कागल : कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्याचे मुख्य ठिकाण. लोकसंख्या १३,४२८ (१९७१). हे पुणे बंगलोर हमरस्त्यावर कोल्हापूरच्या आग्नेयीस १८ किमी. व दूधगंगा नदीपात्रापासून दोन किमी. उत्तरेस आहे. कोल्हापूर संस्थानच्या अधिकारातील जहागीरदार घाटगे यांची ही राजधानी होती. येथे नगरपालिका, दोन माध्यमिक विद्यालये व एक जुना भुईकोट किंल्ला आहे. येथील राजवाडा प्रेक्षणीय असून कार्तिक महिन्यात गैबीसाहेबाचा मोठा उरुस भरतो. मागावर कापड विणणे, विटा, चांदीचे जिन्नस इ. घरगुती धंदे येथे चालतात.
कुलकर्णी, गो. श्री.