आस्तिक: भौतिक देहाहून आत्मा भिन्न असून पापाने तो दु:खी होतो व पुण्याने सुखी होतो, सत्कर्माने किंवा तत्त्वज्ञानाने स्वर्गाला वा मोक्षाला जातो असे मानणारा किंवा परलोक मानणारा, तो आस्तिक होय. धार्मिक हिंदूंच्या मते जो वेदप्रामाण्य मानतो, तो आस्तिक होय. यामध्ये देहाव्यतिरिक्त आत्म्याचे व परलोकाचे अस्तित्व गृहीत धरले आहे. सर्वसामान्य प्रचलित अर्थाप्रमाणे जो ईश्वराचे अस्तित्व मानतो, तो आस्तिक होय. देहाव्यतिरिक्त आत्मा नाही, परमेश्वर नाही व म्हणून धर्मग्रंथही प्रमाण नाहीत असे जो मानतो, तो नास्तिक होय.
जोशी, लक्ष्मणशास्त्री
“