या) जलद प्रगतीमुळे पहिल्या महायुद्घापर्यंत अनेक एंजिनांच्या उडत्या नौका बनविण्यात आल्या. यातून पहिल्या महायुद्घातील ब्रिटनच्या उडत्या नौका तयार झाल्या. सागरातील टेहळणी, पाणबुडी विरुद्घची कारवाई, पाण सुरुंग पेरणे, सागरी व हवाई बचाव कार्य यांसारख्या कामांसाठी त्या वापरल्या. १९१९ मध्ये उत्तर अटलांटिक ओलांडून जाणारे अमेरिकन सागरी विमान तयार झाले. जमिनीवर व पाण्यावर सारख्याच कार्यक्षमतेने आरोहण व अवतरण करू शकणाऱ्या सागरी उभयचर विमानाचे पहिले उड्डाण ग्रो हर नोएलिंग यांनी केले (१९२ ४). लष्कर व सागरी तटरक्षक दल यांच्यासाठी अनेक सागरी विमाने बनविण्यात आली. हवाई वाहतूक कंपन्यांनी व खाजगी वापरासाठी व्यक्तींनी ही विमाने घेतली होती. १९२ ०– ३ ० दरम्यान अमेरिकेत छोटी सागरी विमाने बनविण्यात आली. १९२९ च्या सु मा रास जगातील सर्वांत वेगवान व मोठी विमाने ही सागरी विमाने होती. रशियाचे एएनटी- हे प्लावक विमान मॉस्को येथून सायबीरियामार्गे न्यूयॉर्कला गेले (१९२९). १९३ ०– ४० च्या दरम्यान इटलीच्या सागरी विमानांनी रो म ते रीओ दे जानेरो आणि रो म ते शिकागो अशी उड्डाणे केली होती. दुसऱ्या महायुद्घापर्यंत सागरपार उड्डाणांसाठी सागरी नौका तळ म्हणून वापरीत. त्या १९३ ६ नंतर मागे पडल्या. दीर्घ अंतराच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणांत सागरी विमानांचे वर्चस्व होते. पॅसिफिक व अटलांटिक महासागर ओलांडून जाणाऱ्या नियमित प्रवासी वाहतूक सेवा उपलब्ध होत्या. दुसऱ्या महायुद्घात भाग घेतलेल्या बहुतेक सर्व देशांनी हजारो सागरी विमाने टेहळणी, बचाव, रसद पुरवठा वगैरे कामांसाठी वापरली. या काळातील संशोधनातून अखेरीस सेकंदाला २ ७० मी. वेगाने जाणारे मार्टिन पी एम सीमास्टर हे विमान तयार झाले आणि ते १९ ५५ मध्ये प्रथम उडविण्यात आले. यानंतर खवळलेल्या पाण्यावर वापरता येईल असे शिन मेईबा पीएस-१ हे जपानचे सागरी विमान १९ ६७ मध्ये उडविण्यात आले.

आ. २. सागरी विमान (मार्टिन पी ६ एम सीमास्टर) दुसरे महायुद्घ सुरू झाल्यानंतर जमिनीवरील व जहाजांवरील विमानांमुळे सागरी विमानांचे लष्करी व व्यापारी महत्त्व हळूहळू कमी होत गेले आणि त्यांचा विकास अगदी अल्प प्रमाणातच होत राहिला. यातून हिम, बर्फ, चिखल व गवताळ जमीन यांवर वापरता येऊ शकणाऱ्या प्रयुक्त्या असलेली सागरी विमाने पुढे आली. ती सामान्यपणे लष्करी उपयोगांसाठी अधिक प्रमाणात वापरतात. बहुतेक आधुनिक सागरी विमाने लहान, एक वा दोन एंजिने असलेली असतात. ती मुख्यतः खेळ व मनोरंजन यांसाठी वापरतात. दूरवरच्या व दुर्ग म भागांत रसद पुरविण्याच्या दृष्टीने ती मोलाची आहेत. कारण त्यांना विमानतळाची गरज नसते आणि ती नद्या व सरोवरे येथूनही वापरता येतात.

सागरी विमानांचे तोटे : प्लावक व नौ-काया यांच्या आकारांमुळे सागरी विमानावर अधिक वायुगतिकीय ओढ निर्माण होते. जादा रचनात्मक गरजांमुळे त्याचे वजन वाढते व कार्यक्षमता घटते. सागरी (खारट) पाण्यामुळे संक्षारणाची (रासायनिक झीज होण्याची) शक्यता अधिक असते. सर्वसाधारण प्रकारची सागरी विमाने गोठलेल्या वा खळखळाट असलेल्या पाण्यावर निकामी ठरतात. सागरी विमान चालविण्यासाठी वैमानिकाचे कौशल्य उ च्च द र्जाचे असावे लागते. सागरी विमानांसाठी खास प्रकारचा विमानतळ अथवा धावपट्टीची गरज नसते. हा यांचा मुख्य फायदा असला, तरी जगभर सर्वत्र चांगले विमानतळ उभारलेले असल्याने या फायद्याकडे दुर्लक्ष होते. तसेच सागरी विमानाद्वारे होणारे बचावाचे कार्य दीर्घ पल्ल्याच्या हेलिकॉप्टरद्वारे होऊ शकते. या कारणांमुळे जवळजवळ सर्व मोठी सागरी विमाने व्यापारी व लष्करी सेवेतून कालबाह्य झाली आहेत.

पहा : ग्लायडर विमान विमानतळ विमानांचा अभिकल्प व रचना.

संदर्भ :1. Allward, M. An Illustrated History of Seaplanes and Flying Boats, 1990.

2. Faure, M. Flying a Floatplane, 1996.

3. Palmer, H. R. The Seaplanes, 1980.

4. Stroud, J. The Worlds Civil Marine Aircraft, 1979.

ठाकूर, अ. ना.