चेल्सी: लंडनचा हा इतिहासप्रसिद्ध विभाग १९६५ पासून रॉयल बरो ऑफ केंझिंग्टन अँड चेल्सीमध्ये समाविष्ट आहे. चेल्सी रॉयल हॉस्पिटल, सेंट ल्यूकस चर्च, क्रॉस्टी-हॉल यांसारख्या अनेक ऐतिहासिक वास्तूंप्रमाणेच दुसऱ्या महायुद्धातील विनाशानंतर येथे प्रेक्षणीय इमारतीही झाल्या आहेत. टॉमस मुर, न्यूटन, स्लोन, ॲडिसन, ली हंट, थॅकरी, मेकॉले, कार्लाइल, चेस्टर्टन, गॉल्झवर्दी इ. शेकडो नामांकित साहित्यिक, कलावंत, मुत्सद्दी व राजघराणी यांचा संबंध चेल्सीशी आलेला आहे.
यार्दी, ह. व्यं.
“