नवायसलोह: सूज नाहीसा करणारा उत्तम लोहकल्प यात सुंठ, मिरी, पिंपळी, चित्रक, वावडिंग, त्रिफळा, नागरमोथा व सर्वतुल्य लोहभस्म हे घटक असतात. रोगानुरूप ताक, मध, तूप वा कोमट पाणी यांचे ⇨ अनुपान करतात. सूज, कावीळ, पांडुरोग, हृद्रोग, कष्ट मूळव्याध व प्रमेह यांवर हा कल्प गुणकारी आहे.
जोशी, वेणीमाधवशास्त्री