उल्यानफ्स्क : रशियाच्या याच नावाच्या ओब्लास्टची राजधानी. लोकसंख्या ३,८२,००० (१९७२ अंदाज). हे व्होल्गा नदीच्या उजव्या तीरावर असून मॉस्कोच्या आग्नेयीस ६८४ किमी. आहे. याचे पूर्वीचे नाव सिम्बिर्स्क परंतु लेनिनचे हे जन्मस्थान असल्याने १९२४ पासून त्याच्याच नावावरून शहराला उल्यानफ्स्क हे नाव मिळाले व लेनिनचे घर हे राष्ट्रीय संग्रहालय बनले. शहरात यंत्रे, आटा, मद्ये इत्यादींचे उद्योग असून ते व्यापार व दळणवळणाचे केंद्र समजले जाते.
लिमये, दि. ह.