गीहा सरोवर : मध्य अमेरिकेतील एक निसर्गरम्य सरोवर. एल् साल्वादोर आणि ग्वातेमाला या दोन देशांच्या सरहद्दीवर हे असून सरोवराचा ८० टक्के भाग एल् साल्वादोरच्या सरहद्दीत मोडतो. ३२ किमी. लांब , १० किमी. रुंद व ४६ मी. खोल असलेले हे सरोवर समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून सरोवराच्या परिसरात प्रवाशांसाठी अनेक सुखसोयी आहेत. लेंपा नदी गीहा सरोवरातून आरपार जाते. सरोवरातील छोट्या बेटांवर जुने अवशेष आढळतात.

 शाह, र. रू.