कसौली : हिमाचल प्रदेश राज्याच्या सिमला जिल्ह्यातील हवा खाण्याचे प्रसिद्ध ठिकाण. लोकसंख्या ३,७५७ (१९७१). हे समुद्रसपाटीपासून १,९६० मी. उंचीवर, अंबाल्याच्या ७२ किमी. उत्तरेस आणि सिमल्याच्या ५१ किमी. नैऋत्येस आहे. येथे लष्करी छावणी व आजारातून उठलेल्या सैनिकांचे आरामस्थान आहे. भारतीय पाश्चर संस्थेचे मुख्यालय, मध्यवर्ती संशोधन संस्था, अन्नप्रयोगशाळा अशा राष्ट्रीय महत्त्वाच्या वैज्ञानिक संस्था येथे आहेत. कालका खोऱ्याचे आणि सभोवतालच्या पर्वतश्रेणीचे भव्य देखावे येथून दिसतात.
ओक, शा. नि.